RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78534080

महापरिपत्रक - नोटा व नाणी बदलून देण्याची सुविधा

आरबीआय/2019-20/02
डीसीएम(एनई)क्र.जी-2/08.07.18/2019-20

जुलै 01, 2019

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/
व्यवस्थापकीय संचालक/
मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व बँका

महोदय/महोदया,

महापरिपत्रक - नोटा व नाणी बदलून देण्याची सुविधा

कृपया, नोटा व नाणी बदलून देण्याच्या सुविधेवरील आमचे परिपत्रक डीसीएम(एनई)क्र.जी-2/08.07.18/2018-19 दि. जुलै 02, 2018 चा संदर्भ घ्यावा. ह्या विषयावरील महापरिपत्रकाची सुधारित आवृत्ती, आपल्या माहिती व कारवाईसाठी सोबत जोडली आहे. हे महापरिपत्रक आमच्या वेबसाईटवरही www.rbi.org.in टाकण्यात आले आले आहे.

आपला विश्वासु,

(मानस रंजन मोहंती)
मुख्य महाव्यवस्थापक

सोबत : वरीलप्रमाणे


महापरिपत्रक - नोटा व नाणी बदलून देण्यासाठी सुविधा - दि. जुलै 1, 2019

(1) बँक शाखांमध्ये नोटा व नाणी बदलून देण्याची सुविधा

(अ) देशाच्या सर्व भागामधील बँकांच्या सर्व शाखांसाठी जनतेला पुढील सेवा अधिक सक्षमतेने व उत्साहाने देणे अपरिहार्य करण्यात आले आहे; की जेणेकरुन, त्यांना ह्याबाबतीत आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयांकडे जावे लागणार नाही.

(1) मागणी केल्यावर, सर्व मूल्यांच्या नवीन/चांगल्या दर्जाच्या नोटा व नाणी देणे.

(2) मळक्या/फाटलेल्या/सदोष नोटा बदलून देणे,*

*लघु वित्त बँका व प्रदान बँका, त्यांना वाटल्यास फाटक्या व सदोष नोटा बदलून देऊ शकतात.

आणि

(3) व्यवहारासाठी किंवा बदलून देण्यासाठी नोटा व नाणी स्वीकारणे.

नाणी व विशेषतः रु.1 व रु.2 मूल्यांची नाणी वजनाने स्वीकारणे सोयिस्कर ठरेल. तथापि, प्रत्येक थैलीत 100 नग ठेवलेल्या थैल्या स्वीकारणे रोखपाल तसेच ग्राहकांसाठीही अधिक सोयीचे असेल. अशा थैल्या काऊंटरजवळ ठेवून त्या ग्राहकांना उपलब्ध करण्यात याव्यात

(ब) सर्व शाखांनी वरील सुविधा, कामकाजाच्या सर्व दिवशी कोणताही भेदभाव न करता जनतेला उपलब्ध करुन द्याव्यात. काही निवडक धनकोष शाखांद्वारे महिन्यातील एखाद्या रविवारी बदलून देण्याची सुविधा देण्यामध्ये कोणताही बदल नाही. अशा बँक शाखांची नावे व पत्ते संबंधित बँकांकडे उपलब्ध असावेत.

(क) वर दिलेल्या सुविधा बँक शाखांमध्ये उपलब्ध असल्याबाबत जनतेच्या माहितीसाठी भरपुर प्रसिध्दी देण्यात यावी.

(ड) कोणत्याही बँक शाखांनी त्यांच्या काऊंटर्सवर सादर केलेल्या कमी मूल्याच्या नोटा आणि/किंवा नाणी स्वीकारण्यास नकार देऊ नये.

(2) भारतीय रिझर्व्ह बँक (नोट परतावा) नियमावली 2009 - अधिकार देणे.

(अ) भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या कलम 58 (2) सह वाचित कलम 28 अन्वये, कोणत्याही व्यक्तीला, भारत सरकार किंवा आरबीआयकडून, जीओआयच्या कोणत्याही हरवलेल्या, चोरलेल्या, फाटलेल्या किंवा अपूर्ण बँक नोटेचे मूल्य वसुल करण्याचा हक्क नाही. तथापि, ख-या/सत्य बाबतीत जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी, केंद्र सरकारच्या पूर्व मंजुरीने, आरबीआय, सदिच्छा/अनुग्रह म्हणून, अशा चलनी नोटांचे किंवा बँक नोटांचे मूल्य परत करण्यासाठीच्या परिस्थिती, अटी व मर्यादा विहित करु शकते असे विहित करण्यात आले आहे.

(ब) जनतेच्या हितासाठी व सोयीसाठी ही सुविधा देऊ करण्यासाठी, फाटक्या/दोषमुक्त नोटा निःशुल्क बदलून देण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँक (नोटा परतावा) नियमावली, 2009 च्या नियम 2(जे) खाली बँकांच्या सर्व शाखांवर अधिकार देण्यात आले आहेत.

(क) इतर मालिकांमधील नोटांपेक्षा आकार छोटा असलेल्या महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील नोटा जनतेला बदलून देता याव्यात ह्यासाठी, भारतीय रिझर्व बँक (नोट परतावा) नियम 2009 सुधारित करण्यात आले होते. रुपये पन्नास व त्यापेक्षा अधिक मूल्याच्या नोटांचे पूर्ण मूल्य परत देण्यासाठी आवश्यक असलेले एकाच अखंड सर्वात मोठ्या तुकड्याचे किमान क्षेत्रफळ सुधारित करण्यात आले आहे. भारतीय रिझर्व बँक (नोट परतावा) सुधारित नियम 2018, सप्टेंबर 6, 2018 रोजी भारतीय राजपत्रात अधिसूचित केले गेले आहेत.

(3) मळक्या नोटेची उदारीकृत व्याख्या

बदलून देण्याची सुविधा जलद करण्यासाठी, मळक्या नोटेची व्याख्या विस्तारित करण्यात आली आहे. ‘मळकी नोट’ म्हणजे, नेहमीच्या वापरामुळे मळलेला/खराब झालेली नोट. आणि ह्यात, दोन तुकडे जोडलेली अशी नोट की ज्यात ते दोन्हीही तुकडे एकाच/त्याच नोटेचे असून त्यामुळे कोणतेही मुख्य लक्षण न गमावलेली ती पूर्ण नोट असेल. सरकारी थकबाकी/प्रदाने करण्यासाठी व जनतेने बँकेत ठेवलेल्या खात्यांमध्ये भरण्यासाठी, ह्या नोटा बँकेच्या काऊंटर्सवर स्वीकारल्या जाव्यात. तथापि, कोणत्याही परिस्थितीत ह्या नोटा जनतेला देण्यात येऊ नयेत तर, ह्या नोटा, पुढील प्रक्रिया करण्यासाठीची ‘मळक्या नोटा प्रेषणे’ करण्यास आरबीआयच्या कार्यालयात पाठविण्यासाठी धनकोषांमध्ये जमा केल्या जाव्यात.

(4) फाटक्या नोटा - सादरीकरण व पास करणे

फाटकी नोट म्हणजे जिचा एखादा भागच गायब आहे किंवा जिचे दोन पेक्षा अधिक तुकडे झाले आहेत अशी नोट. फाटक्या नोटा बँकांच्या कोणत्याही शाखेत सादर करता येतात. अशा सादर केलेल्या नोटा स्वीकारल्या व बदलून दिल्या जातील व त्यांचा निर्णय, भारतीय रिझर्व्ह बँक (नोटा परतावा) नियमावली 2009 अनुसार केला जाईल.

