<font face="mangal" size="3">आता रिझर्व बँकेची वेबसाईट अगदी तुमच्या आटोक - आरबीआय - Reserve Bank of India
आता रिझर्व बँकेची वेबसाईट अगदी तुमच्या आटोक्यत
मार्च 10, 2017 आता रिझर्व बँकेची वेबसाईट अगदी तुमच्या आटोक्यत भारतीय रिझर्व बँकेच्या वेबसाईटच्या (www.rbi.org.in) मोबाईल अॅप्लिकेशन (अॅप) आवृत्तीचे, भारतीय रिझर्व बँकेने आज औपचारिक उद्घाटन केले. हे अॅप, अँड्रॉईड तसेच आयओएस मंचावरही उपलब्ध असून, ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ हा की-वर्ड वापरुन, अँड्रॉईड फोन/फोन मधील अनुक्रमे प्ले स्टोअर/अॅप स्टोअर मधून डाऊनलोड करता येते. सुरुवात म्हणून, वेबसाईटचे सर्वात जास्त अॅक्सेस केले जाणारे विभाग : वृत्तपत्र निवेदने, आयएफजी/एसआयसीआर कोड्स, बँकेच्या रजा आणि चार मुख्य चलनांचे संदर्भ दर व पॉलिसी दर ह्यासह विद्यमान दर, ह्या अॅपवर उपलब्ध करण्यात आले आहेत. अॅपच्या लँडिंग पेजच्या वरच्या बाजूवर एक डायनॅमिक विंडो असून, त्यात जनता-जागरणाचे तीन संदेश आलटून-पालटून दाखविले जातात. रु.2,000 व रु.500 च्या नव्या नोटांचे डिझाईन, तसेच ‘आरबीआय कहता है’ मालिकेखाली केवायसी वरील संदेश, ह्यामधील कशावरही क्लिक केल्यावर देण्यात आलेल्या जन-जागरणाचा संपूर्ण मजकुर, युजर ओपन करु शकतो व वाचू शकतो. नवीन वितरणावरील अॅलर्ट मिळविण्यासाठी, युजर, ‘पुश’ नोटिफिकेशन अॅक्टिवेट करु शकतो. हे अॅप अधिक उपयुक्त व कुतुहलजनक करण्यासाठी, युजर्सनी त्यांच्या सूचना व फीडबॅक ई-मेलने पाठवाव्यात. शिबी एस. मथाई वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2419 |