<font face="mangal" size="3">छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर</font> - आरबीआय - Reserve Bank of India
छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर
आरबीआय/2016-17/225 फेब्रुवारी 9, 2017 अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय, छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीजीबीए.जीएडी.881/15.02.005/2016-17 दि. ऑक्टोबर 13, 2016 चा संदर्भ घ्यावा. भारत सरकारने, त्यांचे कार्यालयीन पत्र (ओएम) क्र.एफ.क्र.1/04/2016–एनएस.II दि. डिसेंबर 30, 2016 अन्वये, आर्थिक वर्ष 2016-17 च्या चौथ्या तिमाहीसाठी, निरनिराळ्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदर कळविले होते. (2) ह्या परिपत्रकातील मजकुर, योग्य ती कारवाई करण्यासाठी, सरकारे लघु बचत योजनांचे काम करणा-या आपल्या बँक शाखांच्या नजरेस आणावा. ह्या योजनांच्या वर्गणीदारांच्या माहितीसाठी ही हा मजकुर, आपल्या शाखांमधील नोटीस बोर्डांवर प्रदर्शित केला जावा. आपला विश्वासु, (व्ही.एस.प्रजिश) |