RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
ODC_S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78472095

महापरिपत्रक - जनतेला ग्राहकसेवा देण्यामधील कामगिरीवर आधारित, बँक शाखांना दंड लावण्यासाठीची योजना

आरबीआय/2016-17/23
डीसीएम(सीसी)क्र.जी.3/03.44.01/2016-17

जुलै 20, 2016

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
सर्व बँका

महोदय/महोदया,

महापरिपत्रक - जनतेला ग्राहकसेवा देण्यामधील कामगिरीवर आधारित, बँक शाखांना दंड लावण्यासाठीची योजना

कृपया, सीडीईएस (म्हणजे, चलन वितरण व अदलाबदल योजना) हे शीर्षक असलेल्या, प्रोत्साहनांची सुधारित योजना असलेल्या, आमचे परिपत्रक डीसीएम(सीसी)क्र.जी.-10/03.41.01/2015-16 दि. मे 5, 2016 चा संदर्भ घ्यावा.

(2) त्यात सांगितल्याप्रमाणे, प्रोत्साहनांविषयच्या तरतुदी आता दंडांपासून वेगळ्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, दंडांसाठी असलेली योजना, माहितीसाठी व आवश्यक ती कारवाई करण्यासाठी जोडपत्रात दिली आहे.

(3) हे महापरिपत्रक आमच्या वेबसाईटवरही www.rbi.org.in उपलब्ध आहे.

आपली विश्वासु

(पी.विजया कुमार)
मुख्य महाव्यवस्थापक

सोबत : वरीलप्रमाणे


जोडपत्र

जनतेला ग्राहकसेवा देण्यामधील कामगिरीवर आधारित, करन्सी चेस्टसह, बँक शाखांना दंड लावण्यासाठीची योजना

(1) स्वच्छ नोट धोरणाला अनुसरुन, सर्व बँक शाखा, नोटा व नाणी बदलून देण्याबाबत, अधिक चांगली ग्राहकसेवा देत आहेत ह्याची खात्री करुन घेण्यासाठी, करन्सी चेस्ट्स सह, बँक शाखांसाठी, दंड लावण्याची ही योजना तयार करण्यात आली आहे.

(2) दंड

नोटा व नाणी बदलून देणे/आरबीआयकडे केलेली प्रेषणे/करन्सी चेस्टच्या कार्यकृती इत्यादींमधील त्रुटींसाठी बँकांवर लावण्यात येणारे दंड पुढीलप्रमाणे आहेत.

अनु.
क्र.
अनियमिततेचे स्वरुप दंड
i. मळक्या नोटांची प्रेषणे व करन्सी चेस्टच्या शिल्लकांमधील तूट.

रु.50 मूल्यापर्यंतच्या नोटा

हानी व्यतिरिक्त प्रति नग रु.50/-

रु.100 व त्यापेक्षा अधिक मूल्याच्या नोटांसाठी

हानी व्यतिरिक्त, प्रति नग, त्या मूल्या एवढी रक्कम.

प्रति प्रेषण 100 व त्यावरील अधिक नगांच्या त्रुटी ताबडतोब डेबिट केल्या जातील. संचयित रितीने 100 नगांची मर्यादा गाठल्यास दंड लावला जाऊ शकतो.

ii. मळक्या नोटांची प्रेषणे व करन्सी चेस्टची शिल्लक ह्यात खोट्या नोटा आढळणे. डीसीएमने दिलेले परिपत्रक डीसीएम (एफ एन व्हीडी)क्र.776/16.01.05/2015-16 दिनांक ऑगस्ट 26, 2015 मधील सूचनांनुसार, बँकांनी प्रेषण केलेल्या मळक्या नोटांमध्ये आणि करन्सी चेस्ट शिल्लकांमध्ये खोट्या नोटा आढळून आल्यास लागु होणारा दंड.
iii. मळक्या नोटांची प्रेषणे व करन्सी चेस्टमधील शिल्लक ह्यात फाटक्या नोटा आढळणे.

कितीही मूल्य असेल तरीही प्रति नग रु.50/-.

प्रति प्रेषणात 100 व त्यापेक्षा अधिक नग फाटक्या नोटांबाबत, ताबडतोब डेबिट केले जाईल. संचयित रितीने 100 नगांची मर्यादा गाठल्यास दंड लावला जाऊ शकतो.

iv.

