<font face="mangal" size="3px">रुपयाचे चिन्ह (<span style="font-family:Arial;">₹</span>) व इनसेट अक्षर (U) ह्यासह  - आरबीआय - Reserve Bank of India
78484235
प्रकाशित तारीख जून 11, 2015
रुपयाचे चिन्ह (₹) व इनसेट अक्षर (U) ह्यासह रु.10 च्या बँक नोटांचे वितरण
जून 11, 2015 रुपयाचे चिन्ह (₹) व इनसेट अक्षर (U) ह्यासह रु.10 च्या बँक नोटांचे वितरण भारतीय रिझर्व बँक लवकरच महात्मा गांधी मालिका -2005 मधील “₹” हे चिन्ह दर्शनी व मागील बाजूवर असलेल्या, दोन्हीही नंबरिंग पॅनल्समध्ये “U” हे अक्षर इनसेट असलेल्या आणि मागील बाजूवर, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी. राजन ह्यांची सही व छापण्याचे वर्ष ‘2015’ असलेल्या, रु.10 च्या नोटा प्रसृत करणार आहे. प्रसृत केल्या जाणा-या ह्या नोटांचे डिझाईन, पूर्वी दिल्या गेलेल्या महात्मा गांधी मालिका- 2005 मधील रु.10 च्या नोटांप्रमाणेच असेल. रिझर्व बँकेने भूतकाळात प्रसृत केलेल्या रु.10 च्या नोटा वैध चलन असणे सुरुच राहील. अजित प्रसाद वृत्तपत्रासाठी निवेदन 2014-2015/2632 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?