<font face="mangal" size="3">महानिदेश - संकीर्ण अबँकीय कंपन्या (रिझर्व बँक) - आरबीआय - Reserve Bank of India
महानिदेश - संकीर्ण अबँकीय कंपन्या (रिझर्व बँक) निदेश, 2016
आरबीआय/डीएनबीआर/2016-17/41 ऑगस्ट 25, 2016 महानिदेश - संकीर्ण अबँकीय कंपन्या (रिझर्व बँक) निदेश, 2016 जनतेच्या हितासाठी तसे करणे आवश्यक असल्याने, आणि ह्या देशाच्या हितासाठी कर्ज प्रणालीचे नियंत्रण करण्यास ह्या बँकेला साह्य करण्यासाठी तसे करणे आवश्यक असल्याबाबत तिचे समाधान झाले असल्याने, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या (1934 चा 2) (आरबीआय अधिनियम) कलम 45 जे, 45 जेए, 45 के व 45 एलने दिलेल्या अधिकारांचा आणि ह्याबाबत तिला साह्य करणा-या सर्व अधिकारांचा वापर करुन; तसेच, वेळोवेळी सुधारित केलेल्या अधिसूचना क्र. डीएनबीसी.39/डीजी(एच)-77 दि. जून 20, 1977 मध्ये पूर्वी दिलेल्या रद्द करुन, भारतीय रिझर्व बँक, ह्यानंतर/ह्याप्रमाणे विहित केलेल्या प्रत्येक संकीर्ण अबँकीय कंपनीला, लागु असणारे, संकीर्ण अबँकीय कंपन्या (रिझर्व बँक) निदेश, 2016 (हे निदेश) देत आहे. (1) लघु शीर्षक व ह्या निदेशांची सुरुवात (अ) हे निदेश संकीर्ण अ-बँकीय कंपन्या (रिझर्व बँक) निदेश, 2016 म्हणून ओळखले जातील. (ब) हे निदेश ताबडतोब जारी होतील. (2) हे निदेश लागु होणे हे निदेश, एक कंपनी असलेल्या व जम्मु व काश्मिर राज्यातील कोणत्याही ठिकाणी, पुढीलपैकी कोणताही व्यवसाय करणा-या प्रत्येक संस्थेला; तसेच, एक कंपनी असलेल्या व भारतामधील कोणत्याही ठिकाणी, खालील उप-परिच्छेद (2) ते (4) मध्ये संदर्भित केलेल्या कोणताही व्यवसाय-प्रकार करणा-या प्रत्येक संस्थेला लागु होतील. एक प्रायोजक, पुढारी, एजंट किंवा अन्य कोणत्याही क्षमतेत, बचत, म्युच्युअल बेनिफिट, काटकसर किंवा अन्य योजना किंवा कोणत्याही नावाची व्यवस्था ह्यासाठी, एक रकमी किंवा हप्त्यांमध्ये पैसे गोळा करणे आणि असा गोळा केलेला पैसा किंवा त्याचा एक भाग किंवा गुंतवणुकीमधून जमा झालेले उत्पन्नाचा वापर करणे किंवा पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही हेतूसाठी अन्यथा वापरणे. (अ) एखादी लॉटरी, सोडत किंवा अन्य कोणत्याही प्रकारे, विशिष्ट संस्थेच्या वर्गणीदारांना, नियतकालिकतेने किंवा अन्यथा रोख रक्कम किंवा अन्य प्रकारे बक्षिसे किंवा देणग्या देणे किंवा पारितोषिके देणे - मग असे बक्षिस किंवा पारितोषिक मिळालेल्या व्यक्तीवर, अशा योजनेनुसार किंवा व्यवस्थेनुसार आणखी/पुढील प्रदान करण्याची जबाबदारी असो अथवा नसो. (ब) कोणतेही बक्षिस किंवा पारितोषिक न जिंकणा-या किंवा तशा प्रकारच्या वर्गणीदारांना, संपूर्ण वर्गणी किंवा जमा केलेला अन्य पैसा किंवा त्याचा भाग (कोणतेही नाव दिलेला, बोनस, प्रिमियम, व्याज किंवा अन्य लाभ न देता) ती योजना किंवा व्यवस्था समाप्त झाल्यावर किंवा त्या योजनेत दिलेला कालावधी संपल्यावर परत करणे. (2) एक प्रायोजक, पुढारी किंवा एजंट म्हणून, असा व्यवहार किंवा व्यवस्था करील की जेणेकरुन, ती कंपनी, विहित संख्येच्या वर्गणीदारांबरोबर एक करार करील की, त्यांच्यापैकी प्रत्येकजण, एका ठरावीक कालावधी दरम्यान, विशिष्ट रक्कम हप्त्यांच्या स्वरुपात देईल, आणि अशा वर्गणीदारांपैकी प्रत्येक जण, सोडतीमधून किंवा लिलावाद्वारे किंवा टेंडर द्वारे किंवा करारनाम्यात दिलेल्या प्रकारे, बक्षिसाची रक्कम मिळविण्यास पात्र असेल. स्पष्टीकरण ह्या उप-परिच्छेदाच्या संदर्भात, “बक्षिसाची रक्कम” चा अर्थ, सर्व वर्गणीदारांनी दिलेल्या प्रत्येक हप्त्यामधून जमा झालेल्या एकूण रकमेमधून काढलेली (गणन केलेली) व कोणतेही नाव दिलेली रक्कम. (अ) त्या कंपनीने आकारलेली दलाली किंवा प्रायोजक किंवा पुढारी किंवा एजंट म्हणून आकारलेले सेवा आकार. आणि (ब) वर्गणीदाराने, त्याला मिळणारी शिल्लक/उर्वरित रक्कम विचारात घेऊन, तो एकूण वर्गणीमधील सोडण्यास तयार असलेली रक्कम. (3) वरील उप-परिच्छेद (2) मध्ये संदर्भित केलेल्या व्यवसायापेक्षा निराळा असलेला चिट किंवा कुरीचा प्रकार सुरु ठेवणे. (4) वरील उप-परिच्छेद (1) ते (3) मध्ये संदर्भित केलेल्या व्यवसायासारखा अन्य व्यवसाय करणे किंवा सुरु ठेवणे किंवा त्यात भंग असणे. (5) ह्या निदेशात, भारतीय रिझर्व बँकेच्या, अबँकीय विनियामक विभागाने दिलेले विनियम एकत्रित करण्यात आले आहेत. तथापि, एखाद्या संकीर्ण अबँकीय कंपनीला लागु असणारे व ह्या बँकेच्या इतर विभागांनी दिलेले निदेश/मार्गदर्शक तत्वे ह्यांचेही अनुपालन केले जावे. (3) ह्या निदेशांमध्ये अन्य संदर्भ आवश्यक नसल्यास - (अ) “अधिनियम” म्हणजे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 (1934 चा 2) (ब) “बँकिंग कंपनी” म्हणजे, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (1949 चा 10) च्या कलम आय 5 (क) मध्ये व्याख्या केलेली बँकिंग कंपनी. (क) “कंपनी” म्हणजे, आरबीआय अधिनियमाच्या कलम 45 (अ अ) मध्ये व्याख्या केलेली कंपनी; परंतु ह्यात सध्या जारी असलेल्या कोणत्याही कायद्याखाली गुंडाळण्यात येत असलेल्या कंपनीचा समावेश नाही. (ड) “ठेव” ह्या शब्दाचा अर्थ, आरबीआय अधिनियमाच्या कलम 45 आय (ब ब) मध्ये दिल्यानुसारच असेल. (ई) “ठेवीदार” म्हणजे, त्या कंपनीत ठेव ठेवली आहे अशी कोणतीही व्यक्ती. (फ) “पुढारी” म्हणजे, चिट किंवा कुरी कराराखाली किंवा अन्य कोणत्याही योजनेखाली किंवा व्यवस्थेखाली, अशी चिट किंवा कुरी, किंवा अशी योजना किंवा व्यवस्था चालविणारी जबाबदार असलेली व्यक्ती. (ग) “मुक्त राखीव निधी” मध्ये शेअर प्रिमियम अकाऊंट मधील शिल्लक भांडवल व रोखे विमोचन राखीव निधी आणि कंपनीच्या ताळेबंदात दाखविलेला किंवा प्रसिध्द केलेला व नफ्याच्या वाटपामधून निर्माण केलेला राखीव निधी - मात्र हा राखीव निधी, पुढील प्रकारचा नसावा - (1) भविष्यातील एखाद्या जबाबदारीची परतफेड करण्यासाठी किंवा अॅसेट्सच्या मूल्य-हासासाठी किंवा थकित कर्जांसाठी निर्माण केलेला राखीव निधी किंवा (2) कंपनीच्या अॅसेट्सचे पुनर् मूल्यांकन करुन निर्माण केलेला राखीव निधी. (ह) “संकीर्ण अबँकीय कंपनी” म्हणजे ह्या निदेशातील परिच्छेद 2 मध्ये संदर्भित केलेले सर्व किंवा कोणताही व्यवसाय करत असलेली कंपनी. (2) ह्यामध्ये वापरण्यात आलेले परंतु येथे व्याख्या न केलेले, परंतु आरबीआय अधिनियमात व्याख्या केले गेलेले शब्द किंवा संज्ञा ह्यांचा अर्थ, त्यांना आरबीआय अधिनियमात दिलेल्या अर्थाप्रमाणेच असेल. ह्यामध्ये किंवा आरबीआय अधिनियमाखाली व्याख्या न केले गेलेल्या शब्दांना किंवा संज्ञांना, कंपनीज अधिनियम 1956 (1956 चा 1) किंवा कंपनीज अधिनियम 2013 (2013 चा 18) ह्यामध्ये त्यांना दिल्यानुसार असेल. (प्रकरण 3) (4) ह्या निदेशातील प्रकरण 4, प्रकरण 5 व परिच्छेद मध्ये असलेली कोणतीही बाब, एखाद्या संकीर्ण वित्तीय कंपनीने स्वीकार केलेल्या पुढील प्रकारच्या ठेवींना लागु असणार नाही. (1) ह्या निदेशातील परिच्छेद 2 च्या उप-परिच्छेद (2) मध्ये संदर्भित केलेल्या व्यवस्थांखाली किंवा व्यवस्थांखाली मिळालेला किंवा गोळा केलेला कोणताही पैसा. (2) केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने ज्याच्या परतफेडीची हमी दिली आहे असा, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून किंवा अन्य स्त्रोतातून मिळालेला पैसा किंवा स्थानिक प्राधिकरण, विदेशी सरकार किंवा अन्य कोणत्याही विदेशी नागरिक प्राधिकरण किंवा व्यक्तीकडून मिळालेला पैसा. (3) एखाद्या बँकिंग कंपनीकडून भारतीय स्टेट बँकेकडून किंवा बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (1949 चा 10) च्या