2005 पूर्वीच्या मालिकेतील बँक नोटा -अदलाबदल धोरणात सुधारणा
|
आरबीआय/2015-16/443 जून 30, 2016 अध्यक्ष/कार्यकारी संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय/महोदया, 2005 पूर्वीच्या मालिकेतील बँक नोटा -अदलाबदल धोरणात सुधारणाकृपया ह्या विषयावरील आमची परिपत्रके डीसीएम(पीएलजी) क्र.जी -8/2331/10.27.00/2015-16 दिनांक डिसेंबर 23, 2015 व डीसीएम(पीएलजी) क्र.जी -9/2856/10.27.00/2015-16 दिनांक फेब्रुवारी 11, 2016 आणि वृत्तपत्रासाठीचे निवेदन दि. डिसेंबर 23, 2015 चा संदर्भ घ्यावा. (2) आपणास माहितच असेल की, जानेवारी 2014 पासून, 2005 मालिका पूर्वीच्या बँक नोटा प्रचारातून काढून घेण्यात आल्या आहेत आणि अथक प्रयत्नानंतर ह्या नोटा मोठ्या प्रमाणावर काढून घेण्यात आल्या आहेत. तथापि छोट्या प्रमाणात ह्या नोटा अजूनही प्रचारात आहेतच. ह्याचा आढावा घेतल्यानंतर असे ठरविण्यात आले आहे की, जुलै 1, 2016 नंतर, 2005 पूर्व मालिकांमधील बँक नोटा बदलून देण्याची, जनतेसाठी असलेली सुविधा रिझर्व बँकेच्या केवळ पुढील कार्यालयांमध्येच उपलब्ध असेल - अहमदाबाद, बंगलुरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, चेन्नई, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपुर, जम्मु, कानपुर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, पाटणा, तिरुवनंतपुरम आणि कोची. ही माहिती जून 30, 2016 च्या वृत्तपत्र निवेदनाद्वारे विहित करण्यात आली आहे (सोबत प्रत जोडली आहे) (3) 2005 पूर्वीच्या बँक नोटाही एक वैध चलन असणे सुरुच राहील. (4) अशा नोटा बदलण्यासाठी आपल्या शाखांमध्ये आलेल्या जनतेला योग्य मार्गदर्शन करण्यास आपणास सांगण्यात येत आहे. (5) कृपया खात्री करुन घ्यावी की ह्या नोटा, एटीएम किंवा काऊंटर्स द्वारा पुनश्च प्रसारात जाणार नाहीत. (6) कृपया पोच द्यावी आपला (पी. विजयकुमार) सोबत - 1 पृष्ठ. |
पेज अंतिम अपडेट तारीख: