RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78496301

महापरिपत्रक - खोट्या नोटा ओळखणे व जप्त करणे

आरबीआय/2016-17/22
डीसीएम (एफएनव्हीडी) जी-6/16.01.05/2016-17

जुलै 20, 2016

अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक, वाणिज्य बँका,
सहकारी बँका, आरआरबी, खाजगी बँका, परदेशी बँका
आणि सर्व राज्यांचे कोषागार संचालक

महोदय/महोदया,

महापरिपत्रक - खोट्या नोटा ओळखणे व जप्त करणे

खोट्या नोटा ओळखणे व जप्त करण्यासंबधाने, सप्टेंबर 28, 2015 पर्यंत दिल्या गेलेल्या एकत्रित केलेले आमचे महापरिपत्रक, डीसीएम(एफएनव्हीडी) जी-4/16.01.05/2015-16 दि. जुलै 1, 2015 (सप्टेंबर 28, 2015 रोजी अद्यावत केल;या प्रमाणे) चा कृपया संदर्भ घ्यावा. त्यानंतर हे महापरिपत्रक, आतापर्यंत दिल्या गेलेल्या सुचना समाविष्ट करुन अद्ययावत करण्यात आले असून ते आरबीआयच्या www.rbi.org.in ह्या वेबसाईटवरही टाकण्यात आले आहे.

आरबीआयने ह्या विषयावर दिलेल्या परिपत्रकांमधील सुचना एकत्रित करुन हे महापरिपत्रक तयार करण्यात आले असून त्या सुचना ह्या परिपत्रकाच्या तारखेसही जारी असणार आहेत.

आपला विश्वासु,

(पी विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक

सोबत : महापरिपत्रक


अनुक्रमणिका

परिच्छेद क्र. तपशील
1 खोट्या नोटा जप्त करण्याचे अधिकार
2 खोट्या नोटा ओळखणे
3 खोट्या नोटा जप्त करणे
4 भरणा करणाराला पावती देणे
5 खोट्या नोटा ओळखणे - पोलिस व इतर विभागांना कळविणे
6 काउंटर्सवर देण्यापूर्वी, एटीएममध्ये ठेवण्यापूर्वी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इश्यु ऑफिसेसना पाठवण्यापूर्वी बँक नोटांची तपासणी
7 नोडल बँक ऑफिसर नेमणे
8 बँकेच्या हेड ऑफिसमध्ये खोट्या नोटा सावधानता कक्ष स्थापन करणे
9 अल्ट्राव्हायोलेट दिवा व इतर पायाभूत सोयी उपलब्ध करणे
10 (I) बँक शाखा (II) सहकारी बँका आणि आरआरबी यांना माहिती कळविणे
11 पोलिस प्राधिकरणाकडून मिळालेल्या खोट्या नोटांचे जतन
12 खोट्या नोटा ओळखणे कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे
  जोडपत्र 1
  जोडपत्र 2
  जोडपत्र 3
  जोडपत्र 4
  जोडपत्र 5
  जोडपत्र 6
  जोडपत्र 7

भारतीय रिझर्व्ह बँक
चलन व्यवस्थापन विभाग
महापरिपत्रक - 2016-17

खोट्या नोटा ओळखणे व जप्त करणे

परिच्छेद 1 - खोट्या नोटा जप्त करण्याचे अधिकार

पुढील संस्था खोट्या नोटा जप्त करु शकतात -

  1. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सर्व शाखा

  2. खाजगी क्षेत्रातील बँका आणि विदेशी बँकांच्या सर्व शाखा.

  3. सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या सर्व शाखा.

  4. सर्व ट्रेझरीज व सब-ट्रेझरीज

  5. भारतीय रिझर्व्ह बँकेची इश्यु कार्यालये

परिच्छेद 2 - खोट्या नोटा ओळखणे

काऊंटरवर दिलेल्या/बँक ऑफिसमध्ये थेट दिलेल्या/मिळालेल्या/एकगठ्ठाने करन्सी चेस्टमध्ये दिलेल्या बँक नोटांची, त्यांच्या खरेपणाबाबतची तपासणी यंत्रांच्याद्वारे केली जावी.

काऊंटर किंवा बॅक ऑफिस/करन्सी चेस्टमध्ये मिळालेल्या/सापडलेल्या खोट्या नोटांसाठी ग्राहकाच्या खात्यात कोणतीही जमा करु नये.