(5) अत्यंत ठिसूळ, अर्धवट जळलेल्या, जळलेल्या, चिकटलेल्या नोटा

अत्यंत ठिसुळ झालेल्या, किंवा खूप जळक्या असलेल्या किंवा अजिबात सुट्या/वेगळ्या न करता येण्यासारख्या व त्यामुळे हाताळता न येण्यासारख्या नोटा, बँक शाखा, बदलून देण्यासाठी स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी अशा नोटांच्या धारकांना त्या नोटा संबंधित इश्यु ऑफिसात सादर करण्यास सांगावे. तेथे त्यांचा निर्णय विशेष कार्यरीतीद्वारा केला जाईल.

(6) मळक्या/फाटक्या/अपूर्ण नोटा बदलून देण्याची रीत

(6.1) मळक्या नोटांची अदलाबदल

(6.1.1) छोट्या संख्येने सादर केलेल्या नोटा : जेथे एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या नोटांची संख्या प्रतिदिन 20 नगांपर्यंत व कमाल रु.5,000 असेल, तेथे त्या नोटा बँकांनी काऊंटरवरच निःशुल्क बदलून द्याव्यात.

(6.1.2) मोठ्या संख्येने/एकगठ्ठा सादर केलेल्या नोटा : जेथे एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या नोटांची संख्या प्रतिदिन 20 पेक्षा अधिक असेल किंवा त्यांचे मूल्य रु.5,000 पेक्षा अधिक असेल, तेथे त्या नोटा, त्यांचे मूल्य नंतर जमा करण्यासाठी त्याची पोचपावती देऊन बँका स्वीकारु शकतात. बँकांमधील ग्राहकसेवेवरील महापरिपत्रक (डीबीआर.क्र.एलईजी.बीसी.21/09.07.006/2015-16 दि. जुलै 1, 2015) मध्ये दिल्यानुसार बँका त्यासाठी सेवा आकार लावू शकतात. सादर केलेल्या नोटांचे मूल्य रु.50,000/- पेक्षा जास्त असल्यास, बँकांनी त्यासाठी नेहमीच्या सावधानता ठेवणे अपेक्षित आहे.

(6.2) फाटक्या व अपूर्ण नोटांची अदलाबदल

(6.2.1) फाटक्या व अपूर्ण नोटा बदलून देण्यासाठी, आणि निर्णयासाठी सादर केलेल्या नोटांसाठी नेमलेल्या शाखा, निर्णयासाठी सादर केलेल्या फाटक्या व अपूर्ण नोटा बदलून देण्यासाठी व त्याची पावती देण्यासाठी एनआरआर, 2009 (www.rbi.org.in - पब्लिकेशन्स - ऑकेजनल) च्या विभाग 3 मध्ये दिलेल्या कार्यरीतींचे अनुसरण करणे सुरु ठेवू शकत असल्या, तरी धनकोष नसलेल्या शाखांनी, छोट्या संख्येने तसेच एकगठ्ठा सादर केलेल्या नोटांसाठी पुढील कार्यरीत अनुसरावी.

(6.2.2) छोट्या संख्येने सादर केलेल्या नोटा : एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या नोटांची संख्या 5 पर्यंत असल्यास, धनकोष नसलेल्या शाखांनी, रिझर्व बँक (नोट परतावा) नियम 2009 च्या विभाग 3 मध्ये दिलेल्या कार्यरीतीनुसार त्या नोटांबाबत निर्णय घेऊन, त्या नोटांचे विनिमयमूल्य काऊंटरवरच प्रदान करावे. धनकोष नसलेल्या शाखा त्या फाटक्या नोटांबाबत निर्णय घेऊ शकत नसल्यास, त्या नोटा पोचपावती देऊन स्वीकारल्या जाव्यात आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी, जोडणी असलेल्या धनकोषयुक्त शाखेकडे पाठविल्या जाव्यात. ह्या नोटांबाबतच्या प्रदानाची संभाव्य तारीख पावतीवरच दिली जावी व ती 30 दिवसांपेक्षा अधिक नसावी. ह्या नोटांचे विनिमय मूल्य इलेक्ट्रॉक साधनांनी जमा करण्यासाठी, सादरर्कत्यांकडून त्यांच्या खात्यांचा तपशील घेतला जावा.

