<font face="mangal" size="3">सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र - æ - आरबीआय - Reserve Bank of India
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र - अग्रिम राशींची पुनर् रचना करणे
आरबीआय/2020-21/17 ऑगस्ट 6, 2020 सर्व वाणिज्य बँका (लघु वित्त बँका, स्थानिक क्षेत्र बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचा समावेश) महोदय/महोदया, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र - अग्रिम राशींची पुनर् रचना करणे. कृपया वरील विषयावरील परिपत्रक डीओआर.क्र.बीपी.बीसी.34/21.04.048/2019-20 दि. फेब्रुवारी 11, 2020 चा संदर्भ घ्यावा. (2) कोविड-19 च्या साथीमुळे बाधित झालेल्या सफलताक्षम अशा एमएसएमई संस्थांना आधार देण्याची सातत्याने असलेली गरज विचारात घेता आणि कोविड-19 साठीच्या द्रवीकरण साचा संबंधित इतर अग्रिम राशींसाठी घोषित केलेल्या ताणतणावांशी ह्या मार्गदर्शक तत्त्वांचा मेळ घालण्यासाठी, वरील परिपत्रकानुसार असलेल्या योजनेचा विस्तार करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार ‘प्रमाणभूत’ (स्टँडर्ड) म्हणून वर्गीकृत केलेल्या, व एमएसएमई ना दिलेल्या विद्यमान कर्जांची, पुढील अटींवर, त्यांचा वर्ग कमी न करता, पुनर् रचना केली जावी.
(3) परिपत्रक दि. फेब्रुवारी 11, 2020 मध्ये विहित केलेल्या इतर सर्व सूचनांमध्ये कोणताही बदल नाही. आपला विश्वासु, (सौरव सिन्हा) |