<font face="mangal" size="3">अकार्यकारी खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवé - आरबीआय - Reserve Bank of India
अकार्यकारी खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवण्याबाबत दंडात्मक आकार लावणे
आरबीआय/2013-14/580 मे 6, 2014 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सोडून) महोदय/महोदया अकार्यकारी खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवण्याबाबत दंडात्मक आकार लावणे कोणत्याही अकार्यकारी खात्यामध्ये किमान शिल्लक न ठेवल्यास दंडात्मक आकार न लावणे ह्यासारख्या ग्राहक संरक्षणाचे काही उपाय प्रायोजित करण्याबाबत एप्रिल 1, 2014 रोजी घोषित केलेल्या, प्रथम द्वैमासिक नाणेविषयक धोरण 2014-15 च्या विभाग ब चा कृपया संदर्भ घ्यावा. (2) ह्या संदर्भात, आपले लक्ष, बचत खात्यामधील किमान शिल्लक वरील आमचे परिपत्रक डीबीओडी.डीआयआर बीसी क्र. 53/13.10.00/2002-03 दि. डिसेंबर 26, 2002 कडे वेधण्यात येत आहे. त्यात आम्ही बँकांना सांगितले होते की, त्यांनी, बँक खाते उघडतेवेळीच, बचत बँक खात्यात किमान रक्कम ठेवण्याची आवश्यकता व ती न ठेवल्यास लागु होणारे दंडात्मक आकार, ह्याबाबत त्यांच्या ग्राहकांना पारदर्शकतेने माहिती द्यावी. (3) ह्याशिवाय, वित्तीय समावेशन - बँक सेवा मिळविणे पायाभूत बचत बँक ठेवीखाली वरील आमचे परिपत्रक डीबीओडी.डीआयआर बीसी क्र. 35/09.07.005/2012-13दि. ऑगस्ट 10, 2012 च्या परिच्छेद 3 अन्वये, बँकांना सांगण्यात आले होते की, पायाभूत बचत बँक ठेवी खात्यांच्या (बीएस बीडीए) अकार्यकरीपणावर/सुरु करण्यावर कोणताही आकार लावला जाऊ नये. (4) येथे सांगण्यात येत आहे की, ह्यापुढे, कोणत्याही अकार्यकारी खात्यात किमान शिल्लक न ठेवली गेल्यास, त्यासाठी दंडात्मक आकार लावण्यास बँकांना परवानगी नाही. आपला मुख्य महाव्यवस्थापक. |