RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78500750

जनतेला ग्राहक सेवा देण्यामधील कामगिरीवर आधारित, चलन वितरण व विनिमय योजनेवरील (सीडीईएस) महानिर्देश

आरबीआय/डीसीएम/2018-19/63
महानिर्देश डीसीएम(सीसी) क्र.जी-3/03.41.01/2018-19

जुलै 3, 2018

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/
मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व बँका

महोदय/महोदया,

जनतेला ग्राहक सेवा देण्यामधील कामगिरीवर आधारित, चलन वितरण व विनिमय योजनेवरील (सीडीईएस) महानिर्देश

प्रस्तावनेमध्ये दिल्यानुसार व आरबीआय अधिनियम 1934 चे कलम 45 आणि बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खाली, आमच्या स्वच्छ नोट धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, ही बँक, मार्गदर्शक तत्वे/सूचना देत आहे. ही उद्दिष्टे टिकून रहावीत ह्यासाठी, व सर्व बँक शाखा जनतेला अधिक चांगल्या ग्राहक सेवा देत राहतील ह्याची खात्री करुन घेण्यासाठी, ह्या बँकेने, चलन वितरण व विनिमय योजना (सीडीईएस) तयार केली आहे.

(2) सोबत जोडलेल्या महानिर्देशांमध्ये ह्या विषयावरील अद्यावत केलेली मार्गदर्शक तत्वे/परिपत्रके समाविष्ट करण्यात आली आहेत. वेळोवेळी नवीन सूचना दिल्या गेल्यावर हे महानिर्देश वेळोवेळी अद्यावत केले जातील.

(3) हे महानिर्देश आरबीआयच्या वेबसाईटवर www.rbi.org.in टाकण्यात आले आहे.

आपला विश्वासु,

(मानस रंजन मोहंती)
मुख्य महाप्रबंधक

सोबत : वरील प्रमाणे


जोडपत्र

जनतेला ग्राहक सेवा देण्यामधील कामगिरीवर आधारित, धनकोषांसह बँक शाखांसाठी “चलन वितरण व विनिमय योजनेवरील (सीडीईएस)” परिपत्रक

(1) स्वच्छ नोट धोरणाला अनुसरुन, सर्व बँक शाखांनी, नोट व नाणी बदलून देण्याबाबत जनतेला अधिक चांगली ग्राहक सेवा देण्याची खात्री करुन घेण्यासाठी, धनकोषांसह बँक शाखांसाठी चलन वितरण व विनिमय योजना (सीडीईएस) तयार करण्यात आली आहे.

(2) प्रोत्साहने

ह्या योजनेनुसार, नोटा व नाणी बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी, बँका पुढील प्रोत्साहनांसाठी पात्र आहेत.

अनु
क्र
सेवेचा प्रकार प्रोत्साहनांचा तपशील
1 कमी बँका असलेल्या राज्यांमधील 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या केंद्रांमध्ये धनकोष उघडणे व ठेवणे. (अ) भांडवली खर्च :- प्रति धन कोषासाठी रु.50 लाखाच्या मर्यादेसह, भांडवली खर्चाच्या 50% भरपाई. ईशान्येकडील प्रदेशांमध्ये, रु.50 लाखांच्या मर्यादेसह 100% भांडवली खर्चाची भरपाई मिळण्यास पात्र.

(ब) महसुली खर्च :- पहिल्या 3 वर्षांसाठी, महसुली खर्चाच्या 50% भरपाई. ईशान्येकडील प्रदेशात पहिल्या 5 वर्षांमधील महसुली खर्चाच्या 50% भरपाई केली जाईल.
2 बँक शाखांमधील कांऊटार्सवर मळक्या नोटा बदलून देणे/फाटक्या नोटांचा निर्णय घेणे (अ) मळक्या नोटा बदलून देणे :- रु.50 पर्यंत मूल्यापर्यंतच्या मळक्या नोटा बदलण्यासाठी, प्रति पॅकेट रु.2.

(ब) फाटक्या नोटांबाबत निर्णय :- प्रति नग रु.2/-.
3 कांऊटर्सवर नाण्यांचे वाटप (1) कांऊटरवर वाटप करण्यासाठी प्रति थैली रु.25.

(2) बँकांकडून दावा येण्याची वाट न पाहताही, धन कोषामधून केलेल्या निकासीवर आधारित प्रोत्साहने दिली जातील.

(3) फुटकळ ग्राहकांनाच छोट्या प्रमाणावर (ठोक नाणी घेणारे ग्राहक नव्हे) नाणी दिली जातील ह्याची खात्री करण्यासाठी तपासणी व शिल्लक प्रणाली ठेवली जावी.

(4) धन कोषांची तपासणी/शाखांना दिलेल्या गुप्त भेटी इत्यादीमार्फत, आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयांकडून नाण्यांचे वाटप पडताळले जाईल.

(3) प्रोत्साहने मिळविण्यासाठी कार्यकारी मार्गदर्शक तत्वे -

(1) आरबीआयच्या इश्यु ऑफिसांमध्ये प्रत्यक्ष मिळालेल्या मळक्या नोटांवरच ही प्रोत्साहने दिली जातील. ह्याबाबत बँकांनी वेगळा दावा करण्याची गरज नाही. शाखांनी सादर केलेल्या मळक्या नोटांबाबत, धन कोष असलेल्या शाखेने त्याबाबतचे प्रोत्साहन, तिच्याशी जोडलेल्या शाखांना, प्रो-रेटा धर्तीवर देणे आवश्यक आहे.

(2) त्याचप्रमाणे, आरबीआयकडे सील केलेल्या लिफाफ्यातून, रजिस्टर्ड/इन्शुअर्ड पोस्टने /मळक्या नोटांसह वेगळ्याने मिळालेल्या, निर्णय घेण्यात आलेल्या नोटांबाबतही प्रोत्साहन दिले जाईल. त्यासाठी वेगळा दावा करण्याची गरज नाही.

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?