RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78514426

मिल्लाथ को-ऑपरेटिव बँक लि., दावणगेरे - बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील सर्व समावेशक निर्देशांना मुदतवाढ

नोव्हेंबर 8, 2019

मिल्लाथ को-ऑपरेटिव बँक लि., दावणगेरे - बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील सर्व
समावेशक निर्देशांना मुदतवाढ

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित केले जाते की, मिल्लाथ को-ऑपरेटिव बँक लि., दावणगेरे, कर्नाटक ह्यांना देण्यात आलेल्या निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-III.क्र.डी-12/12.23.096/2018-19 दि. एप्रिल 26, 2019 चा कार्यकारी कालावधी वाढविणे, जनतेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे.

त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, मिल्लाथ को-ऑपरेटिव बँक लि., ह्यांना देण्यात आलेले, व नोव्हेंबर 7, 2019 पर्यंत वैधता असलेले निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-III.क्र.डी-12/12.23.096/2018-19 दि. एप्रिल 29, 2019 त्या बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे, नोव्हेंबर 8, 2019 ते मे 2020 पर्यंत लागु असतील.

संदर्भित निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. आरबीआयने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, आरबीआयने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/1148

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?