कलम 51 खाली केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या एखाद्या बँकिंग कंपनीकडून किंवा बँकिंग कंपन्या (उत्पादनांची प्राप्ती व हस्तांतरण) अधिनियम, 1970 (1970 चा 5) च्या कलम 2 मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या कॉरेस्पॉडिंग बँकेकडून किंवा बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (1949 चा 10) च्या कलम 5 (सीसीआय) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सहकारी बँकेकडून मिळालेला पैसा. (4) इंडस्ट्रियल डेवलपमेंट बँक ऑफ इंडिया अधिनियम 1964 (1964 चा 18) खाली स्थापन झालेल्या भारतीय औद्योगिक विकास बँकेकडून किंवा भारतीय कंपन्या अधिनियम 1913 (1913 चा 7) खाली स्थापन झालेल्या भारतीय ऋण व निदेश निगम लि. कडून किंवा भारतीय वित्तीय निगम अधिनियम 1948 (1948 चा 15) खाली स्थापन झालेल्या, भारतीय वित्तीय निगम कडून किंवा भारतीय औद्योगिक पुनर् रचना वैध लि. कडून किंवा जीवन विमा निगम अधिनियम, 1956 (1956 चा 21) खाली स्थापन झालेल्या भारतीय जीवन विमा निगम कडून, किंवा भारतीय लघु उद्योग विकास बँक अधिनियम 1989 (1989 चा 3) खाली स्थापन झालेल्या भारतीय लघु उद्योग विकास बँकेकडून किंवा राज्य वित्तीय निगम अधिनियम 1951 (1951 चा 63) खाली स्थापन झालेल्या राज्य वित्तीय निगम कडून, किंवा भारतीय युनिट ट्रस्ट अधिनियम 1963 (1963 चा 52) खाली स्थापन झालेल्या भारतीय युनिट ट्रस्ट कडून, किंवा जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व तिच्या सहाय्यक कंपन्यांकडून, किंवा तामिळनाडू औद्योगिक गुंतवणुक लि. कडून, किंवा भारतीय राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम लि. कडून किंवा एससीआयसीआय कडून किंवा भारतीय उद्योग पुनर्वसन निगम लि. कडून, किंवा वीज (पुरवठा) अधिनियम 1948 खाली स्थापन झालेल्या कोणत्याही वीज मंडळाकडून, किंवा स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. कडून, किंवा रुरल इलेक्ट्रीफिकेशन कॉर्पोरेशन लि. कडून, किंवा मिनरल्स अँड मेटल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. कडून, किंवा कृषि वित्त निगम लि. कडून, किंवा महाराष्ट्राच्या राज्य औद्योगिक व निवेश निगम लि. कडून, किंवा गुजराथ औद्योगिक व निवेश निगम लि. कडून, किंवा एशियन डेवलपमेंट बँकेकडून, किवा आंतरराष्ट्रीय वित्त निगम कडून, किंवा केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या संपूर्ण मालकीच्या अन्य कोणत्याही वित्तीय संस्थेकडून, किंवा ह्याबाबत रिझर्व बँकेने अधिसूचित केल्या जाणा-या इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून मिळालेला पैसा. (5) कंपनीच्या एखाद्या कर्मचा-याकडून, त्याच्या कामगिरी संबंधाने असलेली सुरक्षा ठेव म्हणून मिळालेला पैसा. मात्र, अशा सुरक्षा ठेवीची रक्कम, एखाद्या अनुसूचित बँकेत किंवा पोस्टात तो कर्मचारी व ती कंपनी ह्यांच्या संयुक्त नावे व पुढील अटींवर ठेवलेली असावी. (अ) ती रक्कम त्या कर्मचा-याची लेखी स्वाक्षरी घेतल्याशिवाय काढता येणार नाही. (ब) ती रक्कम, नोकरीच्या अटी व शर्तीनुसार, त्या ठेवीवरील व्याजासह, त्या बँकेकडून/पोस्ट ऑफिसकडून त्या कर्मचा-याला देय असेल. (6) त्या डिबेंचर्सचे किंवा रोख्यांचे, इक्विटी भाग भांडवल रुपांतरण करण्यासाठी प्रचालकाला किंवा त्यांच्या धारकाला कोणताही पर्याय न देता, रुपांतरणाबाबत पूर्व निश्चित अटींवर डिबेंचर्स किंवा बाँड्स देऊन उभा केलेला पैसा. (7) कंपन्या अधिनियम, 2013 मधील तरतुदींच्या अनुसरुन, केलेल्या ऑफरच्या बाबतीत शेअर अॅप्लिकेशन मनी किंवा वाटप प्रलंबित असताना सिक्युरिटींच्या वाटपासाठीची अग्रिम राशी सह (वेळोवेळी सुधारित केलेल्या, कंपन्या (ठेवींचा स्वीकार) नियम 2014 खाली, परवानगी असलेली