<font face="mangal" size="3">आपली आयटी थकबाकी प्राधिकृत बँक शाखांमध्ये कì - आरबीआय - Reserve Bank of India
आपली आयटी थकबाकी प्राधिकृत बँक शाखांमध्ये किंवा आरबीआयमध्ये जमा करा - डिसेंबर 2016
नोव्हेंबर 17, 2016 आपली आयटी थकबाकी प्राधिकृत बँक शाखांमध्ये किंवा आरबीआयमध्ये जमा करा - डिसेंबर 2016. असे दिसून आले आहे की, भारतीय रिझर्व बँकेच्या मार्फत आपली आयटी थकबाकी जमा करण्यासाठीची गर्दी डिसेंबर 2016 च्या अखेरीस खूपच होत आहे. आणि ह्या कामासाठी जास्तीत जास्त अतिरिक्त काऊंटर्स उपलब्ध केले असूनही ह्या बँकेसाठी हा भार सांभाळणे कठीण होते. त्यामुळे, जनतेला, ह्या बँकेमध्ये अनावश्यकतेने बराच काळ रांगांमध्ये बराच काळपर्यंत तिष्ठत उभे रहावे लागते. ह्यामुळे होणारी असुविधा कमी करण्यासाठी करनिर्धारितींना सांगण्यात येते की, शेवटी-शेवटी होणारी गर्दी-गडबड टाळण्यासाठी त्यांनी त्यांची आय कर थकबाकी ठरलेल्या तारखेच्या पुरेशा आधीच प्रदान करावी. ह्याशिवाय, मुंबई येथे, खाली दिलेल्या मान्यता प्राप्त एजन्सी बँकांच्या शाखाही आय कर थकबाकी जमा करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आहेत. ह्यापैकी बहुतेक बँका, कर प्रदान करण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन देत आहेत. करनिर्धारितींनी त्यांच्या सोयीसाठी ह्या व्यवस्थांचा लाभ घ्यावा.
अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1236 |