कोणत्याही परिस्थितीत खोट्या नोटा, त्या सादर करणाराला परत दिल्या जाऊ नयेत किंवा बँक शाखा/ट्रेझरीद्वारे नष्ट केल्या जाऊ नयेत. बँकांना सापडलेल्या खोट्या नोटा जप्त न केल्या जाणे हे, संबंधित बँक, खोट्या नोटांचा प्रसार हेतुपूर्वक करत असल्याचे समजले जाईल, आणि त्यासाठी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देश क्र. 3158/09.39.00 (पॉलिसी)/2009-10 दि. नोव्हेंबर 19, 2009 चे उल्लंघन करण्यासाठी दंड लावला जाईल.

परिच्छेद 3 - खोट्या नोटा जप्त करणे

खोट्या म्हणून ओळखल्या गेलेल्या नोटांवर, नमुन्यानुसार (जोडपत्र 1) ‘काऊंटरफिट नोट’ शिक्का मारुन जप्त केल्या जाव्यात. जप्त केलेल्या प्रत्येक नोटेची सविस्तर माहिती एका वेगळ्या रजिस्टरमध्ये साक्षांकनासह नोंद करुन ठेवली जावी.

परिच्छेद 4 - सादरर्कत्याला पावती देणे

एखाद्या बँक शाखेच्या काऊंटरवर/बॅक ऑफिस व करन्सी चेस्ट किंवा ट्रेझरी मध्ये सादर केलेली नोट खोटी असल्याचे दिसून आल्यास वरील परिच्छेद 2 मध्ये दिल्याप्रमाणे तिच्यावर शिक्का मारुन, विहित केलेल्या नमुन्यात (जोडपत्र 2) त्याबाबतची पावती सादरर्कत्याला देण्यात यावी. ह्या पावतीवर धावता अनुक्रमांक असावा आणि त्यावर रोखपाल व सादरर्कत्याने साक्षांकन करावे. जनतेच्या माहितीसाठी अशा आशयाची नोटिस कार्यालये/शाखांमध्ये ठळकपणे प्रदर्शित केली जावी. सादरकर्ता त्यावर प्रतिस्वाक्षरी/काऊंटर-साईन करण्यास नकार देत असला तरीही अशी पावती दिली जावी.

परिच्छेद 5- खोट्या नोटा ओळखणे पोलिस व अन्य खात्यांना कळविणे

खोटी नोट सापडल्याचा प्रसंग पोलिसांना कळवितेवेळी पुढील कार्यरीत अवलंबिली जावी. केवळ एकाच व्यवहारात 4 खोट्या नोटा सापडल्यास, नोडल बँक ऑफिसरने, पोलिस प्राधिकरणाकडे किंवा नोडल पोलिस स्टेशनकडे, (जोडपत्र 3) मध्ये दिल्यानुसार एकत्रित अहवाल, महिन्याच्या अखेरीस शंकास्पद खोट्या नोटांसह सादर करावा.

केवळ एकाच व्यवहारात 5 किंवा अधिक खोट्या नोटा सापडल्यास, नोडल बँक ऑफिसरने स्थानिक पोलिस प्राधिकरणाकडे किंवा नोडल पोलिस स्टेशनकडे, त्या खोट्या नोटा, एफआयआर (जोडपत्र 4) दाखल करुन तपासासाठी पाठवाव्यात.

एकत्रित केलेल्या मासिक अहवालाची/एफआयआरची एक प्रत, ह्या बँकेच्या मुख्य कार्यालयातील फॉर्जड् नोट व्हिजिलन्स सेलकडे (फक्त बँकांच्या बाबतीत) व ट्रेझरीच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेच्या संबंधित इश्यु ऑफिसकडे पाठवावी.

संबंधित पोलिस प्राधिकरणाकडे पाठविलेल्या नोटा तसेच मासिक एकत्रित अहवाल व एफआयआर ह्यांच्याबाबत त्या पोलिस प्राधिकरणाकडून पोच घेतली जावी. पोलिसांकडे पाठविलेल्या खोट्या नोटा इन्शुअर्ड पोस्टने पाठविल्या असल्यास त्याबाबतची पोलिसांकडून मिळालेली पोचपावती न चुकता घेऊन रेकॉर्डमध्ये ठेवली जावी. पोलिसांकडून मिळालेल्या पोचपावतीसंबंधाने योग्य असा पाठ्पुरावा केला जाणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित विवरणपत्र स्वीकारण्यात/एफआयआर तयार करण्यात पोलिसांच्या उदासीनतेमुळे कार्यालये/शाखा ह्यांना अडचणी येत असल्यास, खोट्या बँक नोटांच्या प्रकरणांचा तपास करण्याबाबत समन्वय करण्यासाठी नेमलेल्या, पोलिस प्राधिकरणाच्या नोडल ऑफिसरशी सल्ला मसलत करुन त्या सोडवाव्यात. नोडल पोलिस स्टेशन्सची यादी रिझर्व्ह बँकेच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयांकडून मिळविता येईल.

