RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78508899

वर्ष 2017-18 मधील लघु मुदतीच्या पीक कर्जांसाठी व्याज-वित्तसहाय्य योजना

आरबीआय/2017-18/48
एफआयडीडी.सीओ.एफएसडी.बीसी.क्र.14/05.02.001/2017-18

ऑगस्ट 16, 2017

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व सीईओ,
सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व अनुसूचित वाणिज्य बँका

महोदय/महोदया,

वर्ष 2017-18 मधील लघु मुदतीच्या पीक कर्जांसाठी व्याज-वित्तसहाय्य योजना

कृपया आमचे परिपत्रक एफआयडीडी.सीओ.एफएसडी.बीसी.क्र.29/05.02.001/2016-17 दि. मे 25, 2017 चा संदर्भ घ्यावा. त्यात आम्ही, हंगामी धर्तीवर व्याज अर्थसहाय्य योजना सुरु ठेवण्यात आल्याचे सांगितले होते. ह्याबाबत, येथे सांगण्यात येते की, वर्ष 2017-18 साठीही भारत सरकारने, रु.3 लाखांपर्यंतच्या लघु मुदतीच्या पीक कर्जांसाठी व्याज अर्थ सहाय्य योजनेची अंमलबजावणी करण्यास पुढील अटींवर मंजुरी दिली आहे.

(1) वर्ष 2017-18 मध्ये शेतक-यांना, रु.3 लाख पर्यंतची लघु मुदतीची पीक कर्जे, दरसाल 7% व्याजाने उपलब्ध करुन देण्यासाठी, कर्ज देणा-या संस्थांना - उदा. सार्वजनिक क्षेत्रातील बँका (पीएसबी), खाजगी क्षेत्रातील वाणिज्य बँका केवळ त्यांच्या ग्रामीण व अर्ध ग्रामीण शाखांनी दिलेल्या कर्जांबाबत) ह्यांना, त्यांनी त्यांचे स्वतःचे स्त्रोत वापरले असल्यास, 2% व्याज अर्थसहाय्य देण्याचे ठरविण्यात आले आहे. हे 2% व्याज अर्थसहाय्य, त्या पीक कर्ज रकमेवर, कर्ज दिल्याच्या/प्रत्यक्ष घेतल्याच्या तारखेपासून, शेतक-याने कर्जाची प्रत्यक्ष परतफेड केल्याच्या तारखेपर्यंत, किंवा बँकेने ठरविलेल्या कर्ज फेडीच्या तारखेपर्यंत (ह्यापैकी जे आधी असेल ते), कमाल एक वर्षाच्या मर्यादेच्या अटीवर काढले/गणले जाईल.

(2) कर्जाची वेळेवारी परतफेड करणा-या शेतक-यांना, (म्हणजे पीक कर्जाच्या वाटपाच्या तारखेपासून ते शेतक-यांनी प्रत्यक्षात कर्जाची परतफेड केल्याच्या तारखेपर्यंत, किंवा बँकेने ठरविलेल्या परतफेडीच्या तारखेपर्यंत (ह्यातील जे आधी असेल ते)) कमाल एक वर्षाच्या कालावधीसाठी, दरसाल 3% अतिरिक्त व्याज अर्थसहाय्य उपलब्ध करणे. ह्याचाच अर्थ, वरीलप्रमाणे त्वरित कर्जफेड करणा-या शेतक-यांना, वर्ष 2017-18 मध्ये दरसाल 4% दराने, लघु मुदतीचे पीक कर्ज उपलब्ध असेल.

(3) नाईलाजाने करावयाची विक्री थांबविण्यासाठी व त्यांचे उत्पाद गोदामांमध्ये साठवून ठेवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, ह्या व्याज-अर्थसहाय्याचा लाभ, किसान कार्ड धारक असलेल्या छोट्या व सीमान्त शेतक-यांनाही, त्या पिकाची कापणी झाल्यानंतर, आणखी सहा महिन्यापर्यंत मिळेल. आणि त्यासाठीचा व्याजदर, वेअर हाऊसिंग डेवलपमेंट रेग्युलेटरी ऑथोरिटी (डब्ल्युडीआरए) कडून मान्यता मिळालेल्या गोदामांमध्ये साठविलेल्या धान्यावर संक्राम्य गोदाम पावत्या विरुध्द देण्यात येणा-या पीक कर्जाच्या व्याजदराएवढाच असेल.