करन्सी चेस्टद्वारे कार्यकारी मार्गदर्शक तत्वांचे पालन झाले नसल्याचे आरबीआयच्या अधिका-यांना दिसून येणे.

(अ) सीसीटीव्ही काम करत नसणे.

(ब) स्ट्राँग रुममध्ये ठेवलेली शाखेची रोकड/कागदपत्र.

(क) नोटा वेगळ्या करण्यासाठी एनएसएमचा वापर न केला जाणे (काऊंटरवर सादर केलेल्या उच्च मूल्याच्या नोटांचे सॉर्टिंग करण्यासाठी किंवा चेस्ट/आरबीआयकडे पाठविलेल्या नोटांचे सॉर्टिंग करण्यासाठी एनएसएमचा वापर न करणे)

प्रत्येक अनियमिततेसाठी रु.5,000/- दंड.

पुनरावृत्ती झाल्यास दंड रु.10,000/- पर्यंत वाढविला जाईल.

दंड ताबडतोब लावला जाईल.

v.

आरबीआयबरोबर केलेल्या कोणत्याही अटीचे उल्लंघन (करन्सी चेस्ट उघडणे व ठेवणे) किंवा बदलून देण्याची सुविधा देण्याबाबतच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे, आरबीआयच्या अधिका-यांना आढळून येणे.

(अ) साठा असूनही जनतेपैकी कोणालाही काऊंटरवर सुटी नाणी न देणे.

(ब) जनतेने सादर केलेल्या मळक्या नोटा बदलून देण्यात कोणत्याही बँक शाखेने नकार देणे/फाटक्या नोटांचा निर्णय घेण्यास कोणत्याही करन्सी चेस्टने नकार देणे.

(क) चेस्ट बॅलन्सेसची अचानक तपासणी संबंधित नसलेल्या अधिका-यांद्वारे दोन महिन्यातून एकदा व नियंत्रक कार्यालयाच्या अधिका-यांद्वारे सहा महिन्यातून एकदा न केली जाणे.

(ड) इतर बँकांशी जोडणी असलेल्या शाखांना सुविधा/सेवा देण्यास नकार देणे.

(ई) जनतेने व जोडणी असलेल्या बँक शाखांनी सादर केलेल्या कमी मूल्याच्या नोटा (म्हणजे रु.50 व त्यापेक्षा कमी) न स्वीकारणे.

(फ) करन्सी चेस्ट शाखांद्वारे तयार केलेल्या, पुनः देता येण्याजोग्या गड्डीमध्ये/पॅकेटमध्ये फाटक्या/खोट्या नोटा सापडणे.

करारनाम्याचे उल्लंघन केल्यास किंवा सेवेमधील त्रुटीसाठी रु.10,000/-

शाखेद्वारे कराराचे उल्लंघन/सेवेमधील त्रुटी ह्यांची 5 पेक्षा अधिक घटना/प्रसंग झाले असल्यास रु.5 लाख. असा दंड आकारल्याचे वृत्त सार्वजनिक केले जाईल.

दंड ताबडतोब लावला जाईल.

(3) दंड आकारणीबाबत कार्यकारी मार्गदर्शक तत्वे

(3.1) सक्षम प्राधिकरण

कसुरी करणारी करन्सी चेस्ट/बँक शाखा, ज्याच्या अधिकार क्षेत्रात आहे, त्या प्रादेशिक कार्यालयाच्या, इश्यु विभागाचा प्रभारी अधिकारी, अनियमिततेचे स्वरुप ठरविण्यासाठी सक्षम प्राधिकरण असेल.

(3.2) अपीलीय प्राधिकरण

(1) सक्षम अधिका-याने दिलेल्या निर्णयाविरुध्दचे अपील करन्सी चेस्ट/बँक शाखा ह्यांचे नियंत्रक कार्यालय, डेबिट केल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत, संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या प्रादेशिक संचालयाकडे केले जाऊ शकते आणि ते संचालक सदर अपील स्वीकारणे/फेटाळण्याचा निर्णय घेईल.

(2) कर्मचारी नवीन/अप्रशिक्षित असणे, कर्मचा-यांना जाणीव नसणे, दुरुस्ती/सुधारणा करण्याची कृती केली आहे/केली जाईल ह्यासारख्या कारणांमुळे दंड माफ करण्याबाबतची अपीले विचारात घेतली जाणार नाहीत.

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?