<font face="mangal" size="3">जनतेला ग्राहकसेवा देण्यातील कामगिरीवर आधार - आरबीआय - Reserve Bank of India
जनतेला ग्राहकसेवा देण्यातील कामगिरीवर आधारित चलन वाटप व विनिमय योजना (सीडीईएस) वरील महानिर्देश (जानेवारी 6, 2020 रोजी अद्यावत केल्यानुसार)
आरबीआय/2019-20/69 जुलै 1, 2019 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/ जनतेला ग्राहकसेवा देण्यातील कामगिरीवर आधारित चलन वाटप व विनिमय योजना (सीडीईएस) वरील महानिर्देश प्रस्तावनेत दिल्यानुसार व भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 खाली आणि बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खालील आमच्या स्चच्छ नोटा धोरणांच्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी ही बँक, मार्गदर्शक तत्वे/सूचना देत असते. ही उद्दिष्टे टिकविण्यासाठी, सर्व बँका जनतेला अधिक चांगली ग्राहकसेवा देतील ह्याची खात्री करण्यासाठी चलन वाटप व विनिमय योजना (सीडीईएस) नावाची प्रोत्साहन योजना ह्या बँकेने तयार केली आहे. (2) ह्या महानिर्देशात ह्या विषयावरील अद्यावत केलेली मार्गदर्शक तत्वे/परिपत्रके समाविष्ट करण्यात आली आहेत. हे महानिर्देश नवीन सूचना मिळाल्यानंतर वेळोवेळी अद्यावत केले जातील. (3) हे महानिर्देश आरबीआयच्या www.rbi.org.in वेबसाईटवरही टाकण्यात आले आहेत. आपला विश्वासु, (मानस रंजन मोहंती) सोबत - वरील प्रमाणे जनतेला ग्राहकसेवा देण्यातील कामगिरीवर आधारित, धनकोषांसह बँक शाखांसाठी ‘चलन वाटप व विनिमय योजना’ (सीडीईएस) वरील परिपत्रक (1) धनकोषांसह बँक शाखांसाठीची ही चलन प्रसारण व विनिमय योजना (सीडीईएस), स्वच्छ नोट धोरणाच्या उद्दिष्टांना अनुसरुन, नोटा व नाणी बदलून देण्याच्या बाबतीत, सर्व बँक शाखा, जनतेला अधिक चांगली ग्राहकसेवा देतील ह्याची खात्री करुन घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. (2) प्रोत्साहने ह्या योजनेनुसार, नोटा व नाणी बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बँका पुढील वित्तीय प्रोत्साहनांसाठी पात्र असतील.
(3) कामगिरी आधारित प्रोत्साहने मिळविण्यासाठी कार्यकारी मार्गदर्शक तत्वे (1) आरबीआयच्या इश्यु ऑफिसमध्ये प्रत्यक्ष मिळालेल्या मळक्या नोटांवर प्रोत्साहने दिली जातील. ह्याबाबत बँकांनी वेगळ्याने दावा करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सादर केलेल्या मळक्या नोटा/वाटप केलेली नाणी ह्यासाठी धनकोष शाखेने ही प्रोत्साहने तिच्याशी जोडणी असलेल्या शाखांना त्या त्या प्रमाणात द्यावयाची आहेत. (2) त्याचप्रमाणे, आरबीआयकडे केलेली मळक्या नोटांची प्रेषणे/रजिस्टर्ड/इन्शुअर्ड पोस्टाने सीलबंद लिफाफ्यातून पाठविलेल्या मळक्या नोटा ह्यांचेबरोबर मिळालेल्या निर्णय घेण्यात आलेल्या नोटांसाठीचे प्रोत्साहनही दिले जाईल. |