<font face="mangal" size="3px">सार्वजनिक भविष्यनिधी योजना, 1968 (पीपीएफ स्कीम, 1968)  - आरबीआय - Reserve Bank of India
सार्वजनिक भविष्यनिधी योजना, 1968 (पीपीएफ स्कीम, 1968) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना, 2004 (एससीएसएस, 2004) - व्याजदरांमध्ये सुधारणा
आरबीआय/2013-14/526 मार्च 21, 2014 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक / व्यवस्थापकीय संचालक, महोदय/महोदया, सार्वजनिक भविष्यनिधी योजना, 1968 (पीपीएफ स्कीम, 1968) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना, 2004 (एससीएसएस, 2004) - व्याजदरांमध्ये सुधारणा कृपया, लघु बचत योजनेवरील आमचे परिपत्रक आरबीआय/2011-12/359 दि. जानेवारी 20, 2012 चा संदर्भ घ्यावा. त्यात सांगण्यात आले होते की, लघु बचत योजनांवरील व्याजदरांवरील सरकारच्या निर्णयानुसार, प्रत्येक वित्तीय वर्षासाठीच्या निरनिराळ्या लघु बचत योजनांवरील व्याजदर, त्या वर्षाच्या 1 एप्रिल पूर्वी सरकारकडून अधिसूचित केले जातील आता भारत सरकारने, त्यांच्या ऑफिस मेमोरँडम (ओएम) क्र. 6-1/2011-12 एनएस-2 दि. 4 मार्च 2014 अन्वये, वित्तीय वर्ष 2014-15 साठीचे, निरनिराळ्या लघुबचत योजनांवरील व्याजदर कळविले आहेत. त्यानुसार, 2014-15 ह्या वित्तीय वर्षासाठी 1 एप्रिल 2014 पासून, पीपीएफ 1968 व एससीएसएस 2004 वरील व्याजदर, चक्रवाढ व्याजाने/त्या योजनांमध्ये अंतर्भूत प्रदानांनुसार पुढीलप्रमाणे असतील :
ह्या परिपत्रकातील मजकुर, पीपीएफ 1968 व एससीएसएस 2004 योजना राबविणा-या आपल्या बँक शाखांच्या नजरेस आणावा. त्याचप्रमाणे, पीपीएफ 1968, व एससीएसएस, 2004 च्या वर्गणीदारांच्या माहितीसाठी, तो आपल्या शाखांच्या नोटिस बोर्डांवरही प्रदर्शित केला जावा आपला, (श्रीकांत हमीये) |