RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78493331

प्राधान्य क्षेत्रातील कर्जे - सुधारित अहवाल प्रणाली

आरबीआय/2016-2017/79
एफआयडीडी सीओ.प्लान.सीओ.बीसी.क्र.17/04.09.001/2016-17

ऑक्टोबर 6, 2016

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
(सर्व अनुसूचित वाणिज्य बँका) (प्रादेशिक ग्रामीण बँका सोडून)

महोदय/महोदया,

प्राधान्य क्षेत्रातील कर्जे - सुधारित अहवाल प्रणाली

आमचे परिपत्रक एफआयडीडी सीओ.प्लान.बीसी.54/04.09.01/2014-15 दिनांक, एप्रिल 23, 2015 अन्वये प्राधान्य क्षेत्रासाठीची मार्गदर्शक तत्वे सुधारित करण्यात आली होती. त्यानुसार, प्राधान्य क्षेत्रातील कर्जांचे तिमाही व वार्षिक अहवाल पाठविण्यासाठीचे नमुनेही परिपत्रक एफआयडीडी सीओ.प्लान.बीसी.क्र.58/04.09.001/2014-15 दिनांक, जून 11, 2015 अन्वये देण्यात आले होते.

(2) पुनरावलोकन केल्यानंतर, प्राधान्य क्षेत्रातील कर्जाचे तिमाही व वार्षिक अहवाल पाठविण्याचे नमुनेही सुधारित करण्यात आले. ह्यासाठी बँकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी प्राधान्य क्षेत्रातील अग्रिम राशींवरील माहिती सोबत जोडलेल्या सुधारित नमुन्यांत पाठवावी. ही सुधारित तिमाहीवार्षिक विवरणपत्रे, अनुक्रमे तिमाहीची अखेर झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत व वित्तीय वर्षाची अखेर झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत, भारतीय रिझर्व बँक, वित्तीय समावेशन व विकास विभाग सांख्यिकी विभाग, केंद्रीय कार्यालय, 3 रा मजला, अमर बिल्डिंग, फोर्ट, मुंबई - 400 001 ह्यांच्याकडे पाठवावीत.

(3) ह्याशिवाय बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी, जून 2016 व ऑक्टोबर 2016 अखेरीस समाप्त होणा-या तिमाहींसाठीचे अहवाल, केवळ सुधारित नमुन्यांमध्येच, ऑक्टोबर 21, 2016 पर्यंत पाठवावेत,

आपला

(ए.उदगाता)
(प्रधान मुख्य महाव्यवस्थापक),
सोबत - वरील प्रमाणे.

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?