<font face="mangal" size="3">विद्यमान रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक् - आरबीआय - Reserve Bank of India
विद्यमान रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून घेणे/बाद करणे - रोख रक्कम काढण्यासाठी मर्यादा
आरबीआय/2016-2017/123 नोव्हेंबर 10, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी महोदय विद्यमान रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून घेणे/बाद करणे - रोख रक्कम काढण्यासाठी मर्यादा कृपया आमचे परिपत्रक डीसीएम (पीएलजी) क्र..1226/10.27.00/2016-17 दिनांक नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा. (2) ह्या परिपत्रकाच्या परिच्छेद 3 क(4) अनुसार, ह्या अधिसूचनेच्या तारखेपासून ते 24 नोव्हेंबर 2016 रोजी कामकाज बंद होईपर्यंत एखाद्या खात्यामधील काऊंटरवर काढावयाची रोख रक्कम मर्यादा प्रति दिवस रु.10000/- व प्रति सप्ताह, सर्वसमावेशक रु.20,000/- असेल. त्यानंतर ह्या मर्यादांचे पुनरावलोकन केले जाईल. येथे स्पष्ट करण्यात येते की, बँक खात्यामधून पुढील प्रकारे रोख रक्कम काढण्यासाठी ह्या मर्यादा लागु नाहीत.
(3) करन्सी चेस्ट ठेवणा-या शाखांना सांगण्यात येते की, त्यांनी त्यांच्या जवळपास असलेल्या (जोडलेल्या किंवा अन्यथा) शाखांच्या रोख रकमेबाबतच्या विनंत्या समावून घ्याव्यात. (4) सर्व प्रकारच्या ठेवी/कर्ज खात्यात विहित बँक नोटा जमा करण्यास, सीटीआर/एसटीआर अहवाल पाठविण्याच्या अटीवर परवानगी आहे. आपली विश्वासु (पी.विजया कुमार) |