(6.2.3) एकगठ्ठा सादर केलेल्या नोटा : जेथे एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या नोटांची संख्या 5 पेक्षा अधिक (रु.5,000/- पेक्षा अधिक मूल्य नसलेल्या) असेल, तेथे त्या सादरर्कत्याला/सादरकर्तीला त्या नोटा जवळच्या धनकोष असलेल्या शाखेकडे इन्शुअर्ड पोस्टने व त्याच्या/तिच्या बँक खात्याचा तपशील देऊन (खाते क्र., शाखेचे नाव, आयएफएससी इत्यादि) पाठविण्यास किंवा त्या तेथे प्रत्यक्ष जाऊन बदलून घेण्यास सांगावे. रु.5,000/- पेक्षा मूल्य अधिक असलेल्या फाटक्या नोटा सादर करणा-या इतर सर्व व्यक्तींना जवळील धनकोष असलेल्या शाखेत जाण्यास सांगावे. इन्शुअर्ड पोस्ट मार्फत फाटक्या नोटा स्वीकारणा-या धनकोष शाखांनी, त्या नोटांचे विनिमय मूल्य, त्या नोटा मिळाल्याच्या 30 दिवसांच्या आत, इलेक्ट्रॉनिक रितीने, नोटा पाठविण्याच्या खात्यामध्ये जमा करावे.

(6.3) ह्या बाबतीत बँकांनी दिलेल्या सेवांनी समाधान न झालेले सादरकर्ते, बँकेच्या/पोस्टाच्या पावत्यांच्या पुराव्यासह, आवश्यक त्या कारवाईसाठी बँकिंग लोकपाल योजना, 2006 खाली असलेल्या कार्यरीतीनुसार, संबंधित बँकिंग लोकपालांकडे जाऊ शकतात.

(7) पे/पेड/रिजेक्ट शिक्के असलेल्या नोटा

(अ) शाखेचा प्रत्येक प्रभारी अधिकारी (म्हणजे, शाखा निबंधक) आणि शाखेचा प्रत्येक प्रभारी लेखा किंवा कॅश विंग अधिकारी, भारतीय रिझर्व्ह बँक (नोट परतावा) नियमावली 2009 अनुसार, प्रत्येक शाखेत बदलून देण्यासाठी आलेल्या फाटक्या नोटांवर निर्णय देणारा ‘विहित अधिकारी’ म्हणून काम करील. ह्या विहित अधिका-याने, तारीख टाकलेल्या पे/पेड/रिजेक्ट शिक्क्यांवर त्याची आद्याक्षरे लिहून त्याचा आदेश नोंद करणे आवश्यक आहे. ह्या पे/पेड/रिजेक्ट शिक्क्यांवर बँकेचे व शाखेचे नाव असावे व हे शिक्के, त्यांचा दुरुपयोग टाळण्यासाठी विहित अधिका-याच्या ताब्यात असावेत.

(ब) आरबीआयचे इश्यु ऑफिस किंवा कोणत्याही बँक शाखेचे, पे/पेड/रिजेक्ट शिक्के असलेल्या नोटा, कोणत्याही बँक शाखेत प्रदानासाठी सादर केल्या गेल्यास, भारतीय रिझर्व्ह बँक (नोट परतावा) नियमावली 2009 च्या नियम 6(2) खाली फेटाळल्या जाव्यात आणि सादरर्कत्याला सांगण्यात यावे की, त्या नोटांवरील पे/पेड (किंवा रिजेक्ट) शिक्का ह्यावरुन स्पष्ट होत असल्यानुसार, त्या नोटांचे मूल्य आधीच प्रदान करण्यात आले आहे. सर्व बँक शाखांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी पे/पेड शिक्के असलेल्या नोटा, जनतेला नजरचुकीनेही देऊ नयेत. शाखांनीही त्यांच्या ग्राहकांना सावध करावे की त्यांनी अशा नोटा कोणत्याही बँकेकडून किंवा अन्य कोणाहीकडून स्वीकारु नयेत.