विशिष्ट रक्कम व कालावधीसाठी, कोणत्याही सिक्युरिटीबाबत मिळालेली व ठेवलेली कोणतीही रक्कम. (5) संकीर्ण अबँकीय कंपन्यांकडून (एमएनबीसी) ठेवींचा स्वीकार जुलै 1, 1977 रोजी व त्यापासून कोणतीही संकीर्ण अबँकीय कंपनी पुढील गोष्टी करणार नाही. (अ) डिमांड किंवा नोटिस दिल्यावर परतफेड करावी लागेल अशी ठेव किंवा अशी ठेव स्वीकारण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांपेक्षा कमी व छत्तीस महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर परतफेड करावी लागेल अशी ठेव स्वीकारणार नाही, किंवा तिला मिळालेल्या ठेवीचे नूतनीकरण, वरील तारखेच्या पूर्वी किंवा नंतर (जोपर्यंत अशी ठेव किंवा नूतनीकरणाची रक्कम, सहा महिन्यापूर्वी किंवा नूतनीकरणाच्या तारखेपासून छत्तीस महिन्यांपूर्वी पुनर् देय असल्यास) करणार नाही. (ब) पुढील प्रमाणे स्वीकार किंवा नूतनीकरण करणार नाही. (1) ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण करण्याच्या तारखेस, आधीच मिळालेल्या व त्या कंपनीच्या पुस्तकात आऊटस्टँडिंग असलेल्या ठेवींची रक्कम, त्या कंपनीच्या निव्वळ निजनिधीच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास, शेअर होल्डर कडून येणारी कोणतीही ठेव. (2) अपरिवर्तनीय बंधपत्रे किंवा रोख्यांसह इतर कोणतीही ठेव. मात्र, एखाद्या संकीर्ण अबँकीय कंपनीकडे, तिचे शेअर होल्डर सोडून अन्य व्यक्तीकडून मिळालेली कोणतीही ठेव धारण केलेली असल्यास, ती ठेव परिपक्व झाल्यावर परत केली जाईल व तिचे नूतनीकरण केले जाणार नाही. स्पष्टीकरण निव्वळ निज निधी म्हणजे, (अ) त्या कंपनीच्या अगदी अलिकडील ताळेबंदापासून पुढील बाबी वजा केल्यानंतर येणारे एकूण भरणा इक्विटी भांडवल व मुक्त राखीव निधी. (1) संबंधित शिल्लक तोटा (ब) ह्यानंतर, पुढील बाबी दर्शविणा-या रकमा वजा कराव्यात. (1) त्या कंपनीने पुढील कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकी. (1) तिच्या दुय्यम/सहाय्यक कंपन्या (2) पुढील कंपन्यांच्या रोखे, बंधपत्रे, येणे कर्ज व अग्रिम राशी (हायर परचेस व लीज वित्त धरुन) व ठेवी. (1) अशा कंपनीच्या दुय्यम/सहाय्यक कंपन्या आणि मात्र अशी रक्कम वरील (अ) च्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असावी. (6) ठेवीसाठीच्या अर्जाच्या फॉर्ममध्ये विहित करावयाचा तपशील कोणतीही संकीर्ण अबँकीय कंपनी, त्या कंपनीने पुरविलेला अर्जाचा फॉर्म भरला गेल्याशिवाय ठेवीदाराकडून कोणतीही ठेव स्वीकारणार नाही, नूतनीकरण करणार नाही किंवा रुपांतरित करणार नाही. ह्या फॉर्मवर, कंपन्या अधिनियम, 1956 (1956 चा 1) च्या कलम 58 अ खाली केलेल्या अबँकीय वित्तीय कंपन्या व संकीर्ण अबँकीय कंपन्या (जाहिरात) नियम 1977 मध्ये विहित केलेले सर्व तपशील असतील. (7) ठेवीदारांना पावत्या देणे (1) प्रत्येक संकीर्ण अबँकीय कंपनी, तिच्या प्रत्येक ठेवीदाराला किंवा संयुक्त ठेवीदाराच्या गटाला, ह्या निदेशांची सुरुवात होण्याच्या तारखेपूर्वी किंवा नंतर, तिला ठेवीच्या स्वरुपात मिळालेल्या किंवा मिळू शकत असलेल्या प्रत्येक रकमेची पावती (आधी तसे केले नसल्यास) देईल. (2) ह्या पावतीवर, ह्याबाबत कंपनीच्या वतीने तसे अधिकार असलेल्या अधिका-याची सही असेल; आणि त्या पावतीवर, ठेवीची तारीख, ठेवीदाराचे नाव, कंपनीला ठेवीच्या स्वरुपात मिळालेली रक्कम (अंकात व अक्षरात), त्या ठेवीवर द्यावयाचा व्याजदर, व त्या ठेवीच्या परताव्याची तारीख असेल. (8) ठेवींचे रजिस्टर (1) प्रत्येक अबँकीय कंपनी, एक किंवा त्यापेक्षा अधिक रजिस्टर्स ठेवून त्यात प्रत्येक ठेवीदाराबाबत पुढील तपशील वेगवेगळ्याने नोंद करील. (अ) ठेवीदाराचे नाव व पत्ता (2) वरील रजिस्टर/रजिस्टरे त्या कंपनीच्या पंजीकृत कार्यालयात ठेवली जातील आणि ती रजिस्टरे (ज्यात वरील तपशील