<font face="mangal" size="3">वैध चलन म्हणून जनता सर्व नाण्यांचा स्वीकार क - आरबीआय - Reserve Bank of India
वैध चलन म्हणून जनता सर्व नाण्यांचा स्वीकार करु शकते - आरबीआय
जून 26, 2019 वैध चलन म्हणून जनता सर्व नाण्यांचा स्वीकार करु शकते - आरबीआय. भारत सरकारने टाकसाळीत पाडलेल्या नाण्यांचे प्रसारण भारतीय रिझर्व्ह बँक करत असते. जनतेची गरज भागविण्यासाठी, नवीन मूल्यातील नाणी व निरनिराळ्या विषयांवरील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक नवीन डिझाईन्स असलेली नाणी वेळोवेळी दिली जात असतात. नाणी ही अधिक कालावधीदरम्यान प्रसारात राहत असल्याकारणाने, निरनिराळ्या आकारांची व डिझाईन्सची नाणी एकाच वेळी प्रसारात/व्यवहारात येत असतात. सध्या, 50 पैसे, रु.1/-, 2/-, 5/- व 10/- मूल्याची निरनिराळ्या आकारांची, विषयांची व डिझाइन्सची नाणी प्रसारात आहेत. असे समजण्यात आले आहे की, काही क्षेत्रात/बाबतीत ह्या नाण्यांच्या खरेपणाविषयी शंका असल्याकारणाने, ही नाणी स्वीकारण्यास व्यापारी, दुकानदार व जनताही हयगय करते. ह्यामुळे देशाच्या काही भागात ह्या नाण्यांच्या मुक्त उपयोगावर व प्रसारणावर विपरीत परिणाम झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक जनतेला विनंती/आवाहन करते की त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही हयगय न करता, त्यांच्या सर्व व्यवहारांमध्ये, ही नाणी, एक वैध चलन म्हणून स्वीकारणे सुरु ठेवावे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डीसी एम(एनइ)क्र.जी-2/08.07.18/2018-19 जुलै 2, 2018 रोजी व जानेवारी 14, 2019 रोजी अद्यावत केलेल्या सूचनांनुसार, ही नाणी व्यवहारांमध्ये स्वीकारण्यासाठी व बदलून देण्यासाठी बँकांना पुनश्च कळविले आहे. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2018-2019/3056 |