(8) घोषवाक्ये/राजकीय संदेश असलेल्या नोटा

घोषवाक्ये किंवा राजकीय संदेश जिच्यावर लिहिण्यात आली आहे अशा कोणत्याही नोटेचे एक वैध चलन असणे बंद होते आणि अशा नोटेबाबतचा दावा, भारतीय रिझर्व्ह बँक (नोट परतावा) नियमावली 2009 च्या नियम 6 (3)(3) खाली फेटाळला जाईल. त्याचप्रमाणे, विद्रुप केलेल्या नोटाही, भारतीय रिझर्व्ह बँक (नोट परतावा) नियमावलीच्या नियम 6(3)(2) खाली फेटाळल्या जातील.

(9) मुद्दाम फाडलेल्या/कापलेल्या नोटा

जाणून बुजून कापलेल्या, फाडलेल्या, बदल केलेल्या किंवा बिघडवलेल्या नोटा विनिमय मूल्यासाठी सादर केल्या गेल्यास, त्या भारतीय रिझर्व्ह बँक (नोट परतावा) नियमावली 2009 च्या नियम 6(3)(2) खाली फेटाळण्यात याव्यात. मुद्दाम कापलेल्या नोटांची नेमकी व्याख्या करणे अवघड असले तरीही, अशा नोटांकडे बारकाईने पाहिल्यास, त्या मुद्दाम फाडण्यात/कापण्यात आल्या असल्याचे स्पष्टपणे दिसून येईल. तसेच विशेषतः ह्या नोटा मोठ्या संख्येने सादर केल्या जात असताना, त्या कापण्यामध्ये एक विशिष्ट आकार/कापून टाकलेल्या जागा असा नमुना/एक समानता दिसून येईल. अशा बाबतीत, सादरर्कत्याचे नाव, सादर केलेल्या नोटांची संख्या व त्यांची मूल्ये, ती शाखा ज्याच्या अधिकार क्षेत्रात येते त्या इश्यु ऑफिसच्या उप/महा व्यवस्थापनाकडे कळवाव्यात. अशा नोटा मोठ्या संख्येने सादर केल्या गेल्यास ती बाब स्थानिक पोलिसांनाही कळविण्यात यावी.

(10) प्रशिक्षण

आमची इश्यु कार्यालये प्राधान्यतेने बँक शाखेच्या ‘विहित अधिका-यांसाठी’ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. सदोष नोटांबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत ज्ञान देणे व आत्मविश्वास निर्माण करणे हा ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश असल्याने शाखांच्या विहित अधिका-यांना अशा कार्यक्रमांसाठी पाठविणे क्रमप्राप्त आहे.

(11) नोटिस बोर्डावर प्रदर्शित करणे

सर्वसाधारण जनतेच्या माहितीसाठी, सर्व बँक शाखांनी, त्यांच्या कार्यालयामध्ये, ह्या सुविधेची उपलब्धता दर्शविणारा व ‘येथे मळक्या/फाटलेल्या नोटा स्वीकारल्या व बदलून दिल्या जातात’ असा फलक लावावा. बँकांनी खात्री करुन घ्यावी की, त्यांच्या सर्व शाखा, नोटा व नाणी बदलून देण्यासाठीची सुविधा केवळ त्यांच्या ग्राहकांनाच नव्हे तर इतरांनाही देतील. तथापि, त्यांनी खात्री करुन घ्यावी की, नोटा बदलून देण्याच्या ह्या सुविधेचा लाभ केवळ, सदोष नोटांचे मनी चेंजर्स/व्यापारी ह्यांनाच सर्वस्वी दिला जाणार नाही.

