अ-कृषिक अंतिम उपयोजकांसाठी सुवर्ण अलंकार व दागिने विरुध्द कर्जे
आरबीआय/2020-21/19 ऑगस्ट 6, 2020 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय/महोदया, अ-कृषिक अंतिम उपयोजकांसाठी सुवर्ण अलंकार व दागिने विरुध्द कर्जे. कृपया, परिपत्रक डीबीओडी.क्र.बीपी.बीसी.27/21.04.048/2014-15 दि. जुलै 22, 2014 आणि डीबीआर.आरआरबी.बीसी.क्र.53/31.01.001/2016-17 दि. फेब्रुवारी 16, 2017 चा संदर्भ घ्यावा. विद्यमान असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांखाली, बँकांनी सुवर्णालंकार व दागदागिन्यांविरुध्द मंजुर केलेली कर्जे, त्या सुवर्णालंकार व दागिन्यांच्या मूल्याच्या 75% पेक्षा जास्त असू नयेत. (2) घरसंसार, उद्योजक व छोटे उद्योग ह्यांच्यावर कोविड-19 ह्या देशव्यापी साथीचा झालेला आर्थिक आघात कमी करण्यासाठी, सुवर्णालंकार व दागिन्यांच्या गहाणावटी विरुध्द बिगर-शेतकी हेतूंसाठी, कर्ज : मूल्य गुणोत्तर (एलटीव्ही) 75% पासून 90% पर्यंत वाढविण्याचे ठरविण्यात आले आहे. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या तात्पुरत्या तरलता असमतोलांसाठी कर्जदारांना मदत व्हावी ह्यासाठी हे वाढीव एलटीव्ही गुणोत्तर मार्च 31, 2021 पर्यंत लागु असेल. त्यानुसार, एप्रिल 1, 2021 रोजी किंवा त्यानंतर मंजुर केलेल्या नवीन सुवर्ण कर्जांचे एलटीव्ही गुणोत्तर 75% असेल. (3) वरील परिपत्रकांमधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. आपला विश्वासु, (सौरव सिन्हा) |
पेज अंतिम अपडेट तारीख: