<font face="mangal" size="3">विद्यमान किंवा इतर कोणत्याही जुन्या मालिकेत - आरबीआय - Reserve Bank of India
विद्यमान किंवा इतर कोणत्याही जुन्या मालिकेतील रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध
चलन लक्षण काढून घेतले जाणे
आरबीआय/2016-2017/113 नोव्हेंबर 09, 2016 सर्व प्राधिकृत व्यक्तींना, महोदय/महोदया विद्यमान किंवा इतर कोणत्याही जुन्या मालिकेतील रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध 1. एस.ओ 3408 (ई) अन्वये, भारतीय राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या भारत सरकारच्या अधिसूचनेकडे, प्राधिकृत व्यक्तींचे लक्ष वेधण्यात येत आहे. त्यानुसार नोव्हेंबर 8, 2016 च्या मध्यरात्रीपासून रु.500 व रु.1000 च्या विद्यमान किंवा कोणत्याही जुन्या मालिकेमधील बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकण्यात/बाद करण्यात आले आहे. 2. तथापि, ह्या अधिसूचनेच्या परिच्छेद 1(ग) व (ह) अन्वये, खाली दिलेल्या व्यवहारांसाठी ह्या विहित बँक नोटा, नोव्हेंबर 11, 2016 पर्यंत वैध चलन म्हणून असतील. (1) आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणा-या व बाहेर जाणा-या प्रवाशांसाठी (असे प्रवासी की ज्यांच्याकडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक मूल्य नसलेल्या विहित बँक नोटा आहेत), वैध चलनात बदलून देता येणे. (2) पाच हजार रुपयांपेक्षा अधिक मूल्य नसलेल्या विदेशी मुद्रा किंवा विहित बँक नोटा वैध चलन असलेल्या बँक नोटांमध्ये बदलून देण्यास विदेशी पर्यटकांसाठी. 3. प्राधिकृत व्यक्तींनी वरील सूचनांचे पालन करावे आणि ह्या परिपत्रकातील मजकुर त्यांच्या घटकांच्या नजरेस आणावा. 4. ह्या परिपत्रकातील निदेश, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 (1999 चा 42) च्या कलम 10(4) व कलम 11(1) खाली देण्यात आले असून, अन्य कोणत्याही कायद्याखाली आवश्यक असलेल्या परवानग्या/मंजुरी ह्यांना बाधाकारक नाहीत. आपला विश्वसु शेखर भटनागर |