(12) बँक शाखांमध्ये निर्णय घेतलेल्या नोटांची वासलात

बँक शाखांनी निर्णय घेतलेल्या नोटांच्या ऑडिट बाबत, ज्यांचे संपूर्ण प्रदान केले गेले आहे अशा नोटा, सर्व शाखांनी, त्यांची जोडणी असलेल्या धनकोष शाखांमध्ये पाठवाव्यात, आणि तेथून त्या नोटा, पुढील मळक्या नोटांसह आधीच ठरविण्यात आलेल्या कार्यरीतीने संबंधित इश्यु ऑफिसांकडे पाठविल्या जाव्यात. धनकोष-शाखांनी त्यांच्या रोख शिल्लकेत ठेवलेल्या, अर्धे मूल्य प्रदान केलेल्या व फेटाळलेल्या नोटा वेग-वेगळ्या पॅक करुन, पूर्ण मूल्य प्रदान केलेल्या नोटांबरोबर किंवा पंजीकृत व विमा उतरविलेल्या पोस्टाने, आवश्यक असेल त्यानुसार पाठवाव्यात. संपूर्ण मूल्य दिले असलेल्या नोटांना इश्यु ऑफिसकडून धनकोष-प्रेषण म्हणून समजले जाईल, तर अर्धे मूल्य दिले गेलेल्या व फेटाळलेल्या नोटांना, निर्णयासाठी सादर केलेल्या नोटा म्हणून समजले जाईल व त्यावर योग्य ती प्रक्रिया केली जाईल. सर्व धनकोष शाखांनी, आमच्या इश्यु ऑफिसांकडे, त्या महिन्यामध्ये निर्णय घेतलेल्या नोटांची संख्या दर्शविणारे मासिक विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

(13) विद्यमान नसलेली (अनकरंट) नाणी

भारत सरकारने, डिसेंबर 20, 2010 रोजी दिलेल्या राजपत्र अधिसूचना क्र.2529 अन्वये, जून 30, 2011 पासून, वेळोवेळी देण्यात आलेली 25 पैसे व त्याखालील मूल्यांची नाणी वैध चलन असणे समाप्त झाले आहे.

(14) देखरेख व नियंत्रण

(अ) बँकांच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी/क्षेत्रीय व्यवस्थापकांनी शाखांना अकस्मात भेटी देऊन, त्या शाखांनी ह्याबाबत केलेल्या अनुपालनाची माहिती मुख्य कार्यालयाला कळवावी. ते मुख्य कार्यालय अशा अहवालांचा आढावा घेऊन, आवश्यक तेथे जलद उपायासह कारवाई करील.

(ब) ह्याबाबत कोणतेही अनुपालन न केले गेल्यास ते, भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन समजले जाईल.


