सरकारी व्यवहारांसाठी सर्व एजन्सी बँका एप्रिल 1, 2017 रोजी सुरु ठेवणे - सुधारित सूचना
मार्च 29, 2017 सरकारी व्यवहारांसाठी सर्व एजन्सी बँका एप्रिल 1, 2017 रोजी सुरु ठेवणे - सुधारित सूचना मार्च 24, 2017 रोजीच्या वृत्तपत्र निवेदनांन्वये, सरकारी स्वीकार व प्रदान व्यवहारांना साह्य करण्यासाठी सरकारी व्यवहार करणा-या सर्व एजन्सी बँकांना, विद्यमान आर्थिक वर्षातील सर्व दिवशी (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस ह्यासह) आणि एप्रिल 1, 2017 रोजीही त्यांच्या सर्व बँक शाखा सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. तथापि, पुनर्विचार केल्यानंतर, एप्रिल 1, 2017 रोजी ह्या शाखा सुरु ठेवण्यात येऊ नये असे ठरविण्यात आले आहे. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2596 |
पेज अंतिम अपडेट तारीख: