रु.2,000 च्या बँक नोटा प्रसृत
नोव्हेंबर 08, 2016 रु.2,000 च्या बँक नोटा प्रसृत भारतीय रिझर्व बँक लवकरच, इनसेट लेटर नसलेल्या आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या व बँक नोटेच्या मागील बाजूवर 2016 हे छपाईचे वर्ष असलेल्या महात्मा गांधी मालिका (नवी) मधील रु.2,000 मूल्याच्या नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नवीन नोटेच्या मागील बाजूवर, आंतर ग्रहीय अंतराळातील आपल्या देशाच्या प्रथम मोहिमेचे चिन्ह म्हणून मंगळ यानाचे चित्र छापले आहे. ह्या नोटांचा बेस कलर मॅजेंडा आहे. ह्या नोटेवर, सर्वसाधारण रंग योजनेशी मेळ असणारी इतरही डिझाईन्स, भूमितीय आकृती, दर्शनी व मागील अशा दोन्हीही बाजूंवर दिल्या आहेत.
ह्या नोटांची मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे असतील.
अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1144 |
पेज अंतिम अपडेट तारीख: