<font face="mangal" size="3">शनिवार, 12 नोव्हेंबर व रविवार, 13 नोव्हेंबर 2016 रोजी प - आरबीआय - Reserve Bank of India
शनिवार, 12 नोव्हेंबर व रविवार, 13 नोव्हेंबर 2016 रोजी प्रदान प्रणाली (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ, आणि कॉल मार्केट्स) सुरु राहणार
नोव्हेंबर 10, 2016 शनिवार, 12 नोव्हेंबर व रविवार, 13 नोव्हेंबर 2016 रोजी प्रदान प्रणाली (आरटीजीएस, एनईएफटी, शनिवार, दि. 12 नोव्हेंबर व रविवार दि. 13 नोव्हेंबर 2016 ह्या दोन्हीही दिवशी बँका जनतेच्या व्यवहारांसाठी सुरु राहणार असल्याने, असे ठरविण्यात आले आहे की, शनिवार 12 नोव्हेंबर व रविवार 13 नोव्हेंबर 2016 ह्या दोन्हीही दिवशी प्रदान प्रणालीही (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, सीपीएलओ व कॉल मार्केट्स) सुरु ठेवल्या जातील. सर्व सहभागी/सभासद बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी, नोव्हेंबर 12 व नोव्हेंबर 13, 2016 रोजी, वरील प्रदान प्रणालींवरील कार्यकृती, नेहमीच्या कामकाजाच्या दिवसांप्रमाणेच उपलब्ध करुन द्याव्यात. ह्या दोन दिवशी वरील प्रदान प्रणाली उपलब्ध असल्याबाबत बँकांनी योग्य ती प्रसिध्दी द्यावी. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1164 |