(4) नैसर्गिक आपत्तींनी बाधित झालेल्या शेतक-यांना सहाय्य देण्यासाठी, पुनर् रचित केलेल्या कर्जांवर, बँकांना पहिल्या वर्षासाठी, दरसाल 2% व्याज अर्थसहाय्य उपलब्ध केले जाईल. दुस-या वर्षापासून पुढे मात्र, अशा पुनर्रचित कर्जांना नेहमीचा व्याजदर लागु असेल.

(5) अनेक ठिकाणांवरुन कर्ज घेणे टाळण्यासाठी व सुवर्ण-कर्ज-योजनेच्या मार्फत केवळ ख-या शेतक-यांनाच सवलतयुक्त कर्ज मिळण्याची खात्री करुन घेण्यासाठी, कर्ज देणा-या संस्थांनी त्याबाबत परिश्रम घेऊन माहिती गोळा करावी, आणि अशा हेतूसाठी शेतक-याने सुवर्ण-कर्ज घेतले असले तरीही, जमीनीच्या तपशीलासह योग्य ते कागदपत्र ठेवावेत.

(6) व्याज अर्थसहाय्य योजनेखाली, शेतक-यांना विना अडचण कर्ज मिळण्यासाठी, 2017-18 मध्ये लघु मुदतीची पीक कर्जे देण्यासाठी/मिळविण्यासाठी आधार जोडणी अपरिहार्य करण्यास बँकांना सांगण्यात येत आहे.

(2) ऑगस्ट 11, 2017 च्या आमच्या ई-मेल अनुसार, कर्ज देणा-या सर्व बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी, 2015-16 साठीचे, ऑडिट केलेले व प्रलंबित असलेले पात्र असलेले दावे उशीरात उशीरा ऑगस्ट 31, 2017 पर्यंत पाठवावेत. कृपया नोंद घ्यावी की, कोणत्याही परिस्थितीत ह्याबाबत मुदतवाढ दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे, आमचे परिपत्रक आरबीआय/2016-17/32 एफआयडीडी.सीओ.एफएसडी.बीसी.क्र.9/05.02.001/2016-17,दि. ऑगस्ट 4, 2016 मध्ये दिलेल्या कार्यरीतीनुसार, 2016-17 साठीचे दावेही दिलेल्या कालावधीमध्ये सादर केले जावेत.

(3) शेतक-यांना लाभ घेता यावा ह्यासाठी, व्हील योजनेला पुरेशी प्रसिध्दी दिली जावी.

(4) ह्याशिवाय खाली दिल्याप्रमाणे सांगण्यात येत आहे.

(1) 2% व्याज अर्थसहाय्य व 3% अतिरिक्त अर्थसहाय्य ह्याबाबतचे दावे, अनुक्रमे नमुना 1नमुना 2 मध्ये (सोबत जोडल्याप्रमाणे) दिल्यानुसार, मुख्य महाव्यवस्थापक, वित्तीय समावेशन व विकास विभाग, भारतीय रिझर्व बँक, केंद्रीय कार्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - 400001 ह्यांचेकडे सादर केले जावेत.

(2) 2% व्याज सहाय्याच्या बाबतीत, बँकांनी त्यांचे दावे सहामाही धर्तीवर, सप्टेंबर 10, 2017 रोजी व मार्च 31, 2018 रोजी असल्यानुसार सादर करावयाचे असून, मार्च 31, 2018 रोजीच्या दाव्यांसोबत, मार्च 31, 2018 रोजी संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी, व्याजसहाय्याबाबतचे दावे सत्य व खरे असल्याबाबत, वैधानिक ऑडिटरने दिलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. 2017-18 मध्ये केलेल्या वाटपाबाबत असलेले व मार्च 31, 2018 रोजीच्या दाव्यांमध्ये समाविष्ट न केलेले उर्वरित दावे वेगळ्याने एकत्रित करुन ‘अतिरिक्त दावा’ ह्या शीर्षकाखाली, तसेच त्यांच्या सत्यतेबाबत, वैधानिक ऑडिटरने दिलेल्या प्रमाणपत्रासह सादर केले जावेत.