नोंदला आहे), कोणत्याही ठेवीच्या अलिकडील परतफेडीची किंवा नूतनीकरणाची नोंद करण्यात आली आहे त्या वित्तीय वर्षानंतर कमीत कमी आठ वर्षे चांगल्या स्थितीत सांभाळून ठेवली जावीत. मात्र, त्या कंपनीने, कंपन्या अधिनियम, 1956 च्या (1956 चा 1) कलम 209 च्या उपकलम (1) मध्ये संदर्भित लेखापुस्तके, त्या उपकलमातील तरतुदींनुसार तिच्या पंजीकृत कार्यालयाऐवजी अन्यत्र ठेवली असल्यास, ती अशा अन्य ठिकाणी ठेवाव्यात. त्या कंपनीने त्या तरतुदीचे पुरेसे पालन केले असल्याचे समजले जाईल, मात्र त्यासाठी, त्या कंपनीने, त्या उपकलमाच्या तरतुदींनुसार त्याबाबत रजिस्ट्रारकडे सादर केलेल्या नोटिसीच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत, त्या नोटिसीची एक प्रत ह्या बँकेकडे पाठविली असली पाहिजे. (9) संचालक मंडळाच्या अहवालात समाविष्ट करावयाची माहिती ह्या निदेशांची सुरुवात झाल्यानंतर, कंपन्या अधिनियम 1956 च्या (1956 चा 1) कलम 217 च्या पोटकलम (1) खाली, कंपनीच्या सर्वसाधारण सभेत, संचालक मंडळासमोर ठेवलेल्या प्रत्येक अहवालामध्ये, संकीर्ण अबँकीय कंपनीच्या बाबतीत पुढील तपशील किंवा माहिती समाविष्ट असली पाहिजे. (अ) ह्या निदेशांच्या तरतुदीनुसार किंवा ठेवीदाराबरोबर केलेल्या करारानुसार (लागु असेल ते), त्या ठेवीच्या परतफेडीच्या किंवा नूतनीकरणाच्या तारखेनंतरही त्या ठेवींवर, ठेवीदारांनी हक्क/दावा सांगितला नाही अशा त्या कंपनीच्या ठेवीदारांची एकूण संख्या. आणि - (ब) वरील खंड (अ) मध्ये संदर्भित तारखेनंतर, ठेवीदारांना देय असलेली व हक्क न सांगितलेली किंवा प्रदान न केलेली एकूण रक्कम. (2) वरील तपशील किंवा माहिती, त्या अहवालाच्या संबंधित वित्तीय वर्षाच्या शेवटच्या तारखेस असलेल्या स्थितीनुसार दिली जावी, आणि मागील उप-परिच्छेदातील खंड (ब) मध्ये संदर्भित हक्क न सांगितलेली किंवा प्रदान न केली गेलेली रक्कम. एकूण रुपये पाच लाखांपेक्षा अधिक असल्यास, त्या ठेवीदारांना ती रक्कम परत करण्यास व हक्क न सांगितलेल्या रकमेबाबत संचालक मंडळ कोणती पाऊले उचलणार आहे ह्याचे निवेदनही त्या अहवालात असावे. (10) व्याजदर व दलालीवरील मर्यादा (1) कोणतीही संकीर्ण अबँकीय कंपनी पुढील गोष्टी करणार नाही. (अ) दरसाल दरशेकडा साडेबारा टक्के ह्या दरापेक्षा अधिक व्याजदराने ठेवी मागविणार किंवा स्वीकारणार किंवा नूतनीकृत करणार नाही. मासिक अवकाशापेक्षा कमी अवकाशाने व्याज दिले जावे किंवा चक्रवाढ केले जावे. (ब) खाली दिलेल्या दरांपेक्षा अधिक दराने कोणत्याही दलालाला, त्याने किंवा त्याच्या मार्फत गोळा केलेल्या ठेवींसाठी प्रदान करणार नाही.
(11) ठेवींच्या परिपक्वतेबाबत ठेवीदारांना कळविणे ठेवीची परिपक्वता होण्याच्या किमान दोन महिने आधी, त्या परिपक्वतेची माहिती ठेवीदाराला कळविण्याची जबाबदारी त्या संकीर्ण अबँकीय कंपनीची असेल. (12) परिपक्वतेपूर्वी ठेवींचे नूतनीकरण जेथे एखादी संकीर्ण अबँकीय कंपनी, तिच्या विद्यमान ठेवीदाराला, “एक भागधारक असल्याने”, अधिकतर व्याजदराचा फायदा मिळविण्यासाठी, त्याच्या ठेवीचे मुदतपूर्व नूतनीकरण करण्यास परवानगी देईल. तेथे अशी कंपनी त्या ठेवीदाराला व्याजदरातील वाढ प्रदान करील - मात्र (1) ती ठेव, ह्या निदेशांमधील इतर तरतुदींनुसार नूतनीकृत केलेली असावी, तसेच मूळ करारात असलेल्या, उर्वरित कालावधीपेक्षा जास्त कालावधीची असावी आणि (2) त्या ठेवीच्या बाद झालेल्या (एक्सपायर्ड) कालावधीवरील व्याज हे, ती ठेव जेव्हढ्या कालावधीसाठी सुरु होती आणि/किंवा तिचे आधीच प्रदान आणि वसुली/समायोजन केले गेले आहे, त्या कालावधीसाठी ती सर्वसाधारणतः स्वीकारली गेल्यास ती कंपनी देऊ करेल त्या व्याजदरापेक्षा एक टक्क्याने कमी दराने दिले जावे. (13) मुदतबाह्य ठेवींचे नूतनीकरण एखादी संकीर्ण अबँकीय कंपनी, तिला