<font face="Mangal" size="3">प्राधान्य क्षेत्रातील कर्ज - उद्दिष्टे व वर् - आरबीआय - Reserve Bank of India
प्राधान्य क्षेत्रातील कर्ज - उद्दिष्टे व वर्गीकरण : कॉर्पोरेट नसलेल्या शेतक-यांना कर्ज देणे - मागील तीन वर्षांची प्रणाली व्यापी सरासरी
आरबीआय/2017-18/61 सप्टेंबर 21, 2017 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक, महोदय/महोदया, प्राधान्य क्षेत्रातील कर्ज - उद्दिष्टे व वर्गीकरण : कॉर्पोरेट नसलेल्या शेतक-यांना कर्ज देणे - मागील तीन वर्षांची प्रणाली व्यापी सरासरी आमचे वरील विषयावरील परिपत्रक क्र. एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी.08/04.09.01/2015-16, दि. जुलै 16, 2015 अन्वये कळविण्यात आले होते की, कॉर्पोरेट नसलेल्या शेतक-यांना, थेट देण्यात आलेल्या सर्वसमावेशक कर्जाबाबतच्या, मागील तीन वर्षाच्या कामगिरीची प्रणाली व्यापी सरासरी लवकरच, व त्यानंतर प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस कळविली जाईल. (2) ह्याबाबत, आर्थिक वर्ष 2017-18 साठी, प्राधान्य क्षेत्रातील कर्जाखालील कामगिरी काढण्यासाठीची, लागु असलेली प्रणाली व्यापी सरासरी 11.78 टक्के आहे. आपली विश्वासु, (उमा शंकर) |