महापरिपत्रक - नोटा व नाणी बदलून देण्यासाठी सुविधा, दि. जुलै 01, 2019

ह्या महापरिपत्रकात एकत्रित केलेल्या परिपत्रकांची/अधिसूचनांची यादी

अनु क्र. परिपत्रक/अधिसूचना क्र. तारीख विषय
1 डीसीएम(एनई)क्र.3057/08.07.18/2018-19 26.06.2019 नाण्यांचा स्वीकार
2 डीसीएम(एनई)क्र.657/08.07.18/2018-19 07.09.2018 भारतीय रिझर्व्ह बँक (नोट परतावा) नियम 2009
3 आरबीआय/2017-18/132 डीसीएम (आरएमएमटी)
क्र. 2945/11.37.01/2017-18
15.02.2018 नाण्यांचा स्वीकार
4 डीसीएम(एनई)क्र.120/08.07.18/2016-17 14.07.2016 मळक्या/फाटक्या/अपूर्ण नोटा बदलून देण्यासाठी सुविधा.
5 डीसीएम(एनई)क्र.3498/08.07.18/2012-13 28.01.2013 नोटा व नाणी बदलून देण्याची सुविधा
6 डीसीएम (पीएलजी)क्र.
6983/10.03.03/2010-11
28.6.2011 25 पैसे व त्याखालील मूल्याची नाणी प्रभारातून परत मागविणे
7 डीसीएम (पीएलजी)क्र.
6476/10.03.03/2010-11
31.5.2011 25 पैसे व त्याखालील मूल्याची नाणी प्रभारातून परत मागविणे - अस्वीकाराबाबतच्या तक्रारी
8 डीसीएम (पीएलजी)क्र.
4459/10.03.03/2010-11
09.2.2011 25 पैसे व त्याखालील मूल्याची नाणी प्रभारातून परत मागविणे
9 डीसीएम (पीएलजी)क्र.
4137/10.03.03/2010-11
25.1.2011 25 पैसे व त्याखालील मूल्याची नाणी प्रभारातून परत मागविणे
10 भारतीय राजपत्र क्र. 2529 20.12.2010 25 पैसे व त्याखालील नाणी काढून घेतल्याबाबत अधिसूचना
11 डीसीएम(आरएमएमटी)क्र.1277/11.36.03/2010-11 24.8.2010 धनकोष असलेल्या शाखांद्वारे विनिमय सुविधा/सुविधा उपलब्ध करण्यासाठी योजना
12 डीसीएम(एनई)क्र.1612/08.01.01/2009-10 13.9.2009 नोट परतावा (नियमावली) 2009 ची अधिसूचना
13 आरबीआय/2006-07/349/डीसीएम
(एनई)क्र.7488/08.07.18/2006-07
25.4.2007 छोट्या मूल्यांच्या नोटा व नाण्यांचा स्वीकार.
14 डीसीएम(आरएमएमटी)क्र.1181/11.37.01/2003-04 05.4.2004 नाण्यांचा स्वीकार
15 डीसीएम(एनई)क्र.310/08.07.18/2003-04 19.1.2004 नोटा, नाणे इत्यादी बदलून देण्यासाठी जनतेला सुविधा देणे.
16 डीसीएम(आरएमएमटी)क्र.404/11.37.01/2003-04 09.10.2003 नाण्यांचा स्वीकार व नोटांची उपलब्धता
17 जी-11/08.07.18/2001-02 02.11.2001 भारतीय रिझर्व्ह बँक (नोट परतावा) नियमावली, 1975 - सार्वजनिक/खाजगी क्षेत्रातील बँकांच्या धनकोष शाखांना नोटा बदलून देण्यासाठी अधिकार देणे.
18 सीवाय.क्र.386/08.07.13/2000-2001 16.11.2000 भारतीय रिझर्व्ह बँक (नोट परतावा) नियमावली, 1975 - सार्वजनिक/खाजगी क्षेत्रातील बँकांच्या धनकोष शाखांना नोटा बदलून देण्यासाठी संपूर्ण अधिकार देणे.
19 जी-67/08.07.18/96-97 18.2.1997 भारतीय रिझर्व्ह बँक (नोट परतावा) नियमावली, 1975 – धनकोष ठेवणा-या खाजगी क्षेत्रातील बँकांना संपूर्ण अधिकार देणे.
