<font face="mangal" size="3">नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. नवी दिल्ली ह्या& - आरबीआय - Reserve Bank of India
नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. नवी दिल्ली ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
ऑक्टोबर 17, 2018 नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. नवी दिल्ली ह्यांचेवर आर्थिक दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नवी दिल्ली ह्यांचेवर रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लागु केला असून, तो दंड, वरील बँकेने केलेले अप्रतिभूतित वैय्यक्तिक कर्जे बाबत आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याने व केवायसी त्रुटी ह्यासाठी लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/900 |