रब्बी पीक हंगामासाठी रोकड उपलब्ध करणे - बँकांना सल्ला
आरबीआय/2016-17/148 नोव्हेंबर 22, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय, रब्बी पीक हंगामासाठी रोकड उपलब्ध करणे - बँकांना सल्ला आपणास माहितच आहे की, रब्बी पिकाचा हंगाम सुरु झाला असून, शेतीची कामे विना अडचण होण्याची खात्री करण्यासाठी शेतक-यांना सुयोग्य आर्थिक आधार दिला गेला पाहिजे. (2) प्रति सप्ताह रु.10,000/- कोटीच्या दराने शेतक-यांना पीक कर्जे मंजुर करण्यासाठी व देण्यासाठी डीसीसीबींना, सुमारे रु.35,000/- कोटींची गरज पडेल असा अंदाज आहे. पीएसीएस व शेतकरी ह्यांना आवश्यक असलेली पीक कर्जे वाटण्यासाठी डीसीसीबींना मदत व्हावी ह्यासाठी, नाबार्ड, सुमारे रु.23,000/- कोटी पर्यंतची स्वतःची कॅश क्रेडिट मर्यादा उपयोगात आणील. (3) ह्यापैकी कोणतीही कर्जे शेती संबंधित खर्च भागविण्यासाठी, रोख स्वरुपात दिली जातील. आम्ही ह्याबाबत बँकांना सांगत आहोत की, करन्सी चेस्ट असलेल्या बँकांनी, डीसीसीबी व आरआरबींना देण्यासाठी पुरेशी रोख रक्कम ठेवावी. सर्व वाणिज्य बँकांच्या (आरआरबी सह) ग्रामीण शाखांसाठीही पुरेशी रोख रक्कम ठेवली जावी. ह्याशिवाय, एपीएपसीमध्ये असलेल्या बँक शाखांनाही सुलभतेने मिळण्यासाठी पुरेशी रोख रक्कम पुरविली जावी. आपली विश्वासु, (पी विजया कुमार) |