<font face="Mangal" size="3px">आय कराची थकबाकी, आरबीआयकडे किंवा प्राधिकृत ब& - आरबीआय - Reserve Bank of India
आय कराची थकबाकी, आरबीआयकडे किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - मार्च 2016
फेब्रुवारी 15, 2016 आय कराची थकबाकी, आरबीआयकडे किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - मार्च 2016 भारतीय रिझर्व बँकेने आय कर निर्धारितींना (अॅसेसी) विनंती केली आहे की, त्यांनी त्यांच्या आय कराची थकबाकी, नेमलेल्या तारखेच्या आधीच प्रदान करावी. असेही सांगण्यात आले की, निर्धारिती, पर्यायाने, एजन्सी बँकांच्या निवडक शाखांचा किंवा त्या बँकांनी, ऑनलाईन कर प्रदान करण्याच्या सुविधेचा उपयोग करावा. ह्यामुळे रिझर्व बँकेच्या कार्यालयांमध्ये लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याचा त्रास वाचेल. असे दिसून आले आहे की, रिझर्व बँकेच्या मार्फत आय कर भरण्यासाठी दर वर्षी मार्च अखेर खूप गर्दी होते आणि त्यामुळे, ह्या कामासाठी शक्य तेवढे अतिरिक्त काऊंटर्स उघडले गेले तरीही, पावत्या देण्याचा भार सांभाळणे रिझर्व बँकेला अवघड जाते. आय कराची थकबाकी प्रदान करण्यासाठी पुढील एकोणतीस एजन्सी बँकांना प्राधिकृत करण्यात आले आहे :
अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1931 |