तसे वाटल्यास, एखाद्या मुदतबाह्य ठेवीवर किंवा त्या मुदतबाह्य ठेवीच्या एका भागावर, त्या ठेवीच्या परिपक्वता-तारखेपासून पुढील अटींवर व्याज देऊ शकते. (अ) त्या मुदतबाह्य ठेवीच्या संपूर्ण रकमेचे किंवा त्या रकमेच्या भागाचे नूतनीकरण, ह्या निदेशांच्या इतर तरतुदीनुसार भविष्यातील एखाद्या तारखेपर्यंत केले जात असल्यास. (ब) ह्यासाठी परवानगी असलेले व्याज, त्या मुदतबाह्य ठेवीच्या परिपक्वतेच्या तारखेस लागु असलेल्या व्याजदरानुसार असावे, व ते व्याज केवळ नूतनीकृत ठेवीच्या रकमेवर दिले जावे. (प्रकरण 5) (14) किमान लॉक-इन कालावधी व ठेवीदाराचा मृत्यु झाल्यास करावयाची परतफेड कोणतीही संकीर्ण अबँकीय कंपनी, ठेव स्वीकारण्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या कालावधी दरम्यान (लॉक-इन कालावधी) त्या ठेवीविरुध्द कर्ज देणार नाही किंवा त्या ठेवीचे मुदतपूर्व प्रदान करणार नाही. मात्र, ठेवीदाराचा मृत्यु झाल्यास, एखादी संकीर्ण अबँकीय कंपनी, लॉकइन कालावधी दरम्यानही त्या ठेवीचे प्रदान, जीवित व्यक्ती खंड असलेल्या संयुक्त धारणासाठी जीवित व्यक्तींना, किंवा मृत ठेवीदाराच्या नामनिर्देशिताला किंवा कायदेशीर वारसांना, त्या जीवित व्यक्तींनी/नामनिर्देशिताने/कायदेशीर वारसाने तशी विनंती केल्यास, आणि कंपनीचे समाधान होईल असा, मृत्युचा पुरावा सादर केल्यावरच केले जाईल. (15) एखादी प्रॉब्लेम संकीर्ण अबँकीय कंपनी नसलेल्या संकीर्ण अबँकीय कंपनीद्वारे ठेवींची परतफेड परिच्छेद 14 मध्ये दिलेल्या तरतुदींच्या अटीवर, एखादी संकीर्ण अबँकीय कंपनी (जी एक प्रॉब्लेम संकीर्ण अबँकीय कंपनी नाही) पुढील गोष्टी करु शकते. (अ) ऑक्टोबर 5, 2004 पासून, तिला तसे वाटल्यास, एखाद्या ठेवीची मुदतपूर्व परतफेड करु शकते. मात्र, वरील तारखेपूर्वी स्वीकारलेल्या ठेवींबाबत, अशी संकीर्ण अबँकीय कंपनी, त्या ठेवीच्या तारखेपासून तीन महिने समाप्त झाल्यानंतर, ठेवीदाराने तशी विनंती केल्यास, व त्या ठेवीच्या स्वीकाराबाबतच्या अटी व शर्ती तशी परवानगी देत असल्यास, त्या ठेवीचे मुदतपूर्व प्रदान करु शकते. (ब) त्या ठेवीच्या तारखेपासून तीन महिने समाप्त झाल्यावर, त्या ठेव रकमेच्या पंचाहत्तर टक्के पर्यंतचे कर्ज, त्या ठेवीदाराला, त्या ठेवीवर दिल्या जाणा-या व्याजदरापेक्षा दोन पॉईंट जास्त दराने देऊ शकते. (16) एखाद्या प्रॉब्लेम संकीर्ण अबँकीय कंपनीद्वारा ठेवींची परतफेड वरील परिच्छेद 14 मध्ये दिलेल्या तरतुदींच्या अटीवर, तातडीचे खर्च भागविण्यास ठेवीदाराला साह्य करण्यासाठी, एखादी प्रॉब्लेम संकीर्ण अबँकीय कंपनी, केवळ पुढील बाबतीतच, त्या ठेवीचे मुदतपूर्व प्रदान करु शकेल किंवा त्या ठेवीविरुध्द कर्ज देऊ शकेल. (अ) एखादी छोटी ठेव संपूर्णपणे परत करणे किंवा रु.10,000/- पर्यंतच्या रकमेपर्यंत अन्य ठेवीची रक्कम परत करणे किंवा (ब) एखादी छोटी ठेव किंवा अन्य ठेवी विरुध्द, रु.10,000/- पर्यंतचे कर्ज, त्या ठेवीवर देय असलेल्या व्याजदरापेक्षा दोन टक्के पॉईंट्स व्याजदराने देणे. (17) एखाद्या प्रॉब्लेम संकीर्ण अबँकीय कंपनीद्वारा ठेवींचे एकत्रीकरण एखाद्या प्रॉब्लेम संकीर्ण अबँकीय कंपनीकडून, एखाद्या एकल/प्रथम नाम असलेल्या ठेवीदाराच्या नावे, त्याच क्षमतेत जमा असलेली सर्व ठेव खाती एकत्रित केली जाऊन, मुदतपूर्व प्रदानासाठी किंवा कर्ज देण्यासाठी, केवळ एकच ठेव खाते म्हणून समजली जातील. मात्र, वरील परिच्छेद 14 मध्ये दिलेल्या, ठेवीदाराचा मृत्यु झाल्यास करावयाच्या मुदतपूर्व प्रदानाला हा खंड लागु होणार नाही. (18) ठेवींच्या मुदतपूर्व प्रदानावरील व्याजदर एखादी संकीर्ण अबँकीय कंपनी, तिच्या स्वतःच्याच मताने किंवा ठेवीदाराच्या विनंतीनुसार, ती ठेव स्वीकारणाच्या तारखेच्या तीन महिन्यांनंतर, परंतु तिच्या परिपक्वतेपूर्वी (ठेवीदाराच्या मृत्युमुळे करावयाचे मुदतपूर्व प्रदान धरुन), एखादी ठेव परत करत असल्यास, ती पुढील दराने व्याज देईल.
