प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस) 2016 कार्यकारी मार्गदर्शक तत्वे
आरबीआय/2016-17/188 डिसेंबर 16, 2016 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महोदय/महोदया, प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस) 2016 कार्यकारी मार्गदर्शक तत्वे ह्याचा संदर्भ, केंद्र सरकारची अधिसूचना क्र. एसओ 406-1(ई) आणि प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016 (ह्यानंतर हिला ‘ही योजना’ म्हटले आहे) वरील आरबीआयचे परिपत्रक आयडीएमडी सीडीडी.क्र.1453/14.04.050/2016-17 दि. डिसेंबर 16, 2016. ह्या बाबतचे नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आमच्या वेबसाईटवर www.rbi.org.in टाकण्यात आले असून, ह्या योजनेबाबतची कार्यकारी मार्गदर्शक तत्वे खाली दिली आहेत. (1) अर्ज घोषणाकारां (प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना, 2016 साठी टॅक्सेशन अँड इनवेस्टमेंट रेजिनच्या कलम 199 क च्या पोटकलम (1) खाली आपले अघोषित उत्पन्न घोषित करणारी व्यक्ती) कडून, प्रधान मंत्री गरीब कल्याण ठेव योजना (पीएमजीकेडीएस), 2016 खाली ठेवी/जमा करण्यासाठीचे अर्ज, प्राधिकृत बँकांच्या (म्हणजे, बँकिंग विनियम अधिनियम 1949 (1949 चा 10) लागु असलेली कोणतीही बँकिंग कंपनी) शाखांमध्ये, 17 डिसेंबर 2016 ते 31 मार्च 2017 दरम्यान, नेहमीच्या/नियमित बँक-कामाच्या वेळेत स्वीकारले जातील. (2) तुमचा ग्राहक जाणा आवश्यकता (अ) ह्या योजनेखालील ठेवींसाठीचा अर्ज, फॉर्म 2 मध्ये आणि जमा करावयाची रक्कम, संपूर्ण नाव, परमनंट अकाऊंट नंबर (ह्याला ह्यानंतर पॅन म्हटले आहे), बँक खात्याची माहिती (विमोचनाची रक्कम मिळण्यासाठी) व घोषणा करणाराचा पत्ता, स्पष्टपणे देऊन केला जाईल. (ब) मात्र, घोषणाकाराकडे पॅन नसल्यास त्याने पॅनसाठी अर्ज करावा व असा अर्ज केला असल्याबाबतची माहिती व त्याची पोच-पावती क्रमांक सादर करावा. आवश्यक तेथे, संबंधित अतिरिक्त तपशील (ई मेल आयडी) अर्जदारांकडून घेण्यात यावा. प्राधिकृत बँकांनी खात्री करुन घ्यावी की अर्जाचा फॉर्म सर्व प्रकारे भरण्यात/पूर्ण करण्यात आला आहे. (क) ह्या अर्जासोबत, टॅक्सेशन अँड इनवेस्टमेंट रेजिम फॉर प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना, 2016 खाली, रोखीने, किंवा ड्राफ्टने किंवा चेकने किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरने भरलेल्या अघोषित उत्पन्नाच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी नसलेली रक्कम भरली/जमा केली जावी. (ड) बँकेने प्राधिकृतीकरण केल्यानंतर घोषणाकाराला पोचपावती (फॉर्म 2 चा एक भाग) दिली जाईल. (3) भारत सरकारला ठेवींचा तपशील देणे (अ) प्राधिकृत बँक, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार ह्यांना, घोषणाकाराने सादर केलेले घोषणापत्र स्वीकारण्यापूर्वी, त्या ठेवीची माहिती पडताळून पाहण्यास, ह्या विभागाला मदत व्हावी ह्यासाठी, पुढील कामकाजाच्या दिवसापूर्वी, फॉर्म 5 मध्ये, त्या जमा रकमेचा तपशील इलेक्ट्रॉनिक रितीने सादर करील.(कृपया, सीबीडीटी अधिसूचना 2016ची क्र.14, दिनांक 30.12.2016 मधील सूचनांचा संदर्भ घ्यावा.) (ब) ह्याबाबत मिळालेली माहिती प्राधिकृत बँक गोपनीय ठेवील. (4) धारण व नामनिर्देशनाची रीत (अ) आरबीआयला तपशील मिळाल्यानंतर, बाँड्स लेजर अकाऊंट्स निर्माण केले जातील आणि ह्या योजनेखाली जमा केलेल्या ठेवी/रकमा, भारतीय रिझर्व बँकेकडून, घोषणाकाराच्या नावे जमा (क्रेडिट) ठेवण्यात येतील. (ब) फॉर्म 1 च्या नमुन्यात, घोषणाकाराला धारण-प्रमाणपत्र दिले जाईल. (क) बाँड्स लेजर अकाऊंट उघडण्याची परिणामकारक तारीख ही, रोख रक्कम भरल्याची तारीख किंवा ड्राफ्ट/चेक वटविला जाण्याची तारीख किंवा इलेक्ट्रॉनिक प्रदानाची तारीख समजली जाईल. (ड) धारक एक किंवा अधिक व्यक्तींचे नामनिर्देशन करु शकेल. (5) व्याजप्रदान ह्या ठेवींवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. (6) आरबीआयच्या ई-कुबेर मार्फत प्रक्रिया करणे प्राधिकृत बँक, रोख रक्कम जमा केल्याच्या किंवा इलेक्ट्रॉनिक प्रदान केल्याच्या किंवा चेक/ड्राफ्ट वटविल्या गेल्याच्या तारखेसच, त्या जमा-रकमेचा तपशील, भारतीय रिझर्व बँकेच्या, कोअर बँकिंग सोल्युशन्स ई-कुबेर मध्ये अपलोड करील. ही जमा केलेली रक्कम त्याच दिवशी भारतीय रिझर्व बँकेकडे हस्तांतरित केली जाईल. ही ई-कुबेर प्रणाली, इन्फिनेट किंवा इंटरनेट मार्फत अॅक्सेस करता येईल. प्राधिकृत बँकांनी, त्यांना मिळालेल्या अशा ठेवींची/रकमांची माहिती एंटर करणे आवश्यक आहे. अनवधानाने झालेल्या चुका टाळण्यासाठी त्यांनी ही माहिती बिनचुक असल्याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. अर्ज मिळाल्याबाबतचा दुजोरा घोषणाकारांना ताबडतोब देण्यात येईल. ई-कुबेर मार्फत, प्राधिकृत बँकांना धारण-प्रमाणपत्रे पाठविली जातील आणि ती ग्राहकांना दिली जावीत. (7) सेवा आणि पाठपुरावा प्राधिकृत बँका, घोषणाकारांनी जमा केलेल्या ठेवींबाबत आवश्यक त्या सेवा देतील (म्हणजे बँक खात्याचा तपशील अद्यावत करणे, नामनिदेशन रद्द करणे इत्यादि). परतफेड केली जाईपर्यंत, प्राधिकृत बँकांनी हे अर्ज जपून ठेवणे आवश्यक आहे. (8) प्राधिकृत बँकांसाठी/एजन्सी बँक आकार ह्या योजनेखाली वरीलप्रमाणे ठेवी स्वीकारण्यासाठी किंवा घोषणाकारांना सेवा देण्यासाठी बँकांना कोणतीही दलाली/एजन्सी बँक आकार दिले जाणार नाहीत. (9) संपर्क माहिती काही प्रश्न/स्पष्टीकरणे ह्यासाठी ई-मेल करावा. आपला विश्वासु, (राजेंद्र कुमार) |
पेज अंतिम अपडेट तारीख: