<font face="mangal" size="3">वित्तीय शिक्षणासाठीचे राष्ट्रीय केंद्र (एनì - आरबीआय - Reserve Bank of India
वित्तीय शिक्षणासाठीचे राष्ट्रीय केंद्र (एनसीएफई) - ईलर्निंग व्यवस्थापन प्रणाली व कंटेंट विकास
फेब्रुवारी 14, 2019 वित्तीय शिक्षणासाठीचे राष्ट्रीय केंद्र (एनसीएफई) - ईलर्निंग व्यवस्थापन प्रणाली व कंटेंट विकास वित्तीय शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय केंद्राची (एनसीएफई) स्थापना, वित्तीय शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय डावपेचांची (एनएसएफई) अंमलबजावणी करण्यासाठी, आरबीआय, सेबी, आयआरडीएआय आणि पीएफआरडीए ह्यासारख्या सर्व वित्तीय क्षेत्रातील विनियामकांच्या साह्याने, 2013 मध्ये करण्यात आली. ही संस्था, एफएसडीसीच्या (वित्तीय स्थिरता व विकास मंडळ) पोट समितीच्या वित्तीय समावेशन व वित्तीय शिक्षणावरील तांत्रिक गटाच्या (टीजीएफआयएफएल) अखत्याराखाली काम करते. एनसीएफई ही आता कलम 8 कंपनी (नफ्यासाठी नसलेली) असून ती सप्टेंबर 5, 2018 रोजी सुसंस्थापित करण्यात आली. एनसीएफईने एनसीएफई ई लर्निंग व्यवस्थापन प्रणाली व कंटेंट विकास ह्यासाठी प्रस्ताव मागवले असून एनसीएफईच्या वेबसाईटवर https://www.ncfe.org.in/tenders खाली पाहता येतील. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1943 |