RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78489802

अंकफलकामध्ये ‘ई’ ह्या इनसेट अक्षरासह ‘स्टार,’ ता-याचे चिन्ह असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवी) रु.500 च्या बँक नोटांचे प्रसारण

डिसेंबर 16, 2016

अंकफलकामध्ये ‘ई’ ह्या इनसेट अक्षरासह ‘स्टार,’ ता-याचे चिन्ह असलेल्या, महात्मा गांधी
मालिकेमधील (नवी) रु.500 च्या बँक नोटांचे प्रसारण

भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंकफलकांमध्ये ‘ई’ हे इनसेट अक्षर असलेल्या, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांची सही असलेल्या आणि बँक नोटेच्या मागील बाजूवर स्वच्छ भारत लोगो व ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवी) रु.500 च्या नोटा वितरीत करणार आहे.

वरील नोटांपैकी काही नोटांवर ‘*’ (स्टार) हे अतिरिक्त चिन्ह, अंकफलकातील प्रिफिक्स व अंक ह्यांच्या मधील जागेत असेल. ह्या नोटा असलेल्या गड्डीत (पॅकेट) नेहमीप्रमाणेच 100 नोटा असतील, परंतु त्या अनुक्रम-निहाय नसतील. स्टार असलेल्या नोटांची पॅकेट्स सुलभतेने ओळखता येण्यासाठी, ह्या स्टार युक्त नोटा असलेल्या पॅकेट्स वरील पट्ट्या (बँड्स), त्या पॅकेटमध्ये अशा नोटा असल्याचे स्पष्टपणे दर्शवतील. स्टार असलेल्या रु.500 च्या नोटा सर्वप्रथम आताच वितरित केल्या जात आहेत. स्टार असलेल्या, रु.10, 20, 50 व 100 मूल्याच्या बँक नोटा ह्यापूर्वीच प्रसारात आल्या आहेत. ह्या स्टार युक्त नोटांबाबतची मिमांसा व सुरुवात, आमच्या वृत्तपत्र निवेदन 2005-2006/1337 दि. एप्रिल 19, 2006 मध्ये आधीच सविस्तरपणे देण्यात आली आहे.

नोव्हेंबर 8, 2016 पासून देण्यात आलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवी) रु.500 च्या सर्व बँक नोटा, वैध चलन असणे सुरुच राहील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1549

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?