<font face="mangal" size="3">इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. लखनौ, उत्त& - आरबीआय - Reserve Bank of India
इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. लखनौ, उत्तर प्रदेश - भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश मागे घेतले जाणे
सप्टेंबर 11, 2019 इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. लखनौ, उत्तर प्रदेश - भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश मागे घेतले जाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने, निर्देश दि. जून 4, 2014 अन्वये, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35 अ खाली, इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. लखनौ, ह्यांना निर्देश दिले होते. जारी करण्यात आलेल्या निर्देशांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती आणि शेवटची मुदतवाढ, निर्देश दि. मार्च 5, 2019 अन्वये, सप्टेंबर 11, 2019 पर्यंत होती. जनतेच्या हिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले असल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35 अ च्या पोटकलम (2) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक, इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि. लखनौ, उत्तर प्रदेश ह्यांना वरीलप्रमाणे दिलेले (व वेळोवेळी सुधारित करण्यात आलेले) निर्देश येथे मागे घेत आहे. वरील निर्देशाची एक प्रत संबंधित जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. ह्यानंतर वरील बँक तिचा बँकिंग व्यवसाय नियमितपणे करु शकते. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2019-2020/669 |