स्पष्टीकरण - ह्या परिच्छेदासाठी - (अ) प्रॉब्लेम संकीर्ण अबँकीय कंपनी म्हणजे पुढीलप्रमाणे असलेली एक संकीर्ण अबँकीय कंपनी. (1) परिपक्व झालेल्या ठेवींचा परतावा देण्याबाबतची एखादी कायदेशीर मागणी कामकाजाच्या पाच दिवसांच्या आत परत करु न शकणारी किंवा नकार देणारी किंवा (2) एखाद्या छोट्या ठेवीदाराला त्याची कोणतीही ठेव किंवा तिचा एखादा भाग किंवा व्याज देण्यास तिने केलेल्या कसुरीबाबत, कंपन्या अधिनियम 1956 च्या कलम 58 अ अ खाली सीएलबीला तसे कळविणारी किंवा (3) ठेवीदारांबाबत असलेली दायित्वे पूर्ण करण्यासाठी तिच्या लिक्विड अॅसेट सिक्युरिटीज काढून घेण्यासाठी ह्या बँकेकडे येणारी किंवा (4) ठेवींबाबत किंवा इतर दायित्वे पूर्ण करण्याबाबतची कसुरी टाळण्यासाठी, संकीर्ण अबँकीय कंपनी (रिझर्व बँक) निदेश, 2016 च्या तरतुदींमध्ये सवलत, लवचिकता किंवा सूट मागण्यासाठी ह्या बँकेकडे येणारी किंवा (5) सुओमोटो किंवा ठेवी परत न केल्याजाण्याबाबत ठेवीदारांच्या तक्रारी किंवा त्या कंपनीच्या धनकोनी त्यांची थकबाकी परत न केल्याबाबतच्या तक्रारी ह्यावर आधारित ह्या बँकेने, एक प्रॉब्लेम संकीर्ण अबँकीय कंपनी म्हणून ओळख दिलेली कंपनी. (ब) “छोटी ठेव” म्हणजे, एखाद्या संकीर्ण अबँकीय कंपनीच्या सर्व शाखांमध्ये एकल किंवा प्रथम नाव असलेल्या ठेवीदाराच्या नावे त्याच क्षमतेत रु.10,000/- पर्यंतची एकूण ठेवींची रक्कम. (19) जाहिरात व जाहिरातीच्या ऐवजी दिलेले निवेदन (1) प्रत्येक संकीर्ण अबँकीय कंपनी, अबँकीय वित्तीय कंपन्या व संकीर्ण अबँकीय वित्तीय कंपन्या (जाहिरात) नियम, 1977 च्या तरतुदींचे पालन करतील आणि त्याखाली देण्यात येणा-या प्रत्येक जाहिरातीमध्ये पुढील गोष्टी विहित करतील. (अ) व्याज, प्रिमियम, बोनस किंवा अन्य लाभ ह्या स्वरुपात ठेवीदाराला मिळणारा परताव्याचा प्रत्यक्ष दर. (2) जेथे एखादी कंपनी आवाहन न करता किंवा अन्य व्यक्तीला ठेवी आवाहन करण्यास परवानगी न देता ठेवी स्वीकारु इच्छिते, तेथे त्या कंपनीने अशा ठेवी स्वीकारण्यापूर्वी, ती कंपनी आरबीआयच्या अबँकीय पर्यवेक्षण विभागाच्या ज्या प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात येते, त्या कार्यालयाकडे पंजीकरण करण्यासाठी, अबँकीय वित्तीय कंपन्या व संकीर्ण अबँकीय कंपन्या (जाहिरात) नियम 1977 अनुसार जाहिरातीत समाविष्ट करण्याचा तपशील असलेले निवेदन/विवरणपत्र (प्रत्यक्ष जाहिराती ऐवजी) तसेच ह्यातील उप-परिच्छेद (1) मधील तपशील, ह्या निगमांमध्ये दिलेल्या रितीने सही करुन सादर करील. (3) वरील उप-परिच्छेद (2) खाली दिलेले विवरणपत्र, ते दिलेल्या वित्तीय वर्षाच्या समाप्तीच्या तारखेपासून सहा महिन्यांपर्यंत, किंवा सर्वसाधारण सभेत त्या कंपनीचा ताळेबंद कंपनीसमोर ठेवला जाण्याच्या तारखेपर्यंत, किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली नसल्यास, कंपन्या अधिनियम 1956 (1956 चा 1) मधील तरतुदीनुसार, अशी सभा घेणे आवश्यक असल्याच्या उशिरात उशिरा असलेल्या तारखेपर्यंत (ह्यापैकी जे आधी असेल ते) वैध असेल, आणि त्यानंतरच्या प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ठेवी स्वीकारण्यापूर्वी एक नवीन विवरणपत्र सादर केले जाईल. (20) संयुक्त ठेव जशी इच्छा व्यक्त केली गेल्यास संयुक्त नावांची (तीन पेक्षा अधिक नाही) आणि “दोन्हीही किंवा उत्तरजीवित”, “प्रथम क्रमांकाच्या किंवा उत्तरजीवित” “कोणीही एक किंवा उत्तरजीवित” ह्यासह किंवा त्याशिवाय ठेवी स्वीकारल्या जाऊ शकतात. (21) सूट त्रास टाळण्यासाठी किंवा एखाद्या न्याय्य व पुरेशा कारणासाठी, तसे वाटल्यास, ही बँक, कोणत्याही कंपनीला किंवा कंपन्यांच्या वर्गाला, ह्या