<font face="mangal" size="3">धन हस्तांतरण सेवा योजना डायरेक्ट टु अकाऊंट स - आरबीआय - Reserve Bank of India
धन हस्तांतरण सेवा योजना डायरेक्ट टु अकाऊंट सुविधा
आरबीआय/2013-14/511 मार्च 4, 2014 प्रति, धन हस्तांतरण सेवा योजनेखाली भारतीय एजंट असलेल्या सर्व प्राधिकृत व्यक्ती. महोदय/महोदया. धन हस्तांतरण सेवा योजना डायरेक्ट टु अकाऊंट सुविधा धन हस्तांतरण सेवा योजनेखाली (एमटीएसएस) भारतीय एजंट असलेल्या व्यक्तींचे लक्ष, धन हस्तांतरण सेवा योजना - सुधारित मार्गदर्शक तत्वे (वेळोवेळी सुधारित) वरील एपी (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र. 89 दि. मार्च 12, 2013 च्या जोडपत्र 2 विभाग 1 च्या, परिच्छेद 4.4 (ई) लाभार्थींना प्रदान कडे वेधण्यात येत आहे. (2) विदेशी आवक प्रेषणे लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यास मदत होण्यासाठी, केवायसीचे अनुपालन केलेल्या लाभार्थी बँकेच्या खात्यात, एमटीएसएस खाली मिळालेल्या, एनईएफटी, आयएमपीएस इत्यादि रीतींनी विदेशी आवक प्रषणे करण्यास परवानगी देण्याचे ठरविण्यात आले आहे. ह्या हेतुसाठी अनुसरण्याची कार्यरीत पुढीलप्रमाणे आहे. एमटीएसएसखाली भारतीय एजंट म्हणून काम करणा-या बँकेला (हिला पार्टनर बँक म्हटले आहे) मिळालेली विदेशी आवक प्रषणे, त्या भारतीय एजंटाची बँक सोडून अन्य बँकेत (रिसिपियंट बँक) ठेवलेल्या, त्या लाभार्थींच्या खात्यात, इलेक्ट्रॉनिक रितीने थेट जमा करता येऊ शकते - मात्र त्यासाठी पुढील अटी आहेत. (अ) पार्टनर बँकेने हस्तांतरित केलेली रक्कम, रिसिपियंट (स्वीकारक) बँका, केवळ केवायसी निकष पूर्ण केलेल्या बँक खात्यातच जमा करील. (ब) केवायसी निकष पूर्ण न केलेल्या खात्यांच्या बाबतीत, स्वीकारक बँक, अशा खात्यात प्रेषण करण्यापूर्वी किंवा निकासी करण्यास परवानगी देण्यापूर्वी, प्राप्तर्कत्याचे केवायसी/सीडीडी करेल. (क) पार्टनर बँक, ते विदेशी आवक प्रेषण असल्याचे, प्राप्तकर्ता बँकेला निर्देशित करण्यासाठी, डायरेक्ट-टु-अकाऊंट प्रेषणे सुयोग्यपणे निर्देशित करील. (ड) प्राप्तकर्ता बँकेकडे निधी हस्तांतरित करतेवेळी, पार्टनर बँक खात्री करुन घेईल की, पाठविणा-याची व लाभार्थींची अचूक माहिती, इलेक्ट्रॉनिक संदेशात समाविष्ट केली गेली आहे. प्रदानाच्या संपूर्ण मालिकेमधील प्रषण संदेशामध्ये ही माहिती (म्हणजे विदेशातील प्रिन्सिपाल, पार्टनर बँक, आणि प्राप्तकर्ता बँक) उपलब्ध असली पाहिजे. पार्टनर बँकेने तिच्या इलेक्ट्रॉनिक संदेशात एक सुयोग्य इशारा (ऍलर्ट) समाविष्ट करावा की, हे विदेशी आवक प्रेषण असून, ते केवायसी निकष पूर्ण न करणा-या खात्यात आणि एनआरई/एनआरओ खात्यात जमा केले जाऊ नये. (ई) प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग (रेकॉर्डस ठेवणे) नियम, 2005 च्या तरतुदींनुसार, प्राप्तर्कत्याची ओळख व इतर कागदपत्र प्राप्तर्कत्या बँकेद्वारे सांभाळून ठेवले जातील. एमटीएसएस साठी रिझर्व बँकेने केवायसी/एएमएल/सीएफटी खाली वेळोवेळी दिलेल्या आवश्यकतांचे पालन पार्टनर बँकेकडे केले जावे. (फ) प्राप्तकर्ता बँक, पार्टनर बँकेकडून अतिरिक्त माहिती घेऊ शकते आणि शंकास्पद व्यवहार आढळल्यास, जिच्याकडून अशी प्रेषणे मिळाली आहेत त्या पार्टनरची माहिती एफआययु-आयएनडीला कळवील. (3) वेळोवेळाप्र दुरुस्त्या केलेल्या, एपी (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र. 89 दि. मार्च 12, 2013 अन्वये दिलेल्या इतर सूचनांमध्ये कोणताही बदल नाही. (4) प्राधिकृत व्यक्तींनी (भारतीय एजंट्स) ह्या परिपत्रकातील मजकुर त्यांच्या संबंधित ग्राहकांच्या नजरेस आणावा. (5) ह्या परिपत्रकातील निदेश, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 (1999 चा 42) कलम 10(4) आणि कलम 11(1) खाली देण्यात आला असून, इतर कोणत्याही कायद्याखाली आवश्यक असलेल्या परवानग्या/मंजुरी ह्यांच्या विपरीत नाहीत. आपला (रुद्र नारायण कार) |