(3) 3% अतिरिक्त सहाय्याबाबत, बँकांनी, 2017-18 ह्या संपूर्ण वर्षात केलेल्या वाटपा संबंधीचे एकत्रित दावे, त्यांच्या खरेपणाविषयी वैधानिक ऑडिटरने दिलेल्या प्रमाणपत्रासह, एकदाच व उशीरात उशीरा एप्रिल 30, 2019 पर्यंत सादर करावेत.

आपला विश्वासु,

(अजय कुमार मिस्रा)
मुख्य महाव्यवस्थापक

सोबत: वरील प्रमाणे


नमुना 1

वर्ष 2017-18 साठी, रु.3 लाख पर्यंतच्या लघु-मुदत-पीक कर्जांवरील 2 टक्के व्याज-अर्थसहाय्यासाठीचे दावे

बँकेचे नाव __________________________________________

सप्टेंबर 2017/मार्च 2018 अखेर संपलेल्या सहामाहीसाठी/अतिरिक्त दाव्यांसाठी विवरणपत्र

  दरसाल 7% दराने एकूण लघु मुदत उत्पादन खर्च दावा केलेल्या सहाय्याची रक्कम (प्रत्यक्ष रुपयात)
खात्यांची संख्या (हजारांमध्ये) - रक्कम (रु.लाख)
रु.50,000/- पर्यंतची कर्जे      
रु.50,000/- पेक्षा अधिक व रु.3 लाख पर्यंतची कर्जे      
एकूण बेरीज      

आम्ही येथे प्रमाणित करतो की, वर्ष 2017-18 दरम्यान, लघु मुदत उत्पादन कर्जाच्या स्वरुपात, दरसाल 7% दराने रु.3 लाखापर्यंतची वरील कर्जे आम्ही शेतक-यांना दिली आहेत.

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

तारीख

(हा दाव्याचा नमुना वैधानिक ऑडिटर्सनी, त्यांचा कंपनी पंजीकरण क्रमांक आणि सर्व स्वाक्षरीर्कत्याला सभासदत्व क्रमांक ह्यासह प्रमाणित करावयाचा आहे.)


नमुना 2

वर्ष 2017-18 मध्ये वाटप केलेल्या रु.3 लाखापर्यंतच्या लघु मुदत पीक कर्जांच्या मुदतीत/वेळेवर परतफेड केली असल्याने, अतिरिक्त 3 टक्के व्याजसहाय्यासाठीचा एकदाच करावयाचा दावा

बँकेचे नाव __________________________________________

  रु.3 लाख पर्यंतचे एकूण लघुमुदत उत्पादन कर्ज वेळेवर परतफेड केलेले एकूण लघुमुदत उत्पादन कर्ज 3% दराने दावा केलेल्या अतिरिक्त सहाय्याची रक्कम (रु.प्रत्यक्षात)
खात्यांची संख्या (हजारांमध्ये) रक्कम (रु.लाख) खात्यांची संख्या (हजारामध्ये) रक्कम
(रु. लाख)
रु.50,000/- पर्यंतची कर्जे          
रु.50,000/- पेक्षा अधिक व रु.3 लाख पर्यंतची कर्जे.          
एकूण बेरीज          

आम्ही येथे प्रमाणित करतो की, हा दावा करण्यासाठीची वरील कर्जे वेळेवारी परत करण्यात आली होती आणि अतिरिक्त 3% सहाय्याचा लाभ, त्या खातेधारकांना देण्यात आला असल्याने, 2017-18 मध्ये ह्या शेतक-यांना रु.3 लाख पर्यंत दिलेल्या लघु मुदत उत्पादन कर्जांसाठीचा अशा शेतक-यांसाठीचा व्याजदर दरसाल 4% एवढा खाली आला आहे.

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

तारीख

(हा दाव्याचा नमुना, वैधानिक ऑडिटर्सनी, त्यांचा कंपनी पंजीकरण क्रमांक, आणि सर्व स्वाक्षरीर्कत्याचा सभासदत्व क्रमांक ह्यासह प्रमाणित करावयाचा आहे.)

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?