अशा नोटा ओळखण्याबाबतचे नमुने/साचे व कल ह्यावरही बँकांनी देखरेख ठेवावी आणि असे संशयास्पद साचे/कल आरबीआय/पोलिस प्राधिकरणांच्या नजरेस ताबडतोब आणावेत.

पोलिस, आरबीआय इत्यादींना, खोट्या नोटांचा शोध व कळविणे ह्याबाबतची बँकांनी केलेल्या प्रगतीवर निरनिराळ्या राज्य स्तरीय समित्यांच्या (उदा. स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी (एसएलबीसी) स्टँडिंग कमिटी ऑन करन्सी मॅनेजमेंट (एससीसीएम), स्टेट लेव्हल सिक्युरिटी कमिटी (एसएलएससी) इ.) सभांमध्ये नियमितपणे चर्चा केली जावी

खाली परिच्छेद 10 मध्ये दिल्याप्रमाणे, शाखा व ट्रेझरी ह्यामध्ये सापडलेल्या खोट्या भारतीय नोटांसंबंधीची माहिती, रिझर्व्ह बँकेच्या इश्यु ऑफिसेसना पाठवावयाच्या मासिक अहवालात समाविष्ट केली जावी.

भारतीय दंड संहितेमध्ये दिलेल्या ‘काउंटर फिटिंग’ च्या व्याख्येमध्ये, एखाद्या विदेशी सरकारच्या प्राधिकरणाने दिलेल्या चलनी नोटाही समाविष्ट आहेत. पोलिस व सरकारी संस्थांकडून मत देण्यासाठी संशयास्पद विदेशी चलन नोटा आल्यास, ते प्रकरण सीबीआय, नवी दिल्ली च्या इंटरपोल विंगकडे त्यांच्याशी सल्ला-मसलत करुन पाठविण्यास सांगितले जावे.

भारत सरकारने बेकायदेशीर कार्यकृती (प्रतिबंध) अधिनियम (युएपीए) 1967 खाली, उच्च दर्जाच्य नकली भारतीय चलन गुन्ह्यांचे अन्वेषण नियम 2013 तयार केले आहेत. ह्या अधिनियमाच्या तिस-या शेड्युलमध्ये, उच्च दर्जाची नकली/बनावट चलनी नोट ची व्याख्या दिली आहे. उच्च दर्जाच्या नकली नोटांचे उत्पादन करणे, तस्करी करणे किंवा प्रसार करणे ह्या कार्यकृती, युएपीए 1967 च्या कक्षेखाली आणन्यात आल्या आहेत.

परिच्छेद 6 - काउंटर्सवर देण्यापूर्वी, एटीएममध्ये ठेवण्यापूर्वी आणि रिझर्व्ह बँकेच्या इश्यु ऑफिसेसना पाठवण्यापूर्वी बँक नोटांची तपासणी

बँकांनी त्यांच्या रोख रकमेबाबतचे व्यवस्थापन अशा प्रकारे ठेवावे की रु. 100 व त्यापेक्षा अधिक किंमतीच्या नोटा, त्यांच्या खरेपणाबाबत यंत्राद्वारे तपासल्या गेल्याशिवाय पुनः प्रसारणासाठी देण्यात येणार नाहीत. दैनंदिन रोख रकमेचे आकारमान कितीही असले तरी, ह्या सूचना सर्व बँक शाखांना लागु असतील. ह्याचे पालन न केले जाणे हे, रिझर्व्ह बँकेच्या निर्देश क्र.3158/09.39.00 (पॉलिसी)/2009-10 दि. नोव्हेंबर 19, 2009 चे उल्लंघन समजण्यात येईल.