निदेशामधील सर्व किंवा कोणत्याही तरतुदीचे, सर्वसाधारणतः किंवा, विशिष्ट काळासाठी (ह्या बँकेने विहित केलेल्या अटींवर) पालन करण्यास मुदतवाढ देऊ शकते किंवा त्यात सूट देऊ शकते. (22) तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निदेश, 2016 लागु असणे ग्राहक असलेल्या सर्व संकीर्ण अबँकीय कंपन्या, बँकिंग विनियम विभागाने वेळोवेळी दिलेल्या, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निदेश, 2016 चे पालन करतील. (23) अनिवासी भारतीयांकडील ठेवी अधिसूचना क्र. फेमा 5/2000-आरबी, दि. मे 3, 2000 अन्वये, कोणतीही संकीर्ण अबँकीय कंपनी, अनिवासी (बाह्य) खाते योजनेखाली अनिवासी भारतीयांकडून, ह्या बँकेने, अशा ठेवींबाबत, अनुसूचित वाणिज्य बँकांसाठी विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने, अनिवासी भारतीयांकडून प्रत्यावर्तनीय ठेवी आवाहित, स्वीकार किंवा नूतनीकृत करणार नाहीत. स्पष्टीकरण :- वरील ठेवींचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी व तीन वर्षांपेक्षा अधिक असणार नाही. (24) इतर विशिष्ट निदेश लागु न होणे अबँकीय वित्तीय कंपन्या सार्वजनिक ठेवींचा स्वीकार (रिझर्व बँक) निदेश 2016, व अबँकीय वित्तीय कंपन्या - सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट ठेवी न स्वीकारणा-या कंपन्या व ठेवी स्वीकारणा-या कंपन्या (रिझर्व बँक) निदेश, 2016 मधील कोणतीही बाब, ह्या निदेशांच्या परिच्छेद 2 मध्ये संदर्भित वित्तीय संस्थेला लागु असणार नाही. (प्रकरण 7) (25) अबँकीय पर्यवेक्षण विभागाने, संकीर्ण अबँकीय कंपन्यांसाठी विहित केलेल्या अहवालांच्या आवश्यकतांचे, संकीर्ण अबँकीय कंपनीने पालन करणे आवश्यक आहे. (26) ह्या निदेशांतील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी, तसे आवश्यक वाटल्यास, ही बँक, ह्यामधील कोणत्याही बाबीचे आवश्यक ते स्पष्टीकरण देऊ शकते आणि ह्या निदेशातील कोणत्याही तरतुदीचा ह्या बँकेने दिलेला अर्थ/स्पष्टीकरण, अंतिम आणि सर्व संबंधित पक्षांसाठी बंधनकारक असेल. ह्या निदेशांचे उल्लंघन आरबीआय अधिनियमाखाली दंडनीय असेल. ह्याशिवाय, ह्या तरतुदी, सध्या जारी असलेले इतर कायदे, नियम, विनियम किंवा निदेश ह्यांच्या तरतुदींच्या रद्द होण्याने नसून अतिरिक्त आहेत. (27) येथे स्पष्ट करण्यात येते की, वेळोवेळी सुधारित केलेल्या संकीर्ण अबँकीय कंपन्या (रिझर्व बँक) निदेश, 1977 च्या रद्दीकरणामुळे पुढील बाबींवर कोणताही परिणाम होणार नाही. (1) त्याखाली प्राप्त झालेले, जमा झालेले किंवा निर्माण झालेले कोणतेही हक्क, दायित्व किंवा जबाबदारी. (2) त्याखाली केलेल्या कोणत्याही उल्लंघनाबाबत निर्माण झालेला दंड, जप्ती किंवा शिक्षा. (3) वर दिलेल्या हक्क, दावा, दायित्व, जबाबदारी, दंड, जप्ती किंवा शिक्षा ह्याबाबतची कोणतीही चौकशी, कायदेशीर प्रक्रिया किंवा उपाय, आणि अशी कोणतीही चौकशी, कायदेशीर प्रक्रिया किंवा उपाय लागु करण्यात, सुरु ठेवण्यात किंवा जारी करण्यात यावेत, तसेच हे निदेश नव्याने आलेच नाहीत असे समजून, अशा दंड, जप्ती किंवा शिक्षा दिली जावी. (28) हे निदेश दिले गेल्यामुळे, ह्या बँकेने दिलेल्या पुढील परिपत्रकांमधील सूचना/मार्गदर्शक तत्वे रद्द झाली आहेत (खाली दिलेल्या यादीनुसार). वरील परिपत्रकांखाली देण्यात आलेल्या सर्व मंजु-या/पोचपावत्या, ह्या निदेशांखाली देण्यात आल्या असल्याचे समजले जाईल. असे रद्दीकरण झाले असले तरीही, रद्द झालेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांखाली केलेल्या/करण्यात येणा-या कोणत्याही कारवाईबाबत संदर्भित सूचना/मार्गदर्शक तत्वांचे मार्गदर्शन असेल.
(सी डी श्रिनिवासन) प्रथम शेड्युल (कृपया ह्या निदेशातील प्रकरण 6 चा परिच्छेद 19 पहा). भारतीय रिझर्व बँक
|