<font face="mangal" size="3">मोठ्या कॉर्पोरेट कर्जदारांसाठी लीगल एंटीटी - आरबीआय - Reserve Bank of India
मोठ्या कॉर्पोरेट कर्जदारांसाठी लीगल एंटीटी आयडेंटीफायर (वैधानिक संस्था - ओळखदाता) ची सुरुवात
आरबीआय/2017-18/82 नोव्हेंबर 2, 2017 सर्व अनुसूचित बँका (प्रादेशिक बँका सोडून) महोदय/महोदया, मोठ्या कॉर्पोरेट कर्जदारांसाठी लीगल एंटीटी आयडेंटीफायर (वैधानिक संस्था - ओळखदाता) ची सुरुवात जागतिक वित्तीय आणीबाणी नंतर, अधिक चांगल्या जोखीम व्यवस्थापनासाठी, वित्तीय माहिती प्रणालीचा दर्जा व बिनचुकपणा सुधारण्यासाठी एक महत्वाचा उपाय म्हणून लीगल एंटीटी आयडेंटीफायर कोड (एलईआय) कडे पाहिले जाते. जगामधील वित्तीय व्यवहारांमधील पक्षांची ओळख पटविण्यासाठी, एलईआय हा एक 20 अंकी संकेत (कोड) आहे. (2) परिपत्रक आरबीआय/2016-17/314 एफएमआरडी.एफएमआयडी.क्र.14/11.01.007/2-16-17, दि. जून 1, 2017 अन्वये, ओटीसी डेरिवेटिव्ज मार्केटमध्ये भाग घेणारांसाठी, टप्प्या टप्प्याने एलईआयची अंमलबजावणी करण्यात आली आहे. (3) ऑक्टोबर 4, 2017 रोजीच्या, विकासात्मक व विनियामक धोरणांवरील निवेदनामध्ये निर्देशित करण्यात आले होते की, रु.5 कोटी व त्यापेक्षा अधिक असे निधी आधारित असलेल्या, व निधी आधारित नसलेल्या, बँकेच्या सर्व कर्जदारांमध्ये ही एलईआय प्रणाली टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात येईल (उतारा सोबत जोडला आहे). त्यानुसार असे ठरविण्यात आले आहे की, रु.50 कोटी व त्यापेक्षा अधिक एकूण एक्सपोझर असलेल्या त्यांच्या मोठ्या कॉर्पोरेट कर्जदारांना, बँका, जोडपत्रात दिलेल्या वेळापत्रकानुसार एलईआय घेण्यास/मिळविण्यास सांगतील. ह्या वेळापत्रकानुसार एलईआय न मिळविणा-या कर्जदारांना, कर्ज सुविधांचे नूतनीकरण/वाढ दिली जाणार नाही. रु.5 कोटी ते रु.50 कोटी दरम्यान एक्सपोझर असलेल्या कर्जदारांसाठी एक वेगळे वेळापत्रक लवकरच दिले जाईल. (4) बँकांनी, त्यांच्या मोठ्या कर्जदारांनी, त्यांच्या मूळ संस्था व दुय्यम संस्था तसेच सहाय्यक संस्थांसाठीही एलईआय प्राप्त करण्यास प्रोत्साहन द्यावे. (5) ग्लोबल लिगल एंटीटी आयडेंटीफायर फाऊंडेशन (जीएलईआयएफ), ह्या एलईआयची अंमलबजावणी व वापर करण्यास सहाय्य करणा-या संस्थेंकडून मान्यता मिळालेल्या कोणत्याही स्थानिक कार्यकारी एककाकडून (एलओयु) संस्था एलईआय मिळवू शकतात. भारतामध्ये, हा एलईआय कोड, लीगल एंटीटी आयडेंटीफायर इंडिया लि. (एलईआयआयएल), (क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (सीसीआयएल) ची दुय्यम संस्था) कडून मिळविला जाऊ शकतो आणि ही संस्था, प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम 2007 खाली, एलईआय देणारी संस्था म्हणून आरबीआयकडून ओळखण्यात आली असून, एलईआय देण्यासाठी व एलईआयचे व्यवस्थापन करण्यासाठीची भारतामधील स्थानिक कार्यकारी एकक (एलओयु) म्हणून, जीएलईआयएफ कडून मान्यता मिळालेली संस्था आहे. (6) ह्याबाबतचे नियम, कार्यरीती व कागदपत्रे ठेवण्याच्या आवश्यकता एलईआयएलकडून प्राप्त केल्या जाव्यात. (7) एलईआय कोड मिळविल्यानंतर, जीएलईआयएफच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, कर्जदार त्यांचे कोड्स नूतनीकृत करत आहेत ह्याची बँकानी खात्री करुन घ्यावी. (8) हे निदेश/सूचना, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 21 व कलम 35(अ) खाली देण्यात आले आहेत. आपला विश्वासु, (एस.एस. बारीक) ऑक्टोबर 4, 2017 रोजीच्या विकासात्मक व विनियामक धोरणावरील निवेदनामधील उतारा (5) लीगल एंटीटी आयडेंटीफायर (एलईआय) : निधी आधारित असलेले व निधी आधारित नसलेले कोणत्याही बँकेतील एकूण रु.5 कोटी व त्यापेक्षा अधिक एकूण एक्सपोझर असलेल्या कॉर्पोरेट कर्जदारांनी, लीगल एंटीटी आयडेंटीफायर (एलईआय) पंजीकरण करणे आणि ते, सेंट्रल डिपॉझिटरी ऑफ इन्फर्मेशन ऑन लार्ज क्रेडिट्स (सीआरआयएलसी) मध्ये नोंदवणे. बँकांनी, त्या कॉर्पोरेट कर्जदारांसाठी अपरिहार्य करावे असे ठरविण्यात आले आहे. ह्यामुळे, गटांनी घेतलेल्या एकूण कर्जाचे मूल्यमापन करण्यास, आणि एखाद्या संस्थेच्या गटाच्या वित्तीय रुपरेषेवर देखरेख ठेवण्यास मदत होईल. ह्या आवश्यकतेची अंमलबजावणी एका आखीव परंतु कालबध्द रितीने केली जाईल त्याबाबतच्या आवश्यक सूचना, ऑक्टोबर 2017 च्या अखेरपर्यंत दिल्या जातील. एलईआय च्या अमंल बजावणी साठीचे वेळापत्रक
|