20 जी-52/08.07.18/96-97 11.1.1997 आरबीआय (एनआर) नियमावली - सदोष नोटा बदलून देण्यासाठी पीएसबींना अधिकार देण्याची योजना - पे/पेड शिक्के असलेल्या नोटांची वासलात लावणे.
21 जी-24/08.01.01/96-97 03.12.1996 कापलेल्या नोटांची अदलाबदल स्वीकारणे - उदारीकरण
22 जी-64/08.07.18/95-96 18.5.1996 आरबीआय (एनआर) नियमावली - पीएसबींच्या शाखांना संपूर्ण अधिकार देणे व सदोष नोटा बदलून देण्याबाबत प्रसिध्दी.
23 जी-71/08.07.18/92-93 22.6.1993 सदोष नोटा बदलून देण्यासाठी पीएसबींच्या शाखांना संपूर्ण अधिकार देण्याची योजना - प्रसिध्दी
24 जी-83/सीएल-1(पीएसबी)-91/92 06.5.1992 आरबीआय (एनआर) नियमावली - पीएसबींच्या धनकोष शाखांना अधिकार देणे.
25 जी-74/सीएल-(पीएसबी)(जीईएन)-90/91 05.9.1991 आरबीआय (एनआर) नियमावली - ह्या खाली पीएसबींना संपूर्ण अधिकार देणे.
26 5.5/सीएल-1(पीएसबी)-90/91 25.9.1990 आरबीआय (एनआर) नियमावली - पीएसबींना संपूर्ण अधिकार देण्याची योजना.
27 8/सीएल-1(पीएसबी)-90/91 17.8.1990 आरबीआय (एनआर) नियमावली - पीएसबींना संपूर्ण अधिकार देण्याची योजना.
28 जी-123/सीएल-1(पीएसबी)(जीईएन)-89/90 07.5.1990 आरबीआय (एनआर) नियमावली - पीएसबींना संपूर्ण अधिकार देण्याची योजना.(सुधारणा)
29 जी-108/सीएल-1(पीएसबी)(जीईएन)-89/90 03.4.1990 आरबीआय (एनआर) नियमावली 1989 - रु.500/- च्या बँक नोटा - पीएसबींच्या शाखांमध्ये सदोष नोटा बदलून देणे.
30 जी-8/सीएल-1(पीएसबी)-89/90 12.7.1989 आरबीआय (एनआर) नियमावली- आरबीआयच्या इश्यु ऑफिसांच्या ‘टु क्लेम्स’ शिक्का असलेल्या सदोष नोटा
31 जी.84/सीएल.1(पीएसबी)-88/89 17.3.1989 आरबीआय (एनआर) नियमावली- पीएसबींना नोटा बदलून देण्यासाठी संपूर्ण अधिकार देणे.
32 जी.66/सीएल.1(पीएसबी)-88/89 09.2.1989 आरबीआय (एनआर) नियमावली - पीएसबींना अधिकार देणे - प्रशिक्षण
33 एस.12/सीएल-1(पीएसबी)-88/89 30.9.1988 आरबीआय (एनआर) नियमावली - मुद्दाम खराब केलेल्या नोटा - निर्णय करणे.
34 जी.134/सीएल-1(पीएसबी)-87/89 25.5.1988 आरबीआय (एनआर) नियमावलींखाली संपूर्ण अधिकार देण्याच्या योजनेची अंमलबजावणी
35 192/सीएल-1-(पीएसबी)-86/87 02.6.1987 आरबीआय (एनआर) नियमावली - पीएसबींना संपूर्ण अधिकार देण्याची योजना.
36 189/सीएल.2/86/87 02.6.1987 चलनी नोटांवर मजकुर किंवा संदेश किंवा घोषवाक्ये लिहून त्या खराब करणे.
37 185/सीएल-1(पीएसबी)-86/87 20.5.1987 आरबीआय (एनआर) नियमावली - सदोष नोटांवर ‘पे’ व ‘रिजेक्ट’ शिक्के मारणे.
38 173/सीएल.1/84/85 02.4.1985 सदोष नोटा बदलून देण्यासाठी पीएसबींना संपूर्ण अधिकार देणे/त्यासाठीच्या कार्यरीती.
39 सीवाय.क्र.1064/सीएल.1/76/77 09.8.1976 मळक्या नोटा व थोड्या प्रमाणावर फाटलेल्या नोटा बदलून देण्यास जनतेसाठी सुविधा.

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?