<font face="mangal" size="3">आयकराची थकबाकी आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत - आरबीआय - Reserve Bank of India
आयकराची थकबाकी आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - डिसेंबर 2016
नोव्हेंबर 02, 2016 आयकराची थकबाकी आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - डिसेंबर 2016. भारतीय रिझर्व बँकेने आय कर निर्धारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांची आयकराची रक्कम ठरलेल्या तारखेच्या पुरेशा आधी जमा करावी. असेही सांगण्यात आले आहे की, कर दाते, एजन्सी बँकांच्या निवडक शाखा किंवा ह्या बँकांनी देऊ केलेल्या ऑनलाईन प्रदान सुविधांचा उपयोग करु शकतात. ह्यामुळे, रिझर्व बँकेच्या कार्यालयांमध्ये लांब रांगांमध्ये उभे राहण्याचा त्रास टळेल. असे दिसून आले आहे की, दर वर्षी भारतीय रिझर्व बँकेमार्फत आयकराची थकबाकी जमा करण्यासाठीची गर्दी, डिसेंबरच्या अखेरीस खूपच असते. आणि ह्यासाठी, जास्तीत जास्त अतिरिक्त काऊंटर्स उघडून पोच-पावत्या देण्याचे काम रिझर्व बँकेला जड जाते. बहुतेक बँका कराचे ऑनलाईन प्रदान करण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. आयकराची थकबाकी चे प्रदान स्वीकारण्यासाठी एकोणतीस बँकांना प्रधिकृत करण्यात आले आहे. त्या पुढील प्रमाणे :
अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1087 |