<font face="mangal" size="3">प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीक - आरबीआय - Reserve Bank of India
प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016 सुधारित
जानेवारी 20, 2017 प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016 सुधारित भारतीय रिझर्व बँकेशी सल्लामसलत करुन, भारत सरकारने, अधिसूचना क्र.एस ओ 4061(ई) दि. डिसेंबर 16, 2016 अन्वये, प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस) अधिसूचित केली होती. ह्या योजनेखाली, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना 2016 खाली आपले प्रकट न केलेले उत्पन्न घोषित करणारी कोणतीही व्यक्ती ठेव ठेवू शकते. प्रकट न केलेल्या घोषित केलेल्या उत्पन्नाच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी नसलेली रक्कम, प्राधिकृत बँकांमध्ये (भारत सरकारने अधिसूचित केल्यानुसार), डिसेंबर 17, 2016 (शनिवार) ते मार्च 31, 2017 पर्यंत ठेव म्हणून ठेवता येऊ शकते. ह्या संबंधाने येथे स्पष्ट करण्यात येते की, पीएमजीकेडीएस 2016 खाली ठेवी स्वीकारण्यासाठी सहकारी बँका ह्या प्राधिकृत बँका नाहीत. वरील अधिसूचनेचा परिच्छेद 7(1) पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात आला आहे. “7. प्राधिकृत बँका :- (1) बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (1949 चा 10) लागु होत असलेल्या सहकारी बँका सोडल्यास, कोणत्याही बँकिंग कंपनीकडून, बाँड्स लेजर अकाऊंटच्या स्वरुपात, ठेवीं साठीचे अर्ज स्वीकारले जातील.” अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1956 |