<font face="mangal" size="3">महानिर्देश - तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निर्द&# - आरबीआय - Reserve Bank of India
महानिर्देश - तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निर्देश, 2016
आरबीआय/डीबीआर/2015-16/18 फेब्रुवारी 25, 2016 महानिर्देश - तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निर्देश, 2016 भारत सरकारने अधिसूचित केलेल्या व भारत सरकारने वेळोवेळी सुधारित केलेल्या, प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अधिनियम, 2002 व प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग (रेकॉर्ड ठेवणे) नियम, 2005 च्या तरतुदीनुसार, विनियमित संस्थांना (आरई), खाते आधारित संबंध स्थापन करताना किंवा अन्यथा एखादा व्यवहार करतेवेळी ग्राहक ओळखीच्या काही रीतींचे अनुसरण करुन त्यांच्या व्यवहारांवर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. 1अशा सुधारणांनुसार दिलेल्या कार्यकारी सूचनांसह, आरईंनी, उपनिर्दिष्ट अधिनियम व नियमांच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलावीत. (2) त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 चे कलम 35 अ, बँकिंग विनियामक अधिनियम (एएसीएस), 1949 च्या कलम 56 सह वाचित, प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग (रेकॉर्ड ठेवणे) नियम, 2005 चा नियम 9 (14) आणि ह्याबाबत रिझर्व्ह बँकेला सहाय्य करणारे इतर कायदे ह्यांनी दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, आणि जनतेच्या हितासाठी असे करणे आवश्यक असल्याबाबत तिचे समाधान झाले असल्याने, भारतीय रिझर्व्ह बँक येथे पुढीलप्रमाणे विहित केलेले निर्देश देत आहे. |