रुपयाचे चिन्ह (₹) व ‘L’ हे इनसेट अक्षर असलेल्या रु.1 मूल्याच्या चलनी नोटा प्रसृत
मार्च 29, 2016 रुपयाचे चिन्ह (₹) व ‘L’ हे इनसेट अक्षर असलेल्या रु.1 मूल्याच्या चलनी नोटा प्रसृत भारतीय रिझर्व बँक लवकरच एक रुपया मूल्याच्या चलनी नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नोटा भारत सरकारद्वारे छापण्यात आल्या आहेत. कॉईनेज अधिनियम, 2011 मध्ये दिल्यानुसार ह्या नोटा वैध चलन असतील. ह्याच मूल्याच्या सध्या प्रसारात असलेल्या नोटाही वैध चलन असणे सुरुच राहील. भारतीय राजपत्र - असामान्य - भाग 2, विभाग 3, पोटविभाग(i) क्र. 124 दि. फेब्रुवारी 24, 2016 मध्ये प्रसिध्द केलेल्या, वित्त मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग ह्यांच्या अधिसूचना क्र. जीएसआर, 192(ई), दि. फेब्रुवारी 22, 2016 मध्ये निर्देशित केल्यानुसार ह्या एक रुपयाचा नोटांचा आकार व घडण पुढीलप्रमाणे असेल.
ह्या एक रुपयाच्या नोटेचे डिझाईन पुढीलप्रमाणे असेल : दर्शनी बाजू : ह्यावर, वित्त सचिव श्री रतन पी. वाताल ह्यांच्या द्वैभाषिक स्वाक्षरीसह “गव्हर्मेंट ऑफ इंडिया” ह्या शब्दांच्या वर “भारत सरकार” हे शब्द आहेत. त्याचबरोबर त्यावर नवीन एक रुपयाच्या नाण्याचे चित्र, “सत्यमेव जयते” हे शब्द ₹ हे चिन्ह व 2016 हे वर्ष व त्याचबरोबर, अंक फलकामध्ये एल हे इनसेट अक्षर असेल. ह्या नोटेच्या उजवीकडील खालच्या बाजूवर काळ्या रंगात नंबरिंग (क्रमांक) असेल. मागील बाजू : ह्या बाजूवर “गव्हर्मेंट ऑफ इंडिया” ह्या शब्दांच्या वर “भारत सरकार” हे शब्द 2016 ह्या छपाईच्या वर्षासह असतील. तसेच एक रुपयाच्या नाण्याचे चित्र असेल व फुलांच्या डिझाईनसह ₹ हे चिन्ह असेल व त्याच्या सभोवार “सागर सम्राट” ह्या तेल अन्वेषक मंचाचे चित्र आणि भाषा कलमात नोटेचे मूल्य पंधरा भारतीय भाषांमध्ये छापलेले असेल आणि आंतरराष्ट्रीय अंकामध्ये मध्य भागाच्या खालच्या बाजूस छपाईचे वर्ष दिले असेल. सर्वसमावेशक रंग योजना : एक रुपयाच्या पुढील व मागील बाजूंवर इतर रंगांसह ह्या नोटेचा रंग मुख्यत्वेकरुन गुलाबी-हिरवा असेल. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2282 |
पेज अंतिम अपडेट तारीख: