RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78475019

प्राधान्य क्षेत्रातील कर्ज प्रमाणपत्रे

आरबीआय/2015-16/366
एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी.23/04.09.01/2015-16

एप्रिल 7, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
[सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (प्रादेशिक ग्रामीण बँकांसह)/
नागरी सहकारी बँका/स्थानिक क्षेत्रीय बँका]

प्राधान्य क्षेत्रातील कर्ज प्रमाणपत्रे

कृपया प्राधान्य क्षेत्रातील कर्ज - प्राधान्य क्षेत्रातील कर्ज प्रमाणपत्रे सुरु करण्याबाबत उद्दिष्टे व वर्गीकरणे वरील आमचे परिपत्रक एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी 54/04.09.01/2014-15, दिनांक एप्रिल 23, 2015 च्या परिच्छेद 8 चा संदर्भ घ्यावा.

(2) अधिसूचना दि. फेब्रुवारी 4, 2016 अन्वये भारत सरकारने विहित केले आहे की, “भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, प्राधान्य क्षेत्रातील कर्ज प्रमाणपत्रे (पीएसएलसी)” हा, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 6 (1)(ए) खाली व्यवसायाचे, एक स्वरुप आहे. त्यानुसार, पीएसएलसी मधील ट्रेडिंगच्या सूचना सोबतच्या जोडपत्रात दिल्या आहेत. पीएसएलसी मध्ये ट्रेडिंग करण्यास मदत व्हावी ह्यासाठी, सीबीएस पोर्टल (ई-कुबेर) मार्फत ट्रेडिंगसाठीचा एक मंचही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ह्या मंचावर ट्रेडिंग करण्यासाठी सविस्तर युजर मॅन्युअल सूचनाही ह्या पोर्टल मार्फत उपलब्ध आहेत.

आपला

(ए.उदगाता)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक
सोबत - वरीलप्रमाणे


जोडपत्र

प्राधान्य क्षेत्रातील कर्ज प्रमाणपत्रे – योजना

(1) हेतु : प्राधान्य क्षेत्रातील कर्जाबाबतची उद्दिष्टे व उपउद्दिष्टे साध्य करण्यास, हे संलेख खरेदी करुन त्यातील तूट भरुन काढणे व त्याच वेळी ज्यांची अतिरिक्त उद्दिष्टे साध्य झाली आहेत अशा बँकांना योजनांकडे संघटित करुन, प्राधान्य क्षेत्रातील वर्गांना द्यावयाचे कर्ज वाढविणे.

(2) संलेखांचे स्वरुप : विक्री करणारा, प्राधान्य क्षेत्रातील दायित्व पूर्ण केल्याचे विकेल तर खरेदीदार ते विकत घेईल. कोणत्याही प्रकारचे, जोखीम किंवा कर्ज अॅसेट्सचे हस्तांतरण असणार नाही.

(3) रीती : ह्या पीएसएलसीज् ही चे ट्रेडिंग, आरबीआयच्या पोर्टल (ई-कुबेर) केले जाईल. हे व्यापार करण्याबाबतच्या सविस्तर सूचना ई-कुबेर पोर्टल मार्फत उपलब्ध आहेत.

(4) विक्रीकर्ता/खरेदीकर्ता : अनुसूचित वाणिज्य बँका (एससीबी), प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी), स्थानिक क्षेत्रीय बँका (एलएबी), लघु वित्त बँका (त्या कार्यरत झाल्यावर) आणि, पीएसएल अर्हताप्राप्त वर्ग कर्जे सुरु केली आहेत अशा नागरी सहकारी बँका - मात्र त्यासाठी ह्या बँकेने दिलेले विनियम लागु असतील.

(5) पीएसएलसीचे प्रकार : चार प्रकारच्या पीएसएलसी असतील.

