<font face="mangal" size="3px">नोबल को-ऑपरेटिव बँक लि. नॉयडा (यु.पी.) ह्यांचेवर  - आरबीआय - Reserve Bank of India
नोबल को-ऑपरेटिव बँक लि. नॉयडा (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
जुलै 12, 2019 नोबल को-ऑपरेटिव बँक लि. नॉयडा (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने नोबल को-ऑपरेटिव बँक लि. नॉयडा (यु.पी.) ह्यांचेवर रु 1,00,000/- (रुपये एक लाख) आर्थिक दंड लागु केला असून, तो दंड फसवणुकींचे वर्गीकरण व अहवाल ह्याबाबत आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले असल्याने लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2019-2020/131 |