<font face="mangal" size="3">किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना - पशुपालन व ë - आरबीआय - Reserve Bank of India
किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना - पशुपालन व मत्स्यपालन उद्योगांसाठी कार्यकारी भांडवल
फेब्रुवारी 4, 2019 किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना - पशुपालन व मत्स्यपालन उद्योगांसाठी कार्यकारी भांडवल किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश, शेतक-यांना लघु मुदतीच्या पीक कर्जांसाठी, लवचिक व सुलभ कार्यरीतीद्वारे एकाच खिडकीतून बँकिंग प्रणालीकडून पुरेसे व वेळेवर कर्ज सहाय्य उपलब्ध करुन देणे हा आहे. ह्या योजनेची कार्यकारी लवचिकता, पशुपालन व मत्स्यपालन उद्योग करणारांनाही मिळावी ह्यासाठी अशा शेतक-यांनाही केसीसीच्या ह्या सुविधा दिल्या जाण्याबाबतचा निर्णय, भारत सरकारने, 2018-19 च्या अंदाजपत्रकात घोषित केला होता. ह्या बाबीची तपासणी करण्यात आली व सर्व स्टेक होल्डर्सशी विचार विनिमय केल्यानंतर ठरविण्यात आले की, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) च्या सुविधा, पशुपालन करणारे शेतकरी व मत्स्यपालन करणारांनाही त्यांच्या कार्यकारी भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिल्या जाव्यात. अनिरुध्द डी. जाधव वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1839 |