<font face="mangal" size="3">शनिवार 12 नोव्हेंबर 2016 आणि रविवार 13 नोव्हेंबर 2016 रो - आरबीआय - Reserve Bank of India
शनिवार 12 नोव्हेंबर 2016 आणि रविवार 13 नोव्हेंबर 2016 रोजी प्रदान प्रणाली (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ आणि कॉल मार्केट्स) सुरु राहणार
आरबीआय/2016-2017/116 नोव्हेंबर 10, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी/ महोदय शनिवार 12 नोव्हेंबर 2016 आणि रविवार 13 नोव्हेंबर 2016 रोजी प्रदान प्रणाली (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ आणि कॉल मार्केट्स) सुरु राहणार शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 व रविवार, 13 नोव्हेंबर 2016 रोजी जनतेच्या व्यवहारांसाठी बँका सुरु राहणार असल्याने, असे ठरविण्यात आले आहे की, प्रदान प्रणाली देखील (आरटीजीएस, एनईएफटी, चेक समाशोधन, रेपो, सीबीएलओ व कॉल मार्केट्स) शनिवार 12 नोव्हेंबर व रविवार 13 नोव्हेंबर 2016 रोजी सुरु ठेवण्यात येतील. सर्व सहभागी/सभासद बँकांना सांगण्यात येते की त्यांनी नोव्हेंबर 12 व 13, 2016 रोजी, त्यांच्या ग्राहकांसाठी वरील प्रदान प्रणाली, नेहमीच्या कामकाजाच्या दिवसांप्रमाणेच कार्यरत ठेवाव्यात. वरील प्रदान प्रणाली वरील दोन दिवशी उपलब्ध असण्याबाबत बँकांनी योग्य ती प्रसिध्दी द्यावी. आपली विश्वासु (नंदा एस. दवे) |