<font face="mangal" size="3">2018-19 व 2019-20 ह्या वर्षांसाठी, लघु मुदत पीक कर्जांसाठी&# - आरबीआय - Reserve Bank of India
2018-19 व 2019-20 ह्या वर्षांसाठी, लघु मुदत पीक कर्जांसाठीचे व्याज अर्थसहाय्य (आयएस) व जलद प्रदान प्रोत्साहन (पीआरआय) : कोविड-19 च्या कारणामुळे वाढविलेला कालावधी
आरबीआय/2019-20/224 एप्रिल 21, 2020 अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय / महोदया, 2018-19 व 2019-20 ह्या वर्षांसाठी, लघु मुदत पीक कर्जांसाठीचे व्याज अर्थसहाय्य (आयएस) व जलद प्रदान प्रोत्साहन (पीआरआय) : कोविड-19 च्या कारणामुळे वाढविलेला कालावधी कृपया, 2018-19 व 2019-20 ह्या वर्षांसाठीच्या लघु मुदतीच्या पीक कर्जांवरील व्याज अर्थसहाय्य योजनेवरील आमचे परिपत्रक एफआयडीडी.सीओ.एफएसडी.बीसी.क्र.15/05.02.001/2018-19 दि. मार्च 7, 2019 चा संदर्भ घ्यावा. (2) कोविड-19 च्या देशव्यापी साथीमुळे देशभरातील लॉक डाऊनमुळे आणि परिणामी लोकांच्या हालचालींवरील निर्बंधांमुळे, अनेक शेतकरी, त्यांच्या लघु मुदत पीक कर्जांची थकबाकी प्रदान करण्यासाठी त्यांच्या बँक शाखांपर्यंत प्रवास करु शकले नाहीत. कोविड-19 विनियामक पॅकेज संबंधाने, मार्च 27, 2020 रोजीच्या आरबीआयच्या परिपत्रकानुसार, लघु मुदत पीक कर्जांसह सर्व मुदत कर्जांसाठी, मार्च 1, 2020 ते मे 31, 2020 दरम्यान ड्यु असलेल्या हप्त्यांचे प्रदानावर तीन महिन्यांसाठीचा मोराटोरियम देण्यात आला आहे. (3) त्यानुसार, शेतक-यांना दंडात्मक व्याज द्यावे लागु नये व त्याचवेळी त्याचे व्याज अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेणे सुरुच राहण्याची खात्री करण्यासाठी, मार्च 1, 2020 ते मे 31, 2020 दरम्यान देय असलेली किंवा देय होणारी खाती असलेल्या शेतक-यांना, प्रति शेतकरी रु.3 लाख पर्यंतच्या, लघु मुदत पीक कर्जासाठीच्या परतफेडीसाठीच्या विस्तारित कालावधीसाठी, शेतक-यांना 2% आयएस व 3% पीआरआयउपलब्ध होणे सुरुच ठेवण्याचे सरकारने ठरविले आहे. (4) ह्यासाठी बँकांना सांगण्यात येते की त्यांनी, ज्यांची खाती मार्च 1, 2020 ते मे 31, 2020 दरम्यान ड्यु झाली आहेत किंवा होणार आहेत अशा शेतक-यांना, प्रति शेतकरी रु.3 लाख पर्यंतच्या लघु मुदत पीक कर्जांसाठी 2% आयएस व 3% पीआरआयचा लाभ देऊ करावा. (5) इतर सर्व अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. आपली विश्वासु, (सोनाली सेन गुप्ता) |