<font face="mangal" size="3">श्रीमती मालविका सिन्हा ह्यांची आरबीआयकडून ê - आरबीआय - Reserve Bank of India
श्रीमती मालविका सिन्हा ह्यांची आरबीआयकडून नवीन कार्यकारी संचालक म्हणून नेमणुक
एप्रिल 5, 2017 श्रीमती मालविका सिन्हा ह्यांची आरबीआयकडून नवीन कार्यकारी संचालक म्हणून नेमणुक श्री. बी पी कानुनगो ह्यांची एप्रिल 3, 2017 रोजी डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणुक केल्यानंतर, भारतीय रिझर्व बँकेने, श्रीमती मालविका सिन्हा ह्यांची कार्यकारी संचालक (ईडी) म्हणून नेमणुक केली आहे. श्रीमती मालविका सिन्हा ह्यांनी एप्रिल 3, 2017 रोजी पदभार स्वीकारला. कार्यकारी संचालिका ह्या नात्याने, श्रीमती मालविका सिन्हा, विदेशी मुद्रा विभाग, सरकारी व बँक खाती विभाग आणि अंतर्गत ऋण व्यवस्थापन विभाग ह्यांचे कामकाज पाहतील. श्रीमती मालविका सिन्हा, मुंबई विश्वविद्यालयाच्या सार्वजनिक प्रशासन ह्या विषयामधील मास्टर्स पदवीधारक असून, त्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ बँकर्सच्या सर्टिफिकेटेड असोशिएट्स आहेत. श्रीमती सिन्हा 1982 मध्ये रिझर्व बँकेच्या सेवेत रुजु झाल्या आणि एक करियर सेंट्रल बँकर म्हणून त्यांनी ह्या बँकेतील विनियमन व पर्यवेक्षण, विदेशी मुद्रा व सरकारी व बँक खाती ह्या क्षेत्रात नोकरी केली आहे. ईडी म्हणून पदोन्नती मिळण्यापूर्वी, श्रीमती सिन्हा ह्या, भारतीय रिझर्व बँकेमधील सहकारी बँकिंग पर्यवेक्षण विभागाच्या प्रधान मुख्य महाव्यवस्थापक होत्या. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2682 |