<font face="mangal" size="3">प्रधान मंत्री फसल बीमा योजना - एमओए अँड एफडब्ल& - आरबीआय - Reserve Bank of India
प्रधान मंत्री फसल बीमा योजना - एमओए अँड एफडब्ल्युच्या क्रॉप इन्शुअरन्स पोर्टलमध्ये बँक शाखांद्वारा माहिती न दिली जाणे
आरबीआय/2016-17/41 ऑगस्ट 25, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय/महोदया, प्रधान मंत्री फसल बीमा योजना - एमओए अँड एफडब्ल्युच्या क्रॉप इन्शुअरन्स पोर्टलमध्ये बँक शाखांद्वारा माहिती न दिली जाणे कृपया आमचे परिपत्रक एफआयडीडी.क्र.एफएसडी.बीसी.20/05.10.007/2015-16 दि. मार्च 17, 2016 चा संदर्भ घ्यावा. त्यात आपणास सांगण्यात आले होते की, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असल्याची खात्री करुन घेण्यात यावी, आणि ह्या योजनेखालील ठरविलेली उद्दिष्टे व ध्येये साध्य करण्यासाठी 100% ज्ञात कर्जदार शेतकरी व बहुसंख्येने असलेल्या कर्ज न घेणारे शेतकरी समाविष्ट केले असल्याची खात्री करुन घ्यावी. (2) भारत सरकारच्या पीएमएफबीवाय बाबतच्या कार्यकारी मार्गदर्शक तत्वांनुसार, कर्ज लाभ घेणा-या कर्जदार शेतक-यांच्या व कर्ज न घेणा-या शेतक-यांच्या जमीनी व पिकांसह संबंधित अशी सर्व माहिती शाखांद्वारे गोळा करण्यात यावी. (3) शेती व शेतकरी कल्याण मंत्रालयाने, सर्व बँकांना सांगितले आहे की त्यांनी www.agri-insurance.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या क्रॉप इन्शुअरन्ससाठी असलेल्या युनिफाइड पोर्टलमध्ये शेतक-यांबाबतची माहिती असावी. आमच्या नजरेस आले आहे की, ह्या पोर्टलमध्ये बँक शाखांद्वारे एंट्रीज केल्या जात नाहीत. परिणामी, एमओए व एफडब्ल्यु व राज्य सरकारे इत्यादींना, विमा संरक्षण देण्याच्या व्याप्तीचे मूल्यमापन करण्यातील अडचणींची आणि कापण्यात आलेल्या हप्त्यांची माहिती मिळू शकत नाही. ह्यासाठी आपणास सांगण्यात येते की, आपण आपल्या शाखांना, लवकरात लवकर वरील पोर्टलमध्ये माहिती देण्यासाठी योग्य त्या सूचना द्याव्यात. आपली, (उमा शंकर) |