एटीएममधून खोट्या नोटा मिळाल्या असल्याच्या तक्रारी टाळण्यासाठी आणि खोट्या नोटांच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी, एटीएममध्ये नोटा ठेवण्यापूर्वी सुयोग्य अशी सुरक्षा/तपासणी करण्याची व्यवस्था ठेवली जाणे अत्यावश्यक आहे. एटीएममार्फत खोट्या नोटा दिल्या जाणे हे, संबंधित बँकेद्वारे खोट्या नोटांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केल्याचे समजले जाईल.

चेस्टमधील प्रेषणांमध्ये खोट्या नोटा सापडणे हे देख़ील संबंधित चेस्ट शाखा, खोट्या नोटा-प्रसारणात जाणीवपूर्वक गुंतल्या असल्याचे समजले जाईल व त्याबाबत खास पोलिस-तपास केला जाईल व संबंधित चेस्टचे काम प्रलंबित केले जाणे ह्यासारखी कारवाई केली जाऊ शकेल.

अशा नोटांच्या नोशनल-मूल्यापर्यंतच्या भरपाईसह, त्या खोट्या नोटांच्या नोशनल मूल्याच्या 100% एवढा दंड पुढील परिस्थितीत लावला जाऊ शकतो.

(अ) बँकेने, केलेल्या मळक्या नोटांच्या प्रेषणात खोट्या नोटा सापडल्यास

(ब) आरबीआयने केलेल्या तपासणी/ऑडिटमध्ये, एखाद्या बँकेच्या करन्सी चेस्ट शिल्लकांमध्ये खोट्या नोटा सापडल्यास.

परिपत्रक क्र. डीपीएसएस.सीओ.पीडी 2298/02.10.002/2011-12 दि. जून 20, 2012 अनुसार, व्हाईट लेबल एटीएम्समध्ये भरण्यात/लोड करण्यात आलेल्या रोख रकमेच्या दर्जाची व खरेपणाची खात्री करुन घेण्याची जबाबदारी प्रायोजक बँकेचीच असेल.

परिच्छेद 7 नोडल बँक ऑफिसर नेमणे

प्रत्येक बँकेने, जिल्हा-निहाय, एका नोडल बँक ऑफिसरची नेमणुक करावी व त्याबाबत रिझर्व्ह बँकेच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाला व पोलिस-प्राधिकरणाला अधिसूचित करावे. वरील परिच्छेद 5 मध्ये दिल्यानुसार खोट्या नोटा सापडल्याची सर्व प्रकरणे नोडल बँक ऑफिसर मार्फतच कळविली जावीत. खोट्या नोटा शोधण्यासंबंधी, नोडल बँक ऑफिसर एक संपर्क स्थान म्हणून कार्य करील.

परिच्छेद 8 - बँकेच्या हेड ऑफिसमध्ये खोट्या नोटा दक्षता कक्ष स्थापन करणे

प्रत्येक बँक तिच्या मुख्य कार्यालयात पुढील कार्यांसाठी एक खोट्या नोटा दक्षता कक्ष (एफएनव्ही) स्थापन करील.

  1. रिझर्व्ह बँकेने खोट्या नोटांसंबंधाने दिलेल्या सूचना बँक शाखांना कळविणे. ह्या सूचनांच्या पालनावर देखरेख ठेवणे. अशा खोट्या नोटा सापडण्यावरील माहिती एकत्रित करुन ती, रिझर्व्ह बँक व एफआययु-इंड ह्यांचेकडे विद्यमान सुचनांनुसार पाठविणे. पोलिस प्राधिकरणे/नोडल अधिकारी ह्यांचेकडे पाठविलेल्या खोट्या नोटांच्या प्रकरणांचा पाठपुरावा करणे.

  2. अशी एकत्रित केलेली माहिती बँकेच्या सीव्हीओला देणे आणि त्याला/तिला काउंटरवर दिलेल्या/स्वीकारलेल्या खोट्या नोटांच्या प्रकरणांची माहिती कळविणे.

  3. तूट/सदोष/खोट्या नोटा आढळून येतात अशा करन्सी चेस्टमध्ये नियतकालिक आकस्मिक तपासणी करणे.

