<font face="mangal" size="3">महापरिपत्रक - जनतेला ग्राहक सेवा देण्यामधील  - आरबीआय - Reserve Bank of India
महापरिपत्रक - जनतेला ग्राहक सेवा देण्यामधील कामगिरीवर आधारित बँक शाखांसाठी दंड योजना
आरबीआय/2018-19/11 जुलै 3, 2018 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महोदय/महोदया, महापरिपत्रक - जनतेला ग्राहक सेवा देण्यामधील कामगिरीवर आधारित बँक शाखांसाठी दंड योजना कृपया दंड योजनेवरील परिपत्रक डीसीएम(सीसी) क्र.जी-3/03.44.01/2017-18 दि. ऑक्टोबर 12, 2017 चा संदर्भ घ्यावा. (2) ह्या विषयावरील सुधारित व अद्यावत केलेली आवृत्ती माहितीसाठी व आवश्यक त्या कारवाईसाठी जोडपत्रात दिली आहे. हे महापरिपत्रक आमच्या www.rbi.org.in वेबसाईटवरही उपलब्ध आहे. आपला विश्वासु, (मानस रंजन मोहंती) सोबत : वरीलप्रमाणे जनतेला ग्राहक सेवा देण्यामधील कामगिरीवर आधारित, धनकोषांसह बँक शाखांसाठीच्या दंड योजनांवरील महापरिपत्रक (1) स्वच्छ नोटा धोरणाच्या उद्दिष्टांना अनुसरुन, नोटा व नाणी बदलून देण्याबाबत, सर्व बँक शाखा अधिक चांगली ग्राहक सेवा देतील ह्याची खात्री करुन घेण्यासाठी धनकोषांसह बँक शाखांसाठीची दंड योजना तयार करण्यात आली आहे. (2) दंड नोटा व नाणी बदलून देणे/आरबीआयला केलेली प्रेषणे/धनकोषांच्या कार्यकृती इत्यादींमधील त्रुटींसाठी बँकांवर लागु करावयाचे दंड पुढीलप्रमाणे आहेत.
(3) दंड आकारण्यावरील कार्यकारी मार्गदर्शक तत्वे (3.1) सक्षम प्राधिकरण अनियमिततेचे स्वरुप निश्चित करण्यासाठीचे सक्षम प्राधिकरण, कसुरी करणारा धनकोष/बँक शाखा ज्याच्या अधिकार क्षेत्राखाली आहे, त्या प्रादेशिक कार्यालयाच्या इश्यु विभागाचा प्रभारी अधिकारी हाच असेल. (3.2) अपीलीय प्राधिकरण - (i) सक्षम प्राधिकरणाच्या निर्णयाविरुध्दची याचिका धनकोष/शाखेच्या नियंत्रक कार्यालयाकडून, संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या प्रादेशिक संचालकाकडे, डेबिट केले गेल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत केली जाऊ शकते व ते प्रादेशिक संचालक ती याचिका स्वीकारावयाची की फेटाळावयाची हे ठरवतील. (ii) कर्मचारी नवीन/अप्रशिक्षित आहेत, कर्मचा-यांमध्ये जाणीवेचा अभाव, सुधारक कारवाई केली आहे/केली जाईल ह्यासारख्या कारणांनी दंड माफ/रद्द केला जाण्याबाबतच्या याचिका विचारात घेतल्या जाणार नाहीत. |