<font face="mangal" size="3">युडीएवाय (उदय) योजनेखाली तेलंगणाच्या विशेष प - आरबीआय - Reserve Bank of India
युडीएवाय (उदय) योजनेखाली तेलंगणाच्या विशेष प्रतिभूतींचे
खाजगी वितरण (प्रायवेट प्लेसमेंट)
मार्च 2, 2017 युडीएवाय (उदय) योजनेखाली तेलंगणाच्या विशेष प्रतिभूतींचे उज्ज्वल डिसकॉम अॅशुअरन्स योजना स्कीम (युडीएवाय) खाली, तेलंगणा सरकार, रु.8922.93 कोटीच्या अधिसूचित रकमेच्या विशेष प्रतिभूती देण्याचे प्रायोजित करत आहे. ह्या विशेष प्रतिभूतींसाठी वर्गणी देऊ इच्छिणा-या, पात्र असलेल्या मार्केट-सहभागींनी, खाली दिलेल्या नमुन्यामध्ये त्यांच्या बोली, मार्च 6, 2017 रोजी (सोमवार) सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 पर्यंत या ईमेल वर पाठवाव्यात.
प्रतिभूतींचे वाटप व समायोजन मार्च 7, 2017 रोजी (मंगळवार) केले जाईल. ह्या प्रचालनाच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. (1) ह्या विशेष प्रतिभूतींचे दर्शनी मूल्य रु.100 असेल. (2) 6 व्या, 7 व्या, 8 व्या, 9 व्या, 10 व्या, 11 व्या, 12 व्या, 13 व्या, 14 व्या व 15 व्या वर्षाच्या अखेरीस परिपक्वतेसह समान स्ट्रिप्सने ह्या प्रतिभूती दिल्या जातील. गुंतवणुकदाराने संपूर्ण रचना खरेदी करणे आवश्यक असून बोलीची रक्कम सर्व मुदतींमध्ये समानतेने विभागावयाची आहे. (3) किमान बोली रु.100 कोटींची असेल. (4) ह्या बाबतचा बेस रेट, भारत सरकारच्या संलग्न एफआयएमएमडीए च्या मार्च 3, 2017 रोजीच्या जी सेकवरील बंद यील्ड एवढा असेल. (5) बोली करणाराने देऊ केलेला एकसमान स्प्रेड (जीओआयच्या संलग्न एफआयएमएमडीए वर 75 बीपीएसची मर्यादा असलेला) सहामाही धर्तीवर द्यावयाचे कुपन काढण्यासाठी, ह्या बेस रेटमध्ये मिळविला जाईल. (6) प्रत्येक मुदतीसाठी, मल्टिपल प्राईस अॅक्शन रितीवर आधारित केवळ एकच प्रतिभूती दिली जाईल (एसडीएल मध्ये असलेल्या रीतीनुसार). काही प्रिमियम असल्यास, यशस्वी बोलीदाराकडून ते कट ऑफ पेक्षा भिन्न स्प्रेड कोट्ससह दिले जाईल. (7) स्पर्धात्मक स्प्रेडच्या आधारावर ह्या बँकेकडून यशस्वी बोलीदार ठरविले जातील. (8) कोणतेही/सर्व बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे ह्याबाबतचे अधिकार भारतीय रिझर्व बँकेलाच असतील. येथे स्मरण व्हावे की, भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने, नोव्हेंबर 20, 2015 रोजी ‘ऊर्जा वितरण कंपन्यांच्या (डीआयएससीओएम) च्या कार्यकारी व वित्तीय टर्न अराऊंड साठी उदय (उज्जवल डिसकॉम अॅशुअरन्स योजना) योजना’ वर, कार्यालयीन पत्रक (क्र.06/02/2015-एनईएफ/एफआरपी) दिले होते. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2341 |