  4. सर्व करन्सी चेस्ट/बॅक ऑफिसेस मध्ये ठेवलेल्या, सुयोग्य क्षमतांच्या नोट-सॉर्टिंग मशीन्सच्या कार्यवाहीची खात्री करुन घेणे, आणि खोट्या नोटा ओळखण्यावर जवळून नजर ठेवून त्याबाबतचे रेकॉर्ड ठेवले जात आहे ह्याबाबत खात्रीकरून घेणे. एटीएम्स मध्ये टेवलेल्या काउंटर्सवर दिल्या जाणाऱ्या बँक नोटा, ह्या योग्य प्रकारे निवडलेल्या व मशीन द्वारे तपासलेल्याच असतील ह्याची खात्री करून घेणे आणि नोटांवर प्रक्रिया केली जात असतांना तसेच त्यांची ने-आण करीत असतांनाही आकस्मिक तपासणी सह सुयोग्य अशा सुरक्षा-उपाय ठेवले असल्याची खात्री करून घेणे.

एफएनव्ही बनावट नोटांबाबत दक्षता कक्ष, तिमाही धर्तीवर, वरील बाबींसंबंधाने अहवाल तयार करुन, तो, मुख्य महाव्यवस्थापक, चलन व्यवस्थापन विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय कार्यालय, अमर बिल्डिंग, 4था मजला, सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई - 400 001 ह्यांना, तो एफएनव्ही कक्ष रिझर्व्ह बँकेच्या ज्या प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकार क्षेत्राखाली येतो त्याच्या इश्यु ऑफिसकडे, संबंधित तिमाही संपल्याच्या पंधरा दिवसांच्या आत पाठवील. हा अहवाल ईमेलने पाठवावयाचा आहे. हार्ड कॉपी पाठविण्याची आवश्यकता नाही.

एफएनव्ही बनावट नोटांबाबत दक्षता कक्षांच्या पत्त्यांचे रेकॉर्ड अद्यावत करण्यासाठी, ती बँक विहित नमुन्यात (जोडपत्र 5) 1 जुलै रोजी असलेला तपशील, पत्ता इत्यादि, रिझर्व्ह बँकेला दर वर्षी ई-मेलने पाठवील. हार्ड कॉपी पाठविण्याची गरज नाही.

परिच्छेद 9 - अल्ट्रा व्हायोलेट दिवा व इतर पायाभूत सोयी उपलब्ध करणे

खोट्या नोटा शोधण्यास मदत व्हावी ह्यासाठी सर्व बँक शाखा/ बॅक ऑफिसेस ह्यात अल्ट्रा व्हायोलेट लँप व इतर सुयोग्य बँक नोट सॉर्टिंग/डिटेक्शन साधने असावीत. ह्याशिवाय सर्व करन्सी चेस्टमध्ये, सत्यांकन, प्रक्रिया व निवड करणारी मशीन्स असावीत व त्यांचा जास्तीत जास्त उपयोग केला जावा. अशी मशीन्स, रिझर्व्ह बँकेने मे 2010 मध्ये, विहित केलेल्या ‘नोट ऑथेंटिकेशन अँड फिटनेस सॉर्टिंग पॅरामीटर्स ‘ना अनुसरुन असावीत.

सर्व बँकांनी, नोट सॉर्टिंग मशीन्समार्फत प्रक्रिया केलेल्या नोटा व सापडलेल्या खोट्या नोटांची दैनंदिन नोंद ठेवावी.

तसेच बँकांनी जनतेच्या उपयोगासाठी किमान एक काउंटिंग मशीन (दोन डिसप्ले असलेले) उपलब्ध करुन द्यावे.

परिच्छेद 10 – आरबीआयला माहिती कळविणे.

1) बँक शाखांद्वारे

बँकेच्या सर्व शाखांनी, त्यांना सापडलेल्या खोट्या नोटांबाबतची माहिती, दरमहा, विहित नमुन्यात सादर करावी. महिन्याभरात बँक शाखांमध्ये आढळलेल्या खोट्या नोटांच्या माहितीचे एक विवरणपत्र (जोडपत्र 6) तयार केले जावे आणि ते रिझर्व्ह बँकेच्या संबंधित इश्यु ऑफिसकडे, पुढील महिन्याच्या 7 तारखेच्या आत पोहोचेल असे पाठविले जावे.

प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग नियमावली, 2005 च्या नियम 3 खाली, बँकांच्या प्रमुख अधिका-यांनाही, जेथे ख-या नोटांच्या ऐवजी बनावट नोटा वापरण्यात आल्या आहेत अशा रोखीच्या व्यवहारांवरील माहिती, संचालक, एफआयु-आयएनडी, फायनान्शियल इंटिलिजन्स युनिट - इंडिया, 6 वा मजला, हॉटेल सम्राट, चाणक्यपुरी, नवी दिल्ली, 110021 ह्यांना सात कामकाजाच्या दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे.