(1) पीएसएलसी शेती - शेती क्षेत्रातील एकूण कर्ज उद्दिष्ट साध्य करणा-या

(2) पीएसएलसी एसएफ/एमएफ :- लघु व किरकोळ शेतक-यांना कर्ज देण्याचे पोट उद्दिष्ट साध्य करणा-या

(3) पीएसएलसी मायक्रो उद्योग :- मायक्रो उद्योगांना कर्ज देण्याचे पोट उद्दिष्ट साध्य करणा-या

(4) पीएसएलसी सर्वसाधारण :- सर्वसमावेशक प्राधान्य क्षेत्रातील उद्दिष्ट साध्य करणा-या

प्राधान्य क्षेत्रातील कर्ज - उद्दिष्टे व वर्गीकरणे वरील महापरिपत्रक एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी.BC.4/04.09.01/2015-16 दिनांक जुलै 01, 2015 मध्ये दिल्याप्रमाणे, प्राधान्य क्षेत्रात, शेती व मायक्रो उद्योगांसह अनेक वर्ग आहेत. शेती व मायक्रो उद्योगांना कर्ज देण्यासाठीच्या सर्वसमावेशक व क्षेत्रीय उद्दिष्टांच्या अतिरिक्त, लघु व किरकोळ शेतक-यांना कर्ज देण्यासाठीची विहित केलेली उद्दिष्टे साध्य करणे बँकांसाठी आवश्यक आहे. त्यानुसार, पीएसएल उद्दिष्टांची साध्यता/तूट ह्यांचे मूल्यमापनाचे गणन करण्यामधील प्रश्न टाळण्यासाठी सांगण्यात येत आहे की, वरील चार प्रकारची उद्दिष्टे विशिष्ट कर्जे समजली जातील आणि खाली दिल्यानुसार ती, विशिष्ट उद्दिष्टे/पोट उद्दिष्टे धरली जातील.

अनु क्रमांक पीएसएलसीचा प्रकार प्रतिनिधित्व साठी धरल्या जाणा-या
(1) पीएसएलसी-शेती ज्यांच्यासाठी वेगळ्याने प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत अशा एसएफ/एमएफना दिलेली कर्जे सोडून, पात्र असलेली सर्व शेती कर्जे. शेती उद्दिष्ट व सर्वसमावेशक पीएसएल उद्दिष्ट साध्य करणे.
(2) पीएसएलसी - एसएफ/एमएफ छोट्या/किरकोळ शेतक-यांना दिलेली पात्र कर्जे. एसएफ/एमएफ पोट उद्दिष्टे, शेतीचे उद्दिष्ट आणि सर्वसमावेशक पीएसएल उद्दिष्ट साध्य करणे.
(3) पीएसएलसी-मायक्रो उद्योग मायक्रो उद्योगांना दिलेली सर्व पीएसएल कर्जे. मायक्रो उद्योगांना पोट उद्दिष्ट आणि सर्वसमावेशक पीएसएल उद्दिष्ट साध्य करणे.
(4) पीएसएलसी-सर्वसाधारण अवशिष्ट प्राधान्य क्षेत्रातील कर्जे, म्हणजे, ज्यांच्यासाठी वेगळ्याने प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत अशा शेती व मायक्रो उद्योगांना दिलेल्या कर्जां व्यतिरिक्त कर्जे. पीएसएल उद्दिष्ट साध्य करणे.

अशा प्रकारे, कोणतेही पोट उद्दिष्ट साध्य करण्यात (उदा. एसएफ/एमएफ, मायक्रो) तूट आल्यास, त्या बँकेला तिचे उद्दिष्ट साध्य करण्यास विशिष्ट पीएसएल खरेदी करावी लागतील. तथापि, एखाद्या बँकेला केवळ सर्वसमावेशक उद्दिष्ट (तिला लागु असलेले) साध्य करण्यात तूट आली असल्यास, ती बँक उपलब्ध असलेल्या कोणत्याही पीएसएलसी विकत घेऊ शकते.

(6) पीएसएल साध्य केल्याचे गणन : एखाद्या बँकेचे पीएसएल साध्य केल्याबाबतचे गणन (आकडेमोड) आऊटस्टँडिंग (पूर्ण न केलेल्या) असलेल्या प्राधान्य क्षेत्रातील कर्जे आणि दिलेल्या व खरेदी केलेल्या पीएसएलसींची नाममात्र (नॉमिनल) किंमत ह्यांच्या बेरजेच्या स्वरुपात काढले जाते. अहवाल पाठविण्याच्या दिवशी पोट-उद्दिष्टेविहित केली असल्यास, असे गणन वेगळ्याने केले जाईल.

(7) देण्यासाठी पात्र असलेली रक्कम :- सर्वसाधारणतः संबंधित (अंडरलायिंग) अॅसेट्स विरुध्द पीएसएलसी दिली जातील. तथापि, पीएसएलसींसाठी एक सशक्त व हलते मार्केट विकसित करण्याच्या हेतूने, बँकेच्या पुस्तकात अंडरलायिंग नसताना देखील, एखाद्या बँकेला, मागील वर्षाच्या पीएसएल कामगिरीच्या 50 टक्के पीएसएलसी देण्याची परवानगी आहे. तथापि, अहवाल पाठविण्याच्या दिवशी, त्या बँकेने, प्राधान्य क्षेत्रातील आऊटस्टँडिंग पोर्टफोलियो आणि दिलेले व खरेदी केलेले पीएसएलसी ह्यांच्या बेरजे एवढे प्राधान्य क्षेत्रातील उद्दिष्ट पूर्ण केले असले पाहिजे. उद्दिष्ट साध्य करण्यात आलेल्या तुटी एवढी रक्कम बँकांनी आरआयडीएफ/इतर फंडांमध्ये गुंतवणे आवश्यक आहे.

(8) कर्ज जोखीम : मूर्त अॅसेट्स किंवा कॅश फ्लोचे हस्तांतरण होत नसल्याने मूळ रक्कमेची (अंडरलायिंग) कर्ज जोखमीचे हस्तांतरण होणार नाही.

(9) समाप्तीची तारीख : सर्व पीएसएलसी मार्च 31 रोजी समाप्त होतील, आणि ती प्रथम विकल्याची तारीख कोणतीही असली तरी, अहवाल पाठविण्याच्या तारखेनंतर (मार्च 31) ती वैध असणार नाही.

(10) तडजोड : ई-कुबेर पोर्टलमध्ये समजावून सांगितल्याप्रमाणे, निधींची तडजोड (समायोजन) ह्या मंचामार्फतच केली जाईल.

(11) मूल्य व शुल्क : पीएसएलसीचे नाममात्र (नॉमिनल) मूल्य, विक्रीर्कत्याच्या पीएसएल पोर्टफोलियो मधून वजा केलेल्या व खरेदी करणाराच्या पीएसएल पोर्ट फोलियोमध्ये जमा झालेल्या रकमेच्या सममूल्य असेल. खरेदीदाराने विक्रीकर्त्याला द्यावयाचे शुल्क मार्केटने ठरविल्यानुसार असेल.

(12) लॅाटचे आकारमान : ह्या पीएसएलसीचे प्रमाणित लॅाट आकारमान रु.25 लाख व त्याच्या पटीत असेल.

(13) अकाऊंटिंग : पीएसएलसी खरेदी करण्यासाठीचे शुल्क एक “खर्च” म्हणून दाखविले जाईल आणि पीएसएलसी विकण्यासाठी दिलेले शुल्क “संकीर्ण उत्पन्न” म्हणून दाखविले जाईल.

(14) प्रकटीकरण : विक्रीकर्ता व खरेदीदार हे दोघेही त्या वर्षात विकलेल्या व खरेदी केलेल्या पीएसएलसीची (वर्ग-निहाय) रक्कम, “ताळेबंदाच्या प्रकटीकरणात” दर्शवतील.

उदाहरण :

(1) बँक अ, जुलै 15, 2016 रोजी, बँक ब ला नॅामिनल मूल्य रु.100 कोटी असलेल्या पीएसएलसी विकू शकते. सप्टेंबर 30, 2016, डिसेंबर 31, 2016 आणि मार्च 31, 2017 ह्या अहवाल पाठविण्याच्या तारखांना, बँक ब, रु.100 कोटी, तिच्या प्राधान्य क्षेत्रातील साध्य उद्दिष्ट म्हणून दाखवील; तर बँक अ, अहवाल पाठविण्याच्या संबंधित तारखांना ही रक्कम तिच्या साध्य केलेल्या आकड्यांमधून वजा करील. ही पीएसएलसी मार्च 31, 2017 रोजी समाप्त होईल.

(2) बँक क, रु.100 कोटींचे पीएसएलसी, मार्च 30, 2017 रोजी बँक कडून विकत घेऊ शकते. मार्च 31, 2017 रोजीच्या तिच्या पीएसएल अहवालामधून, बँक ड रु.100 कोटी वजा करील आणि बँक क ती रक्कम तिची कामगिरी म्हणून दाखवील. ही पीएसएलसी मार्च 31, 2017 रोजी समाप्त होईल.

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?