<font face="mangal" size="3">लीगल एंटिटी आयडेंटिफायर - अंतिम तारखेचा विस् - आरबीआय - Reserve Bank of India
लीगल एंटिटी आयडेंटिफायर - अंतिम तारखेचा विस्तार
आरबीआय/2019-20/185 मार्च 27, 2020 प्रति, सर्व पात्र असणारे मार्केटमधील सहभागी महोदय /महोदया, लीगल एंटिटी आयडेंटिफायर - अंतिम तारखेचा विस्तार नॉन-डेरिवेटिव मार्केट्समध्ये भाग घेण्यासाठी, लीगल एंटिटी आयडेंटिफायर (एलईआय) च्या आवश्यकतेवरील भारतीय रिझर्व बँकेने दिलेले परिपत्रक एफएमआरडी. एफएमआयडी.क्र.10/11.01.007/2018-19 दि. नोव्हेंबर 29, 2018 चा संदर्भ घ्यावा. त्याचप्रमाणे, नॉन-डेरिवेटिव मार्केट्स साठी एलईआयच्या अंमलबजावणीसाठीच्या सुधारित कालरेषांवरील परिपत्रक एफएमआरडी.एफएमआयडी.क्र.15/11.01.007/2018-19 दि. एप्रिल 26, 2019 चाही संदर्भ घेतला जावा. (2) मार्केटमधील सहभागींचा फीडबॅक व केलेल्या विनंत्या ह्यावर आधारित आणि कॉरोना व्हायरस डिझीज (कोविड-19) च्या साथीमुळे आलेल्या अडचणींच्या संदर्भात आणि नॉन-डेरिवेटिव मार्केट्समध्ये एलईआय प्रणालीची अंमलबजावणी अधिक सुलभतेने करता यावी ह्यासाठी, अंमलबजावणीची (टप्पा 3) कालरेषा पुढीलप्रमाणे विस्तारित करण्यात आली आहे.
(3) ह्या सूचना, भारतीय रिझर्व्ह बँक, अधिनियम 1934 च्या कलम 45 यु सह वाचित कलम 45 डब्ल्यु खाली देण्यात आल्या आहेत. आपली विश्वासु, (डिंपल भांदिया) |