त्या महिन्यात कोणतीही बनावट/नकली नोट सापडली नसल्यास “निल” रिपोर्ट पाठविला जावा.

(2) सहकारी बँका व प्रादेशिक ग्रामीण बँकांद्वारे.

सहकारी बँका व प्रादेशिक ग्रामीण बँका ह्यांच्या शाखांना आढळलेल्या बनावट नोटांवरील डेटा, विहित नमुन्यात (जोडपत्र 6) मासिक धर्तीवर, रिर्झव्ह बँकेच्या संबंधित इश्यु ऑफिसकडे दिली जावी.

परिच्छेद 11 पोलिस प्राधिकरणाकडून मिळालेल्या खोट्या नोटांचे जतन

पोलिस प्राधिकरणे/कोर्ट ह्यांच्याकडून परत मिळालेल्या सर्व खोट्या नोटा, त्या बँकेच्या सुरक्षा कोठडीत जतन केल्या जाव्यात व संबंधित बँकेने त्याचे रेकॉर्ड ठेवावे. बँकेच्या एफएनव्ही बनावट नोटांबाबत दक्षता कक्षानेही, अशा खोट्या नोटांबाबत, शाखा-निहाय असे एकत्रित रेकॉर्ड ठेवावे.

शाखांमधील खोट्या नोटांचे सहामाही धर्तीवर (31 मार्च व 30 सप्टेंबर) संबंधित शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्याद्वारे सत्यांकन (पडताळणी) केले जावे. पोलिस प्राधिकरणांकडून त्या नोटा परत मिळाल्याच्या तारखेपासून तीन वर्षांपर्यंत जपून ठेवण्यात याव्यात.

त्यानंतर ह्या नोटा, त्याबाबतच्या संपूर्ण माहितीसह, रिझर्व्ह बँकेच्या संबंधित इश्यु कार्यालयाकडे पाठविल्या जाव्यात.

कोर्टाचा विषय असलेल्या खोट्या नोटा, कोर्टाचा निकाल दिला गेल्यानंतरही, संबंधित शाखेत, तीन वर्षेपर्यंत जतन केल्या जाव्यात.

परिच्छेद 12 खोट्या नोटा ओळखणे - कर्मचा-यांना प्रशिक्षण

बँक-शाखा, करन्सी चेस्ट आणि ट्रेझरी/सब-ट्रेझरी मधील रोकड हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना बँक नोटांची सुरक्षा-लक्षणे संपूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे.

बँकेच्या कर्मचा-यांना बनावट नोटा ओळखण्याचे ज्ञान देण्यासाठी, जोडपत्र 7 मध्ये दाखविलेल्या सर्व बँक नोटांची सुरक्षा लक्षणे, सर्व बँका/ट्रेझरींना देण्यात आली असून, जनतेच्या माहितीसाठी ती सर्व शाखांमध्ये ठळकपणे प्रदर्शित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 2005-06 मालिकेच्या बँक नोटांचे पोस्टर्स, शाखांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी बँक शाखांना देण्यात आले आहेत. 2005-06 मालिकेचे पोस्टर्स डाऊनलोड करण्यासाठी http://www.paisaboltahai.rbi.org.in मध्ये उपलब्ध आहेत.

इतर बँक नोटांचा तपशील वरील लिंकवरील ‘नो युवर बँक नोट्स’ खाली उपलब्ध आहे.

खोट्या नोटा सादर/स्वीकार करतेवेळीच त्या ओळखता येण्यात मदत व्हावी ह्यासाठी, नियंत्रक कार्यालये/प्रशिक्षण केंद्रे ह्यांच्याद्वारे, बँक कर्मचा-यांसाठी, नोटांच्या सुरक्षा लक्षणांवरील कार्यक्रम आयोजित केले जावेत. रोख रकमा हाताळणा-या सर्व बँक कर्मचा-यांना ख-या भारतीय बँक नोटांच्या लक्षणांबाबत, प्रशिक्षित केले गेले असल्याची खात्री बँकांनी करुन घ्यावी. रिझर्व्ह बँक ह्याबाबत शैक्षणिक मदत व साहित्य पुरवील.

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?