<font face="mangal" size="3">प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीक - आरबीआय - Reserve Bank of India
प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016
फेब्रुवारी 7, 2017 प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016 भारतीय रिझर्व बँकेशी सल्लामसलत करुन भारत सरकारने, अधिसूचना क्र.एसओ 4061(ई) दि. डिसेंबर 16, 2016 अन्वये, प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस) अधिसूचित केली होती. ह्या योजनेखाली, त्याचे उघड न केलेले उत्पन्न घोषित करणारी कोणतीही व्यक्ती, प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजनेत (पीएमजीकेडीएस) रक्क्म ठेवू शकते. उघड न केलेल्या, घोषित केलेल्या उत्पन्नाच्या पंचवीस टक्के रक्कम प्राधिकृत बँकांमध्ये (भारत सरकारने अधिसूचित केलेल्या) डिसेंबर 17, 2016 (शनिवार) ते मार्च 31, 2017 (शुक्रवार) दरम्यान ठेव म्हणून ठेवता येते. ह्या बाबतीत, ह्या पीएमजीकेडीएसमध्ये एकापेक्षा अधिक वेळा ठेवी ठेवण्यास भारत सरकारने ठरविले आहे. त्यानुसार, वरील अधिसूचनेचा परिच्छेद 4(4) पुढीलप्रमाणे बदलण्यात आला आहे. ‘4. बाँड्स लेजर अकाऊंट मध्ये वर्गणी व गुंतवणुक करण्याची रीत ----- (4) ह्या योजनेखालील कलम 199फ च्या पोटकलम (1) खाली ठेवावयाची ठेव, एका किंवा त्यापेक्षा अधिक वेळा/प्रसंगी करता येईल. ह्या ठेवी, कलम 199 क च्या पोटकलम (1) खाली घोषणापत्र सादर करण्यापूर्वी ठेवता येतील’ अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2116 |