<font face="mangal" size="3">महापरिपत्रक - दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट् - आरबीआय - Reserve Bank of India
महापरिपत्रक - दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (डीएवाय-एनयुएलएम)
आरबीआय/2016-17/10 जुलै 01, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक, महोदय/महोदया, महापरिपत्रक - दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (डीएवाय-एनयुएलएम) भारतीय रिझर्व बँकेने, भारत सरकारच्या, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयुएलएम) बाबत, म्हणजेच आता “दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (डीएवाय-एनयुएलएम)” हे नवीन नाव देण्यात आलेल्या योजनेबाबत, नियतकालिकतेने बँकांना सूचना/निदेश दिले आहेत. ह्या विषयावरील विद्यमान सूचना बँकांना एकाच जागी मिळाव्यात ह्यासाठी हे महापरिपत्रक देण्यात येत असून, त्यात आरबीआयने, जून 30, 2016 पर्यंत, डीएवायएनयुएलएमवर पूर्वी दिलेल्या सूचना एकत्रित करण्यात आल्या आहेत व त्यांची यादी परिशिष्टामध्ये दिली आहे. हे महापरिपत्रक आरबीआयच्या वेबसाईटवरही (/en/web/rbi) टाकण्यात आले आहे. कृपया पोच द्यावी. आपली विश्वासु, (उमा शंकर) |